vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीत 7 कोटी 94 लाख रुपयांची रक्कम वसूल…

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीत 7 कोटी 94 लाख रुपयांची रक्कम वसूल…

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी :- मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत (दि.13 डिसेंबर 2025) रोजी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये जिल्हा परिषद रायगड अंतर्गत ग्रामपंचायतींनी सक्रिय सहभाग नोंदविला. या लोक अदालतीच्या माध्यमातून घरपट्टी व पाणीपट्टी मिळून एकूण 34 हजार 030 प्रकरणे लोक अदालतीत ठेवण्यात आली होती. त्यापैकी 9 हजार 790 प्रकरणांमधून एकूण रुपये 7 कोटी 94 लाख 56 हजार 513 इतकी रक्कम वसूल करण्यात आली आहे.

  या लोक अदालतीमध्ये रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडून घरपट्टीची एकूण 27 हजार 341 प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी 8 हजार 316 प्रकरणांमधून रुपये 6 कोटी 80 लाख 14 हजार 963 इतकी घरपट्टी वसुल करण्यात आली. तसेच पाणीपट्टीची 6 हजार 689 प्रकरणे लोक अदालतीत ठेवण्यात आली असून त्यापैकी 1 हजार 474 प्रकरणांमधून रुपये 1 कोटी 14 लाख 41 हजार 550 इतकी पाणीपट्टी वसूल करण्यात आली आहे.

   अशा प्रकारे घरपट्टी व पाणीपट्टी मिळून एकूण 34 हजार 030 प्रकरणे लोक अदालतीत ठेवण्यात आली होती. त्यापैकी 9 हजार 790 प्रकरणांमधून एकूण रुपये 7 कोटी 94 लाख 56 हजार 513 इतकी रक्कम वसूल करण्यात आली आहे.

   मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या माध्यमातून ग्रामपंचायतींची आर्थिक स्वयंपूर्णता, महसूलवाढ व प्रशासकीय कार्यक्षमता वाढीस मदत होत असून, अशा उपक्रमांमुळे ग्रामीण विकासाला गती मिळत आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी शासनाच्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा तसेच उर्वरित रहिवाश्यांनी पाणीपट्टी, घरपट्टी भरणाकरणेत यावी असे आवाहन ग्रामपंचायत विभागामार्फत करण्यात येत आहे.

00000000

संबंधित पोस्ट

जिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्याला अलर्ट आज यलो अलर्ट जारी ..

जेईई मेन परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर 200 मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी ..

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र सदनात दिवंगत कर्मचाऱ्यांच्या वारसांना नियुक्तीमहाराष्ट्र शासनाच्या अनुकंपा तत्त्वावरील भरती धोरणातून अनेक कुटुंबांना दिलासा – निवासी आयुक्त आर. विमला

vishwatmaklokswamivarta

सशस्त्र दलात अधिकारी होण्याची सुवर्णसंधी; नाशिक येथे मोफत पूर्व प्रशिक्षण

सनातन संस्थेचे प्रसिद्धीपत्रक !*सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाची तयारी पूर्ण : उत्कंठा शिगेला !**गोमंतकात प्रथमच भरणार हजारो भक्तांचा कुंभमेळा !२३ देशांतील प्रतिनिधी २५ हजार भाविक  १५ पावन संतपादुका  सोमनाथ ज्योतिर्लिंग  ऐतिहासिक शस्त्रप्रदर्शन • देव, देश व धर्म जागृतीचा संदेश!

महाराष्ट्र मंदिर महासंघाचे प्रसिद्धीपत्रक ! उज्जैनच्या संतांच्या मागणीला मंदिर महासंघाचा जाहीर पाठिंबा ,गोमांस खाणारे व मूर्तीपूजा न मानणारे यांना मंदिरात प्रवेशबंदी करा ! – मंदिर महासंघ

vishwatmaklokswamivarta