vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करणार- सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करणार- सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई, प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुका व परिसरातील आरोग्यसुविधा सक्षम करण्यात येणार आहेत. दत्तवाड ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन, शिरोळ ग्रामीण रुग्णालयासाठी नवीन प्रशस्त इमारत, कुरुंदवाड येथे महिला रुग्णालय; तसेच नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रे व आरोग्य उपकेंद्रांच्या उभारणीसंदर्भातील प्रस्तावांना गती देण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.

मुंबईत आरोग्य भवन येथील कार्यालयात आयोजित बैठकीत शिरोळ तालुक्यातील विविध आरोग्यविषयक प्रस्तावांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आरोग्य सेवा आयुक्त, संजय काटकर, अतिरिक्त आयुक्त जगन्नाथ विरकर, संचालक, डॉ.नितीन अंबाडेकर, सहसंचालक सुनिता गोलाईत यांच्या सह जिल्हा आरोग्य अधिकारी, कोल्हापूर (दूरदृष्य प्रणालीद्वारे)उपस्थित होते.

यावेळी सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले की, ग्रामीण भागातील वाढत्या लोकसंख्येच्या गरजा लक्षात घेऊन आवश्यक आरोग्य पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यात येत आहेत. दत्तवाड ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून सध्या सुरू असलेल्या ३० खाटांच्या रुग्णालयाचे ५० खाटांत श्रेणीवर्धन होत असल्याने तेथील बांधकामाबाबत प्रस्ताव सादर करावेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांना अधिक व्यापक आणि दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

याशिवाय संभाजीपूर आणि टाकवलीवाडी येथील नवीन आरोग्य उपकेंद्रांच्या प्रस्तावांना गती देण्यात यावी. यड्राव येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र, तसेच लाटवाडी, शिवनाकवाडी, तेरवाड, आगर, कनवाड, खिद्रापूर, बस्तवाड, तामदलगे आणि जैनापूर येथे नवीन आरोग्य उपकेंद्रांचा समावेश करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.

सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले की, “ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या गावाजवळच गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे हे शासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. शिरोळ तालुक्यातील प्रलंबित आरोग्यविषयक प्रस्तावांना गती देऊन आधुनिक आरोग्य पायाभूत सुविधा उभारण्यासाठी आवश्यक ती सर्व कार्यवाही प्राधान्याने करण्यात येईल. राज्य शासन सर्वसामान्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने कोणतीही कमतरता राहू देणार नाही

 

संबंधित पोस्ट

भारतातील डिजिटल परिवर्तन संसदीय लोकशाहीसाठी अभिमानास्पद- विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे• बार्बाडोस येथील ६८ व्या सी.पी.ए. आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये महत्वपूर्ण विषयांवर चर्चासत्र• लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळात भारतातील राज्य विधानमंडळ पीठासीन अधिकारी यांची उपस्थिती

vishwatmaklokswamivarta

आषाढी एकादशी यात्रा: पूर्वतयारी आढावा बैठक भाविकांना सुरक्षा, स्वच्छता आणि सेवा द्या – जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

धरण परिसरात पर्यटन विकासाला प्राधान्य – जलसंपदामंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

सामाजिक समता सप्ताह निमित्त मार्जिन मनी योजनेंतर्गत कार्यशाळा संपन्न

राज्य सरकारचा मोठा निर्णय- बीड जिल्ह्यातील मस्या जोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण; उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती…

vishwatmaklokswamivarta

सौरऊर्जेच्या माध्यमातून दिवसा वीज उपलब्ध करुन देण्याचा शासनाचा प्रयत्न – उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुढाळे येथील महापारेषणच्या २२०/३३ के.व्ही. उपकेंद्राचे भूमिपूजन