vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जल व्यवस्थापन कृती पंधरवड्याचे उद्घाटन

जल व्यवस्थापन कृती पंधरवड्याचे उद्घाटन

   अमरावती, प्रतिनिधी : जलसंपदा विभागातर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवडा 2026चे उद्घाटन नुकताच उर्ध्व वर्धा कॉलनीतील मनोरंजन सभागृहामध्ये पार पडला. जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता ज. द. टाले अध्यक्षस्थानी होते

    यावेळी अधीक्षक अभियंता योगेश दाभाडे, अधिक्षक अभियंता मनिष राजभोज उपस्थित होते. कार्यकारी अभियंता अनिकेत सावंत यांनी या पंधरवड्यामध्ये जलसंपदा विभागाने करावयाच्या कामामध्ये कालवा स्वच्छता मोहिम, पाणीपट्टी वसुली, पाणी वापर संस्थांचे सक्षमीकरण, महानगरपालिका व ग्रामपंचायत क्षेत्रातील प्रत्यक्ष पाणी वापराचा जललेखा तयार करणे, अनधिकृत बांधकाम हटविणे, तसेच जलसंपदा विभागाच्या जमिनीच्या मालमत्तांचे स्थळ निश्चिती करणे, जलसंपदा अधिकारी, कर्मचारी यांचे प्रशिक्षण, स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय, शेतकरी, पाणी वापर संस्था चर्चासत्र ही कामे प्राधान्यक्रमाने करण्याबाबतचे नियोजन सादर

   यावेळी उर्ध्व वर्धा, सपन, चंद्रभागा, शाहनुर, पुर्णा या प्रमुख नद्यांचे जलपुजन करुन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. सहायक अभियंता श्रध्दा कथलकर यांनी सूत्रसंचालन केले. विवेक चव्हाण यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी मालमत्ता उपविभागाचे उपविभागीय अभियंता श्री. मुंडे, सुयोग वानखेडे यांनी पुढाकार घेतला.

00000000

संबंधित पोस्ट

*उपहारगृह सुरू करण्यासाठी निवीदा सादर करण्यास मुदतवाढ*

vishwatmaklokswamivarta

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मारकाच्या माध्यमातून नवीन पिढीला प्रेरणा मिळेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

काश्मीर मधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविण्यास रिपब्लिकन पक्ष सज्ज ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

जालना शहरातील भटक्या जनावरांच्या मालकांवर कठोर कारवाई करणार जिल्हाधिकारी तथा आयुक्त आशिमा मित्तल

vishwatmaklokswamivarta

बुलडाणा जिल्ह्यात अतिवृष्टीसदृश पाऊस; परिस्थितीचा केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी घेतला आढावा• जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा,तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यकांना गावात उपस्थित राहण्याच्या सूचना,  • नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश

भाजपा जालना महानगर जिल्ह्याच्या वतीने बिहार विधानसभेच्या विजयाचा जल्लोष…

vishwatmaklokswamivarta