vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

बुलडाणा जिल्ह्यात अतिवृष्टीसदृश पाऊस; परिस्थितीचा केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी घेतला आढावा• जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा,तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यकांना गावात उपस्थित राहण्याच्या सूचना,  • नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश

बुलडाणा जिल्ह्यात अतिवृष्टीसदृश पाऊस; परिस्थितीचा केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी घेतला आढावा• जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा,तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यकांना गावात उपस्थित राहण्याच्या सूचना,  • नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश

बुलढाणा, प्रतिनिधी: बुलढाणा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीसदृश पावसामुळे अनेक तालुक्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले असून शेतीपिके, घरे आणि पायाभूत सुविधांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यांना मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण देवरे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून जिल्ह्यातील पावसाच्या परिस्थितीची सविस्तर माहिती घेतली.

यावेळी केंद्रीय राज्यमंत्र्यांनी प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देत गावपातळीवर तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांनी मुख्यालयी उपस्थित राहून परिस्थितीवर लक्ष ठेवावे, अशी सूचना दिली. तसेच नदीकाठच्या गावांतील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतीचे तातडीने पंचनामे करावेत आणि पडझड झालेल्या घरांचेही त्वरित पंचनामे करून मदत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

३० आणि ३१ जुलैदरम्यान जिल्ह्यात सर्वत्र संततधार पाऊस झाला. जळगाव जामोद तालुक्यात सर्वाधिक २०७.४ मिमी पावसाची नोंद झाली. त्याखालोखाल नांदुरा १७४.८ मिमी, खामगाव १५२.१ मिमी, शेगाव १३९.७ मिमी, मलकापूर १३७.२ मिमी, संग्रामपूर ११७.८ मिमी, मेहकर १११ मिमी, चिखली १०९.८ मिमी, मोताळा १०६.७ मिमी, बुलढाणा १०४.८ मिमी, लोणार १०० मिमी, सिंदखेडराजा ९८.१ मिमी आणि देऊळगाव राजा ८२.५ मिमी पावसाची नोंद झाली.

दोन तालुके वगळता तब्बल ११ तालुक्यांमध्ये १०० मिमीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. अनेक ठिकाणी शेतजमिनींमध्ये पाणी साचले असून पिकांचे नुकसान, माती वाहून जाणे आणि घरांची पडझड होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

जिल्हा प्रशासनाने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले असून महसूल, कृषी आणि ग्रामविकास यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच नागरिकांनी अनावश्यकपणे नदी-नाल्यांमध्ये किंवा पूरग्रस्त भागात जाणे टाळावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

संबंधित पोस्ट

जिल्हा माहिती कार्यालयाचा चित्ररथन्या.रविंद्र घुगे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रवाना

राष्ट्रीय लोकअदालतीत ९७ लाखांहून अधिक रकमेची वसुली; १०० प्रलंबित आणि २२ दाखलपूर्व खटले निकाली

अनुसुचीत जातींच्या आश्रम शाळांना VJNT शाळासंहिता लागू करुन नियमित वेतनश्रेणी प्रमाणे 100 टक्के अनुदान देऊन शिक्षकांच्या होणा-या आत्महत्या थांबवण्याचे विनंती..

राष्ट्रीय पोषण पंधरवड्यात अहिल्यानगर जिल्हा देशात प्रथम..

बंदिजनांच्या आयुष्यात ‘सकारात्मकते’ची पहाट कारागृहात मिळतेय गीतेतून जीवन जगण्याची नवी दृष्टी..

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते राज्य रस्ता सुरक्षा अभियानाचा शुभारंभ• रस्ता सुरक्षा जनजागृती रॅलीस हिरवी झेंडी दाखवून केले मार्गस्थ