vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

दुग्ध व्यवसायाला मिळणार बळ; विदर्भ-मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्पांतर्गत वैरण बियाणे व कडबा कुटीसाठी ऑनलाइन अर्ज सुरू!🐄🌿

 दुग्ध व्यवसायाला मिळणार बळ; विदर्भ-मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्पांतर्गत वैरण बियाणे व कडबा कुटीसाठी ऑनलाइन अर्ज सुरू!🐄🌿

लातूर प्रतिनिधी

विदर्भ-मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्पांतर्गत पशुपालकांना वैरण बियाणे आणि कडबा कुटी योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या योजनांमुळे जनावरांसाठी पौष्टिक चारा उपलब्ध होण्यास मदत होणार असून, पशुपालकांचा चारा व्यवस्थापनावरील खर्च कमी करण्यास आणि दुग्ध व्यवसाय अधिक सक्षम करण्यास हातभार लागणार आहे. 👏🏻

या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र पशुपालकांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरावा. अर्ज भरताना सर्व माहिती अचूक नोंदवून आवश्यक कागदपत्रे स्पष्ट स्वरूपात अपलोड करणे महत्त्वाचे आहे.📋 अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे :-*१. आधार कार्ड – अर्जदार पशुपालकाचे आधार कार्ड.२. रेशन कार्ड – रेशन कार्डची पहिली व दुसरी पाने, तसेच रेशन कार्डवरील सर्व सदस्यांचे आधार क्रमांक आवश्यकतेनुसार अर्जात नोंदवावेत.३. सातबारा उतारा (७/१२) – जमीनधारणा व वैरण लागवडीसाठी उपलब्ध क्षेत्रासंबंधी आवश्यक पुरावा.४. जनावरांचे टॅग नंबर – पशुधनाची अचूक नोंद करण्यासाठी संबंधित जनावरांचे टॅग क्रमांक.५. दूध प्रमाणपत्र – विहित नमुन्यातील आवश्यक दूध प्रमाणपत्र व इतर संबंधित कागदपत्रे.

योजनेसाठी महत्त्वाची अट :-*वैरण बियाणे व कडबा कुटी योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित पशुपालकाकडे किमान ३ दुधाळ जनावरे असणे आवश्यक आहे. अर्ज करण्यापूर्वी संबंधित योजनेचे पात्रता निकष आणि आवश्यक अटी तपासून घ्याव्यात.

ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया पुढीलप्रमाणे :-*🔹 सर्वप्रथम www.vmddp.com या संकेतस्थळाला भेट द्या.🔹 अर्जासाठी आवश्यक असलेली माहिती अचूक भरा.🔹 दूध प्रमाणपत्र विहित नमुन्यात तयार करून आवश्यक कागदपत्रांसह अपलोड करा.🔹 अर्ज सादर करण्यापूर्वी भरलेली माहिती आणि अपलोड केलेली कागदपत्रे व्यवस्थित तपासून घ्या.

पशुपालकांनी लक्षात ठेवावे…अर्ज प्रक्रियेत कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी सर्व कागदपत्रे आधीच तयार ठेवावीत. आधार क्रमांकासारखी वैयक्तिक माहिती केवळ अधिकृत संकेतस्थळावरच नोंदवावी. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख आणि इतर अटींबाबत अधिकृत सूचनांची खात्री करून घ्यावी. 🔗 ऑनलाइन अर्जासाठी अधिकृत संकेतस्थळ:🌐 www.vmddp.comधन्यवाद!✒️ सौ. शिवकन्याताई महेंद्र गोडभरलेसभापती (महिला व बालकल्याण विभाग, जि. प. लातूर)

संबंधित पोस्ट

मुंबईतील दहिसर पूर्व ते काशीगाव या ४.७ किलोमीटर लांबीच्या मार्गिकेवर चार स्थानकांसह आजपासून #मेट्रो सेवा सुरू

सच्चा गांधीवादी, समाजवादी ‘सप्तर्षी’ निखळला – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार डॉ.कुमार सप्तर्षी यांना उपमुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली

जल व्यवस्थापन कृती पंधरवड्याचे उद्घाटन

*उपहारगृह सुरू करण्यासाठी निवीदा सादर करण्यास मुदतवाढ*

vishwatmaklokswamivarta

बांधकाम प्रकल्पांचे निरीक्षण ‘आयओटी-एआय’द्वारे होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,बृहृन्मुंबई महानगरपालिकेला ‘रिअल-टाईम’ प्रणाली उभारण्याचे निर्देश

कैलासनगर स्मशानभूमीच्या पुनर्विकासाचे भूमिपूजन; वर्षभरात साकार होणार आधुनिक ‘वैकुंठ धाम’