vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या तीव्र विरोधामुळे अहिल्यानगरमधील ‘व्हॅलेंटाईन डे’निमित्त आयोजित ‘कॉफी रेव्ह पार्टी’ रद्द !

हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या तीव्र विरोधामुळे अहिल्यानगरमधील ‘व्हॅलेंटाईन डे’निमित्त आयोजित ‘कॉफी रेव्ह पार्टी’ रद्द !

राज्य प्रतिनिधी- १४ फेब्रुवारी २०२६ रोजी ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने अहिल्यानगर शहरातील शॉर्ट ब्रेक कॅफे, जावा जंक्शन, टायटन शोरूमजवळ आयोजित करण्यात आलेल्या तथाकथित ‘सनडाऊनर कॉफी रेव्ह पार्टी’ (Sundowner Coffee Rave Party) या कार्यक्रमास हिंदु जनजागृती समितीसह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी तीव्र विरोध दर्शवला. या विरोधामुळे सदर कार्यक्रम रद्द करण्यात आला असून, पोलिसांनी याची माहिती समिती पदाधिकाऱ्यांना दिली आहे. तसेच संबंधित इंस्टाग्राम पेजवरील जाहिरात हटवण्यात आली आहे. हा हिंदूंच्या एकजुटीचा विजय आहे. अशा प्रकारे होत असलेले समाजविघातक कार्यक्रम राखणे, हे संस्कृतीरक्षणच आहे, *अशी भूमिका हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक श्री. रामेश्वर भुकन यांनी या वेळी व्यक्त केली.*

 हिंदु जनजागृती समितीसह विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी श्री. पंकज आशिया व पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे यांना निवेदन सादर करून या कार्यक्रमास परवानगी देऊ नये किंवा दिलेली परवानगी तात्काळ रद्द करावी, अशी मागणी केली होती. देशभरातील अशा रेव्ह पार्ट्यांमध्ये MDMA, LSD, गांजा, चरस, कोकेन यांसारख्या अंमली पदार्थांचा वापर होत असल्याचे अनेकदा पोलीस कारवायांमधून उघड झाले आहे. NDPS कायद्याने अशा पदार्थांवर बंदी असूनही अशा कार्यक्रमांमुळे अंमली पदार्थांची विक्री चालू होण्याचा धोका निर्माण होतो.

       अहिल्यानगर हे शिक्षणाचे केंद्र असून येथे मोठ्या संख्येने विद्यार्थी राहतात. अशा रेव्ह पार्ट्यांमुळे युवकांमध्ये व्यसनाधीनता वाढून त्यांच्या भवितव्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. मद्य आणि अमली पदार्थ यांच्या प्रभावाखाली महिलांवरील छेडछाड, अत्याचार, अश्लील चित्रीकरण, तसेच कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो, हे यापूर्वी अनेक घटनांमधून सिद्ध झाले आहे. तसेच यात जाणीवपूर्वक मुलींना सवलतीत किंवा कमी किमतीत प्रवेश देऊन आमंत्रित केल्यामुळे ‘लव्ह जिहाद’च्या घटनांमध्ये वाढ होण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली होती.

 या वेळी हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक श्री. रामेश्वर भुकन, जिल्हा हिंदु संघटक श्री. बापू ठाणगे, भाजप महिला मोर्चा राज्य सचिव सौ. गीता गिल्डा, भाजप कार्यालय मंत्री श्री. मुकुल गंधे, बजरंग दलाचे श्री. नाना मोरे, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे श्री. अजिंक्य गायकवाड, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे श्री. भरत शिंदे, श्री. सुनील शिंदे, रणरागिणी शाखेच्या सौ. सुरेखा विद्ये, सामाजिक कार्यकर्ते श्री. दिनेश जोशी, हिंदु टाईम्सच्या संपादिका सौ. स्नेहा जोशी, श्री. रवी गाली आदी उपस्थित होते. निवेदनाची दखल घेऊन जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. सर्व हिंदुत्ववादी संघटनांच्या सततच्या प्रयत्नांमुळे सदर रेव्ह पार्टी रद्द झाली, याबद्दल सर्व संघटनांचे आभार, तसेच ईश्वरचरणी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.*श्री. सुनील घनवट*राज्य संघटक, महाराष्ट्र व छत्तीसगडहिंदू जनजागृती समिती, (संपर्क : ७०२०३८३२६४)

संबंधित पोस्ट

शासकीय कर्करोग रुग्णालयात आधुनिक यंत्रसामुग्रीचे उद्घाटन उपचार व दिलासादायक वागणूकीसाठी पुढाकार घ्या- पालकमंत्री शिरसाट

मुंबईतील धारावीत विद्यार्थ्यांना वही पेन वाटून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी..

सामाजिक न्याय विभागाच्या शिष्यवृत्ती योजनांचा लाभ घ्या – गणेश सवाखंडे

vishwatmaklokswamivarta

खरीप हंगाम २०२५-२६ साठी ३ लाख मे.टन खतांचे आवंटन मंजूर,दर्जेदार कृषी निविष्ठांच्या उपलब्धतेचे नियोजन करा- जिल्हाधिकारी स्वामी

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे निकाल लवकरच जाहीर होणार

vishwatmaklokswamivarta

पुणे महामेट्रो दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची सूचना जाहीर-लक्ष्मीपूजनाच्या दिवशी म्हणजेच २१ ऑक्टोबरला सायंकाळी सहानंतर पुणे मेट्रोची सेवा बंद

vishwatmaklokswamivarta