vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जत येथे महात्मा बसवेश्वरांचा पुतळा उभारण्यास मंजुरी- जिल्हाधिकारी अशोक काकडे

जत येथे महात्मा बसवेश्वरांचा पुतळा उभारण्यास मंजुरी- जिल्हाधिकारी अशोक काकडे

 सांगली, प्रतिनिधी.) : जत येथे महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा बसवण्यास जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पुतळा समितीच्या बैठकीत सर्वानुमते मंजुरी देण्यात आली आहे.

 जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पुतळा समितीच्या बैठकीस पुतळा समिती सदस्य सचिव तथा निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, समितीचे सदस्य पोलीस अधीक्षक यांचे प्रतिनिधी पोलीस निरीक्षक भैराप्पा तळेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता के. पी. मिरजकर, जत नगरपरिषद मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड आदि उपस्थित होते.

अध्यक्ष, महात्मा जगतज्योती बसवेश्वर बहुउद्देशीय स्मृती समिती जत यांनी जत येथील स.नं. 302/2 मध्ये महात्मा बसवेश्वर यांचा अश्वारूढ पुतळा बसविण्यास परवानगी मिळण्याबाबतचा प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाची शासन निर्णयातील मार्गदर्शक सुचनेनुसार पडताळणी केली गेली. त्यामध्ये मुख्याधिकारी नगरपरिषद जत यांचा ठराव व अहवाल, पोलीस अधीक्षक व कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग मिरज यांच्या अहवालान्वये सर्व संबंधित यंत्रणांनी मौजे जत येथील स.नं. 302/2 मध्ये महात्मा बसवेश्वर यांचा अश्वारूढ पुतळा बसविण्यास परवानगी देण्यास हरकत नसल्याबाबत अहवाल सादर केला होता.

या अनुषंगाने शासन निर्णयातील सर्व अटी व शर्तींचे पालन पुतळा उभारणाऱ्या संस्थेने / कार्यालयाने करण्याचे तसेच पुतळ्याची रचना, आकारमान इत्यादीबाबत बारकाईने निरीक्षण करण्यात येऊन लवकरात लवकर सदरचा अश्वारूढ पुतळा बसविण्याबाबतची कार्यवाही अध्यक्ष, महात्मा जगतज्योती बसवेश्वर बहुउद्देशीय स्मृती समिती जत यांनी करणे या अटी व शर्तींचे पालन करण्याच्या अटीवर जत येथील स.नं. 302/2 मध्ये महात्मा बसवेश्वर यांचा अश्वारूढ पुतळा बसविण्यास मंजुरी दिली असल्याचे आदेश जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी जारी केले आहेत.

00000

संबंधित पोस्ट

संतानी नेहमी समता आणि शांतीचा संदेश दिला-आ.अर्जुनराव खोतकर दर्गा ह. जानुल्लाह शाह (बाबा) यांचा (353) उरुस साजरा

नाफा २०२५ महोत्सवात यंदा भरगच्चं कार्यक्रम!-२५ ते २७ जुलै रोजी सॅन होजे येथील ‘द कॅलिफोर्निया थिएटर’मध्ये मराठी तारेतारकांच्या उपस्थितीत रंगणार भव्य ग्लॅमरस मराठी चित्रपट महोत्सव!

vishwatmaklokswamivarta

उद्योजकांच्या समस्या सोडवण्यास प्राधान्य-: जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी..

vishwatmaklokswamivarta

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक !हिंदु जनजागृती समिती आणि वारकरी संप्रदायाचा मोठा विजय!**वारकरी संप्रदायाची बदनामी करणारे ‘ईठ्ठला’ नाटक अखेर स्थगित;*मंत्री उदय सामंत यांची निर्मात्यांना कडक तंबी; नाव, पात्रे आणि संकल्पना बदलण्याचे आदेश..

भिवंडीत ‘मिथेनॉल’चा मोठा साठा जप्त; आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार एफडीएची धडक कारवाई

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीत 7 कोटी 94 लाख रुपयांची रक्कम वसूल…

vishwatmaklokswamivarta