vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

उष्मालाटेच्या पार्श्वभूमीवर खाजगी क्लासेससाठी आदेश निर्गमित सकाळ-सायंकाळच्या सत्रात किंवा ऑनलाईनच्या माध्यमातून क्लासेस घ्यावेत..

उष्मालाटेच्या पार्श्वभूमीवर खाजगी क्लासेससाठी आदेश निर्गमित सकाळ-सायंकाळच्या सत्रात किंवा ऑनलाईनच्या माध्यमातून क्लासेस घ्यावेत..

नांदेड, प्रतिनिधी:- नांदेड जिल्ह्यात वाढत्या तापमानाची तीव्रता लक्षात घेवून उष्मालाटेमुळे कोणतीही आपत्कालीन परिस्थीती उद्भवू नये व विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होवू नये यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी राहुल कर्डिले यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 30 अन्वये नांदेड जिल्हा सीमा क्षेत्रातील सर्व खाजगी क्लासेसबाबत आदेश निर्गमित केले आहेत.

नांदेड जिल्ह्यातील सर्व खाजगी क्लासेसनी सकाळी-सायंकाळच्या सत्रात किंवा ऑनलाईन-डिजीटल माध्यमातून क्लासेस घेण्यात यावेत. दुपारी 12 ते 4 या वेळेत कुठल्याही खाजगी क्लासेस संस्थानी व्यक्तीश: विद्यार्थ्यांना बोलावून क्लासेस घेवू नयेत. याबाबत वेळोवेळी हवामान खात्यामार्फत निर्गमित केल्या जाणाऱ्या हवामान इशाऱ्याची देखील नोंद घ्यावी. तसेच विद्यार्थ्यांना उष्मालाटेपासून संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. जसे की, पुरेसे पाणी, सावलीची व्यवस्था, आरोग्यविषयक सूचना इ. कराव्यात. पालकांना याबाबत योग्य मार्गदर्शन करावे. हा आदेश 31 मे 2026 पर्यंत वैध राहील. या आदेशाचे पालन न केल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 नुसार कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ नागरिकांसाठी लाभदायी; एका छताखाली २३ शासकीय सेवा– उपजिल्हाधिकारी प्रशांत पानवेकर

कोणत्याही खाजगी अथवा अनधिकृत / शालेय परवाना नसलेल्या वाहनातूनशालेय विद्यार्थ्यांच्या पालकांना आपल्या पाल्यास शाळेत पाठवू नये

रब्बी हंगामात प्रमाणित बियाणे वितरणास सुरुवात; शेतकऱ्यांना लाभ घेण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल; पुरवठादारांकडून निविदा मागविल्या

vishwatmaklokswamivarta

आषाढी वारीनिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या विशेष स्वच्छता पथकाचे पंढरपूर नगरी स्वच्छता कार्य

प्रभाग रचना प्रक्रिया 30 जून अखेर पूर्ण करावी- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी