vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतरस्थानिक बातम्या

छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ नागरिकांसाठी लाभदायी; एका छताखाली २३ शासकीय सेवा– उपजिल्हाधिकारी प्रशांत पानवेकर

छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ नागरिकांसाठी लाभदायी; एका छताखाली २३ शासकीय सेवा– उपजिल्हाधिकारी प्रशांत पानवेकर

मुंबई, प्रतिनिधी : महसूल विभाग अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि गतिमान करण्याच्या उद्देशाने शासनाच्या विविध योजना व सेवा तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात, यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान’ अंतर्गत १८६ मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातील शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. एका छताखाली २३ शासकीय सेवांसह विविध कल्याणकारी योजनांचा लाभ नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत असल्याची माहिती मुंबई शहर चे उपजिल्हाधिकारी प्रशांत पानवेकर यांनी दिली.

श्री लक्ष्मीनारायण मंदिर आणि माधवबाग चॅरिटीज येथे आयोजित शिबिरात बोलताना प्रशांत पानवेकर म्हणाले की, मुंबई शहर जिल्ह्यात एकाच दिवशी तीन ठिकाणी अशी शिबिरे आयोजित करण्यात आली. विविध शासकीय योजनांची माहिती आणि त्यांचा प्रत्यक्ष लाभ एकाच ठिकाणी नागरिकांना मिळणे, हेच या अभियानाचे यश आहे. या उपक्रमाची माहिती अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहनही त्यांनी केले.

 राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जन्मदिवस; तसेच माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून मुंबई शहर जिल्ह्यामध्ये २२ जुलै, २०२६ ते ०२ ऑगस्ट, २०२६ या कालावधीत प्रत्येक विधानसभा मतदारसंघात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई शहर तर्फे आयोजन करण्यात आले आहे.

महसूल विभागामार्फत महसुली दाखले, आधार सेवा, दिव्यांग सेवा, संजय गांधी निराधार योजना, रेशन कार्ड विषयक सेवा, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध सेवा आदींसह एकूण २३ शासकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. तसेच रक्तदान शिबिर, नेत्ररोग तपासणी आणि आरोग्य तपासणी अशा सेवाही दिवसभर नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या.

यावेळी माजी आमदार अतुल शहा यांनी राज्य शासनाने विविध योजना सर्वसामान्यांच्या दारापर्यंत पोहोचविल्याबद्दल समाधान व्यक्त करत नागरिकांनी शासकीय योजनांचा तसेच रक्तदान शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमास बृहन्मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक आकाश पुरोहित, नगरसेविका संपदा मयेकर, नगरसेविका रिटा मकवाना, माजी आमदार अतुल शहा यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरूपात ३४ लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव पांगम यांनी, तर आभार प्रदर्शन तहसीलदार अश्विनी जाधव यांनी केले.

0000

 

 

 

 

संबंधित पोस्ट

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या हस्ते पारसिक हिलवर वृक्षारोपण नवी मुंबईत आठही विभागांत 2000 हून अधिक देशी वृक्षारोपांची लागवड..

मतदार यादी पुनरीक्षण : नोटीस प्राप्त मतदारांची कागदपत्रे बीएलओ घरी जाऊन स्वीकारणार**जुळवणी न झालेल्या किंवा तार्किक विसंगती असलेल्या प्रकरणांत नियमित प्रत्यक्ष सुनावणीची आवश्यकता नाही*

जालन्यात आज सकल मराठा समाज संवाद मेळावाआ. संजय कुटे, आ. अर्जुनराव खोतकर, आ. नारायण कुचे, आ. हिकमत उढाण यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार; पत्रकार-संपादकांचाही होणार गुणगौरव..

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र शासनाचे चार, १५, २१, २६ वर्षे मुदतीचे रोखे विक्रीस

तरुणांच्या आंदोलनाचा विजय झाला. धर्मेंद्र प्रधानांना राजीनामा द्यायला तरुणांनी भाग पाडलं. आम्ही कोणाचं ऐकणार नाही, कोणाशी बोलणार नाही, आम्हाला कोणी सांगायचं नाही असा या सरकारचा जो माज होता तो या आंदोलकानी उतरवला राज ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख यांची पत्रकार परिषद

vishwatmaklokswamivarta

बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेत सातत्यपूर्ण कौशल्यवृद्धी ही काळाची गरज – जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष- पंडित दीनदयाळ उपाध्याय जिल्हास्तरीय रोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद- 460 हून अधिक उमेदवारांची प्राथमिक निवड- 30 नामांकित कंपन्यांचा सहभाग; 813 रिक्त पदांसाठी 2000 पेक्षा अधिक उमेदवारांची उपस्थिती