vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतरठळक बातम्यास्थानिक बातम्या

सांस्कृतिक कार्य विभागामार्फत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मराठी एकांकिका स्पर्धेचे आयोजन – सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार मुंबई, छत्रपती संभाजी नगर, पुणे व अमरावती येथे प्राथमिक फेरीचे आयोजन

सांस्कृतिक कार्य विभागामार्फत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मराठी एकांकिका स्पर्धेचे आयोजन – सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार-मुंबई, छत्रपती संभाजी नगर, पुणे व अमरावती येथे प्राथमिक फेरीचे आयोजन

मुंबई द प्रतिनिधी: राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत आयोजित ‘महाराष्ट्र राज्य मराठी एकांकिका स्पर्धा’ यावर्षी चार विभागांतून साकार होत आहे. या स्पर्धेतून मराठी एकांकिका चळवळीत नवा इतिहास घडणार असल्याचा विश्वास सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी व्यक्त केला आहे.

ही एकांकिका स्पर्धा यावर्षीपासून फक्त महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेली आहे. कोकण विभागातील स्पर्धेचे १९ ते २३ जानेवारी, २०२६ या कालावधीत यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा येथे आयोजन करण्यात येत आहे. याचबरोबर ही स्पर्धा पुणे, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर या चार प्रमुख विभागांत प्राथमिक फेरीच्या स्वरुपात घेण्यात येणार आहे. राज्यभरातून सहभागी होणाऱ्या नाट्यसंघांसाठी ही एक सुवर्णसंधी ठरणार आहे.

प्राथमिक फेरीत सादरीकरण करणाऱ्या संघांमधून प्रत्येक विभागातून ५ उत्कृष्ट संघांची महाअंतिम फेरीसाठी निवड करण्यात येणार असून, अशा प्रकारे एकूण २० संघ अंतिम टप्प्यात पोहोचणार आहेत.

विशेष बाब म्हणजे ही संपूर्ण प्राथमिक फेरी निशुल्क ठेवण्यात आली आहे. जास्तीत जास्त नाट्यसंघांनी व रसिक प्रेक्षकांनी या एकांकिका स्पर्धेतील नाटकांचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी केले आहे.

मराठी रंगभूमीतील नवोदित कलाकारांना व्यासपीठ देणे, एकांकिका चळवळीला नवसंजीवनी देणे आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा वारसा अधिक समृद्ध करणे, हाच या भव्य स्पर्धेचा मुख्य उद्देश असल्याचेही यावेळी मंत्री ॲड. शेलार यांनी सांगिले.

 

000

संबंधित पोस्ट

श्री संत सावता माळी पुण्यतिथी समितीच्या अध्यक्षपदी अश्विन अंबेकरउपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर धानुरे, वैजिनाथ नागरे, रामभाऊ पाऊलबुध्दे , कार्याध्यक्षपदी निवृत्ती गायके

संभाव्य एल निनोच्या पार्श्वभूमीवर राज्य सज्ज उपलब्ध पाण्याचे नियोजन व जलसंधारणाची कामे पूर्ण करण्यावर भर द्यावा– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,· जुन्या जलस्त्रोतांची दुरुस्ती व पुनरुज्जीवनावर भर द्यावा· पाणी बचतीसाठी प्रत्येक जिल्ह्यात स्थानिक स्तरावर टास्क फोर्स स्थापन करावे· वैरण विकास कार्यक्रम प्रभावीपणे राबवा· खत पुरवठा व वितरणावर एआयच्या माध्यमातून लक्ष ठेवा

तासगाव व पलूस येथील शासकीय वसतिगृहाचा लाभ घेण्याचे आवाहन

हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या तीव्र विरोधामुळे अहिल्यानगरमधील ‘व्हॅलेंटाईन डे’निमित्त आयोजित ‘कॉफी रेव्ह पार्टी’ रद्द !

vishwatmaklokswamivarta

धरती आबा’ आणि ‘पीएम जनमन’ योजना लोकचळवळ बनवण्याचे मंत्री डॉ. अशोक उईके यांचे आवाहन* १५ ऑगस्टपूर्वी कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश*

महाराष्ट्राला देशातील अग्रगण्य सागरी आणि जलवाहतूक केंद्र बनविण्याच्या दृष्टीने, महाराष्ट्र सागरी मंडळामार्फत करण्यात आलेल्या ५६ हजार १७ कोटी रुपयांच्या सामंजस्य करारांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे