vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

विदर्भ व मराठवाडा दूग्ध विकास प्रकल्पा अंतर्गत आता पशुपालकांना 100 टक्के अनुदानावर चारा बियाणे-अनुदानासाठी पशुपालकांनी विहित कालावधीत अर्ज करावेत -जिल्हाधिकारी

विदर्भ व मराठवाडा दूग्ध विकास प्रकल्पा अंतर्गत आता पशुपालकांना 100 टक्के अनुदानावर चारा बियाणे-अनुदानासाठी पशुपालकांनी विहित कालावधीत अर्ज करावेत -जिल्हाधिकारी

नांदेड, प्रतिनिधी : चारा बियाण्यांवरील 100 टक्के अनुदानामुळे पशुपालकांचा खर्च कमी होऊन त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे पशुपालकांनी चारा बियाण्यांवरील अनुदानासाठी विहित वेळेत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

.जिल्ह्यातील दूग्ध उत्पादनाच्या वाढीस चालना देण्यासाठी विदर्भ व मराठवाडा दूग्ध विकास प्रकल्प टप्पा- 2 राबविण्यात येत आहे. दुधाळ जनावरांसाठी दर्जेदार चारा उपलब्ध व्हावा, या दृष्टिकोनातून पशुपालकांना मान्सून पूर्व सुधारित जातीचे वैरण बियाणे पेरण्यासाठी जिल्ह्यामध्ये विदर्भ व मराठवाडा दूग्ध विकास प्रकल्प अंतर्गत शंभर टक्के अनुदानावर शुगर ग्रेझ, स्पीड फीड ज्वारी व सुधारित मका बियाणे वाटप करण्यात येणार आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारी व खाजगी दूध डेअरी तसेच दूध उत्पादक संघांना दूध पुरवठा करणारे पशुपालक पात्र ठरणार आहेत. इच्छुक लाभार्थ्यांनी www.vmddp.com या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा.

अर्जासाठी आधार कार्ड, रेशन कार्ड, किमान एक एकर जमिनीचा सातबारा उतारा, पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचे दूध पुरवठा प्रमाणपत्र तसेच किमान तीन दुधाळ जनावरांचे टॅग क्रमांक आवश्यक आहेत.

दर्जेदार चाऱ्यामुळे दुभत्या जनावरांना सकस आहार मिळणार असून, यामुळे पशुधनाचे आरोग्य सुधारण्यास आणि दूध उत्पादन वाढीस मदत होणार असल्याचे पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाचे जिल्हा उपआयुक्त डॉ. सखाराम बी. खुणे यांनी सांगितले.

00000

संबंधित पोस्ट

मतदान केंद्र परिसरात प्रतिबंधीत आदेश

vishwatmaklokswamivarta

पाकिस्तानच्या वाढत्या तणावात- केंद्रीय गृह मंत्रालयाने उद्या संपूर्ण देशात देशव्यापी सुरक्षा मॉक ड्रिल करण्याचे आदेश दिले आहेत

एफएसएसएआयचा उपक्रम; खाद्य पदार्थ विक्रेत्यांसाठी एक दिवशीय प्रशिक्षण-केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची प्रमुख उपस्थिती

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे,सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली व ऐरोली या विभागात तसेच नमुंमपा क्षेत्रातील मुख्य जलवाहिनीवरील थेट नळजोडण्यांचा व सिडको क्षेत्रातील खारघर व कामोठे नोड मधील पाणी पुरवठा बंद

एमएचटी-सीईटी 2026 परीक्षा केंद्रांच्या ठिकाणी मनाई आदेश जारी

दादर, मुंबई येथे नवीन गुन्हे अन्वेषण मंडळ (CIB) या सामाजिक संस्थे कार्यालयाचे उद्घाटन संपन्न