vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

12 व्या आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात संपन्न “करो योग रहो निरोग” नियमीत योगा ही आरोग्यासाठी संजीवनी आहे – पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप

12 व्या आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात संपन्न “करो योग रहो निरोग” नियमीत योगा ही आरोग्यासाठी संजीवनी आहे – पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप

 

नांदेड प्रतिनिधी- नियमीत योगा ही आरोग्यासाठी संजीवनी आहे. सर्वांनी या योग दिनाच्या औचीत्याने नियमीत योगा करुन आपले आरोग्य सुदृढ करावे, असे आवाहन नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले. यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी ‘करो योग रहो निरोग’ 12 वा आंतरराष्ट्रीय योग दिवस निमित्य सर्वांना शुभेच्छा दिल्या.

आयुष मंत्रालय, भारत सरकारच्या वतीने 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगा दिन म्हणून आयोजित करण्याचे निर्देश होते. मा.पंतप्रधान महोदयांनी सन 2014 च्या राष्ट्रीय महासभेत 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगादिन म्हणून दरवर्षी साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. त्यानुषंगाने दरवर्षी 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगा दिन म्हणून जगभरात मोठया उत्साहाने साजरा करण्यात येतो. योगा दिनाच्या निमीत्ताने जगभरात योगासनाची परंपरा स्वीकारणे व ती अंगीकारणे, ही आपल्या देशासाठी अभिमानाची बाब आहे. कारण, योगा हा आपल्या भारतीय संस्कृती वारसाचा अविभाज्य घटक आहे.

आयुष मंत्रालय, भारत सरकार, महाराष्ट्र शासन, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य,पुणे, जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड, शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, नांदेड, जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालय, युवा अधिकारी माय भारत, लोकत समुह सखी मंच, योग विदया धाम, पतंजली योग समिती, आर्ट ऑफ लिवींग या कार्यक्रम प्रसंगी जिल्हा योग संघटना, नांदेड, योग विद्येचा प्रसार करणाऱ्या स्थानिक संस्थांचे प्रतिनिधी व विविध खेळ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने 21 जून, 2026 रोजी सकाळी 7 वा. पोलीस कवायत मैदान, वजिराबाद, नांदेड येथे या 12 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमास नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेवे आयुक्त महेशकुमार डोईफोडे, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, किनवट डॉ. बी. सरवणन, पोलीस उपअधिक्षक श्रीमती अश्विनी जगताप, युवा अधिकारी, युवा भारत श्रीमती अस्नी कनकटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, माध्यमिक शिक्षणाधिकारी माधव सलगर, सहा. आयुक्त, समाजकल्याण शिवानंद मिनगीरे, लोकमत वृत्त संपादक राजेश निस्ताने, लोकमत उप सरव्यवस्थापक रमेश तावडे, जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे, उपशिक्षणाधिकारी माध्य. रामचंद्र पाचंगे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. सर्व उपस्थित मान्यवरांचे शिक्षणाधिकारी माध्यमिक माधव सलगर व जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी पुष्पगुच्छ देवुन स्वागत केले.

याप्रसंगी पतंजली योग समिती, योग विदया धाम, व आर्ट ऑफ लिवींग यांचे मार्फत उपस्थितांना आयुष मंत्रालय, भारत सरकारच्या प्रोटोकाल नुसार राम शिवपनोर (अध्यक्ष भारत स्वभीमान), सौ. महानंद माळगे (सोशल मिडीया), नागोराव पोलादवार (योगा प्राध्यापक), विठठल तुम्मोड (योग अध्यापक), श्रीमती सारिता जोशी (योग शिक्षक), शिवा बिरकले (आर्ट ऑफ लिव्हिंग शिक्षक, श्रीश्री योगा क्षेत्रीय समन्वयक), डॉ. प्रियंका गंगातिरे आर्ट ऑफ लिव्हिंग स्वयंसेवक आदीनी योगासनाचे धडे दिले. याप्रसंगी पंढरीनाथ कंठेवाड, महारुद्र माळगे, डॉ. सायन्ना मठठमवार, श्रीमती कविता आष्टुरकर, ॲड. मणिकुमारी बत्तूला (डांगे) व स्नेहल कोळणुरकर आदीनी योगसाधकाच्या कृतीमधील सुधारणा करण्याचे काम केले. कार्यक्रमाचे सुत्र संचलन श्रीमती सपना भागवत (लोकमत समुह) यांनी तर आभार प्रदर्शन राज्य क्रीडा मार्गदर्शक तथा कार्यासन बालाजी शिरसीकर यांनी केले.

या योग दिन कार्यक्रमासाठी जिल्हयातील ऑक्सफर्ड द ग्लोबल स्कुल, नांदेड, ऑक्सफर्ड द इंग्लिश मेडीय स्कुल, गुरुकुल इंग्लिश मे.स्कुल, पिनॅकल इंटरनॅशनल स्कुल,नांदेड, नेहरु इंग्लिश स्कुल, नांदेड, केंब्रीज हायस्कुल, नांदेड, इंदिरा इंटरनॅशनल स्कुल, नांदेड व विविध शाळा/संस्थेतील विदयार्थी, जिल्हयातील एकविद्य क्रीडा संघटनेचे खेळाडू मुले-मुली व पदाधिकारी तसेच महाराष्ट्र महिला पोलीस संघ, नांदेड जिल्हा स्काऊटस व गाईडस यांची विशेष उपस्थितीत होती तसेच जिल्हयातील विविध शासकीय कार्यालयाचे अधिकारी/कर्मचारी, पोलीस अधिकारी/ कर्मचारी, नांदेड जिल्हा योग संघटना व योग विद्येचा प्रसार करणा-या स्थानिक संस्थांचे प्रतिनिधी व योगप्रेमी आदीनी उत्सफुर्तपणे सहभाग नोंदवला.

सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांचे मार्गदर्शनाखाली कार्यासन प्रमुख राज्य क्रीडा मार्गदर्शक बालाजी शिरसीकर, तालुका क्रीडा अधिकारी विजय काकडे, क्रीडा ‍अधिकारी संजय बेतीवार, राज्य क्रीडा मार्गदर्शक श्रीमती शिवकांता देशमुख, चंद्रप्रकाश होनवडजकर, क्रीडा अधिकारी राहुल श्रीरामवार, विपुल दापके, जिल्हा संघटक गाईड श्रीमती रुपाली मुधोळकर, कनिष्ठ लिपीक दत्तकुमार धुतडे, कु. रोहीणी घंटेवाड, संजय चव्हाण, हनमंत नरवाडे, मोहन पवार, सुभाष धोंगडे, चंद्रकांत गव्हाणे, विद्यानंद भालेराव, यश कांबळे, आदिनी सहकार्य केले, असे जिल्हा क्रीडा अधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.

0000Maharashtra DGIPR विभागीय माहिती कार्यालय,

संबंधित पोस्ट

क्रीडा व युवक कल्याण विभागामार्फत6, 7 डिसेंबरला ग्लोबल युथ फेस्टिव्हल 2025

vishwatmaklokswamivarta

बॅकिंग क्षेत्रात अधिक पारदर्शकतेसाठी डी-डुप्लिकेशन तंत्रज्ञानाचा अवलंब करणे गरजेचे – जिल्हाधिकारी आंचल गोयल

vishwatmaklokswamivarta

उष्णतेच्या तीव्र लाटेचा हवामान विभागाचा इशारा

हिंद दी चादर श्री गुरुतेग बहादुर यांच्या ३५० वे शहीदी समागम वर्ष-जिल्ह्यातील शाळांमध्ये माहितीपट प्रदर्शन, चित्रकला स्पर्धा, प्रभात फेरी

vishwatmaklokswamivarta

मुंबईत साकारणार ‘आयआयसीटी’- माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव

आदर्शवत समन्वयातून कोल्हापूर जिल्ह्यात यशस्वी पूरनियंत्रण