vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

महाराष्ट्र सदनात दिवंगत कर्मचाऱ्यांच्या वारसांना नियुक्तीमहाराष्ट्र शासनाच्या अनुकंपा तत्त्वावरील भरती धोरणातून अनेक कुटुंबांना दिलासा – निवासी आयुक्त आर. विमला

महाराष्ट्र सदनात दिवंगत कर्मचाऱ्यांच्या वारसांना नियुक्तीमहाराष्ट्र शासनाच्या अनुकंपा तत्त्वावरील भरती धोरणातून अनेक कुटुंबांना दिलासा – निवासी आयुक्त आर. विमला

नवी दिल्ली, प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या अनुकंपा तत्त्वावरील भरती प्रक्रियेतील क्रांतिकारी सुधारणांमुळे प्रदीर्घ काळ प्रलंबित असलेल्या अनेक प्रकरणांना गती मिळाली असून, अनेक कुटुंबांची प्रतीक्षा आता संपुष्टात येत आहे. या सुधारित आणि सुलभ धोरणांचा मूर्त अनुभव आज नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात आला. या धोरणांतर्गत, तब्बल 13 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर दोन दिवंगत कर्मचाऱ्यांच्या वारसांना निवासी आयुक्त तथा सचिव आर विमला यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. यामुळे आधार गमावलेल्या या कुटुंबांना तात्काळ आर्थिक दिलासा आणि सन्मानाचे जीवन जगण्याचा आधार मिळाला आहे.

या ऐतिहासिक सुधारणांमुळेच आज दिवंगत कर्मचारी प्रदीप कुमार (सफाईगार) यांचे पुत्र आकाश कुमार यांना कक्षबंध परिचारक म्हणून, तसेच दिवंगत पुरणचंद (कक्षबंध परिचारक) यांचे पुत्र गोपाल यांनाही त्याच पदावर नियुक्ती देण्यात आली आहे. या दोन्ही कुटुंबाची नियुक्तीसाठी असलेली प्रदीर्घ प्रतीक्षा शासनाच्या नव्या व जलद धोरणामुळे संपुष्टात आली आहे. यामध्ये आकाश कुमार यांची 10 वर्षाची आणि गोपाल यांची 12 वर्षाची प्रतिक्षा संपली. या नियुक्तीमुळे पितृछत्र हरवलेल्या या दोन तरुणांना त्यांच्या कुटुंबासाठी उभे राहण्याची आणि त्यांना आर्थिक स्थैर्य देण्याची संधी मिळाली आहे.

यावेळी श्रीमती विमला म्हणाल्या की,आधार गमावलेल्या कुटुंबांना लवकरात लवकर नोकरी देऊन आर्थिक स्थैर्य देणे, ही अधिकाऱ्यांची केवळ जबाबदारी नाही, तर संवेदनशीलता आहे. या क्रांतीकारी बदलांमुळे राज्यातील अनेक कुटुंबांना आता त्वरित दिलासा मिळतो आहे. महाराष्ट्र शासनाचा हा निर्णय खऱ्या अर्थाने संवेदनशील आणि कल्याणकारी राज्याची भूमिका दर्शवतो. ही नियुक्ती केवळ दोन व्यक्तींना नोकरी देणारी नाही, तर दोन कुटुंबांना सन्मानाने जगण्याची नवी दिशा देणारी आहे.

0000

संबंधित पोस्ट

पैठण येथे नाथषष्ठी निमित्त जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विधीवत पूजा…

नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई ‘गट-ड’ संवर्गात २८४ उमेदवारांची अंतिम निवड यादी, प्रतिक्षा यादी, निवडीसाठी नकार दिलेल्या उमेदवारांची यादी, अपात्र उमेदवारांची यादी तसेच कागदपत्र पडताळणीसाठी गैरहजर उमेदवारांची यादी नोंदणी व मुद्रांक विभागाच्या https://igrmaharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर प्रसिद्ध

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या मुंबईतील स्मारकासाठी उपसभापती सचिन अहिर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक ५० वर्षांच्या मागणीला गती

खामगांव-जालना रेल्वे प्रकल्पाला मान्यता द्यावी ; केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांची भेट घेवून केली आग्रही मागणी..!!

vishwatmaklokswamivarta

राज्यात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या अनधिकृत बाईक टॅक्सी सेवांविरोधात परिवहन विभागाने कठोर भूमिका घेतली आहे.ओला,उबर आणि रॅपिडो सारख्या अनधिकृत बाईक टॅक्सी ॲप सेवा तात्काळ बंद करून संबंधित कंपनी मालकांवर एफआयआर दाखल करण्याची मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांना शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार पीक विम्याची नुकसान भरपाई अदा – पीक विमा जिल्हा व्यवस्थापक 

vishwatmaklokswamivarta