जालन्यात आज सकल मराठा समाज संवाद मेळावाआ. संजय कुटे, आ. अर्जुनराव खोतकर, आ. नारायण कुचे, आ. हिकमत उढाण यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार; पत्रकार-संपादकांचाही होणार गुणगौरव..
जालन्यात आज सकल मराठा समाज संवाद मेळावाआ. संजय कुटे, आ. अर्जुनराव खोतकर, आ. नारायण कुचे, आ. हिकमत उढाण यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार; पत्रकार-संपादकांचाही होणार गुणगौरव..
जालना (प्रतिनिधी) : छत्रपती व्ही. के. फाउंडेशन आणि छावा महाराष्ट्र सेना, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने सकल मराठा समाज संवाद मेळावा तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार व गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. रविवार, दि. ६ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १ वाजता भाग्यनगर येथील मराठा सेवा संघ कार्यालयात हा कार्यक्रम होणार आहे. शेतकरी, नागरिक तसेच समाजाच्या मूलभूत प्रश्नांना विधानसभेत प्रभावीपणे वाचा फोडून न्याय मिळवून देण्यासाठी कार्य करणारे जलसम्राट आ. डॉ. संजय कुटे, आ. अर्जुनराव खोतकर, आ. नारायण कुचे आणि आ. हिकमत उढाण यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात येणार आहे. तसेच सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचाही गौरव करण्यात येणार आहे. कार्यक्रमास माजी मंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. संजय कुटे, माजी मंत्री तथा अंदाज समिती प्रमुख आ. अर्जुनराव खोतकर, घनसावंगीचे आ. हिकमत उढाण, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष आ. नारायण कुचे तसेच पक्षाचे प्रवक्ते विनोद वाघ हे विशेष अतिथी व सत्कारमूर्ती म्हणून उपस्थित राहणार आहेत.
भास्कर आबा दानवे शहर जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी प्रा. सोपानराव तेलगढ मा. जिल्हाध्यक्ष मराठा सेवा संघ जालना विष्णूभाऊ पाचपुले, शिवसेनेचे शहर जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख, मल्हार योद्धा दीपकभाऊ बोऱ्हाडे, पंचायत समिती जालना सभापती मुरली आबा थिटे,किशोर पाटील शिरावत, संस्थापक अध्यक्ष छावा महाराष्ट्र सेना, जिल्हाध्यक्ष ज्योतीराम माने, अंकुश भाऊ चव्हाण खोतकर समर्थक
संस्थापक कोषाध्यक्ष संभाजी ब्रिगेड संतोष गाजरे, प्राचार्य डॉ. प्रसाद मदन, प्रसिद्ध विधिज्ञ अॅड. अरविंद मुरमे, सभापती सुजित जोगस, नगरसेविका सुलोचना गोर्डे, माजी जिल्हा परिषद सदस्य कल्पनाताई शिंदे, महानगरपालिका गटनेते महेश निकम, मा. जिल्हा परिषद सदस्य कृष्णा जाधव, मराठा महासंघाचे कोषाध्यक्ष अशोकराव पडुळ, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष कैलाश खांडेभराड, पंचायत समिती बदनापूर सभापती संजय जगदाळे, शिवसेना तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते रामप्रसाद बोराडे, पंचायत समिती सदस्य अरुण डोळसे, जिल्हा परिषद सदस्य गणेशराव डोळस, सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय लोढे, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक प्रशांत वाडेकोर, शंकरराव बेंदरे, बाबुराव शिंदे, नगरपंचायत बदनापूरचे गटनेते बाबासाहेब कराळे आणि सुमन ताई शेळके उद्योजक अंबड,संभाजी ब्रिगेडच्या विभावरी ताकट यांचा गौरव करण्यात येणार आहे.
समाजातील प्रश्नांना वाचा फोडण्यासह पत्रकारितेच्या माध्यमातून जनहिताचे प्रश्न मांडणाऱ्या पत्रकार व संपादकांचाही यावेळी गुणगौरव करण्यात येणार आहे. पत्रकार परिषद जालनाचे अध्यक्ष अंकुश आप्पा देशमुख, प्रेस क्लब जालनाचे अध्यक्ष मकरंद जागिरदार, व्हॉइस ऑफ मीडियाचे अध्यक्ष राजेश भालेराव, प्रेस कौन्सिलचे अध्यक्ष दीपक शेळके, ज्येष्ठ पत्रकार शेख महेमुद, संपादक भरत मानकर, संपादक संतोष भुतेकर, संपादक अविनाश कव्हळे, संपादक मनोज कोलते पाटील, संपादक अर्पण गोयल, आमिर खान, अंकुश गायकवाड, अलमखान पठाण, उपसंपादक संजय शेलकर, पत्रकार संजय उनगे, पत्रकार सुनील डोळसे, रवि शिंदे आणि संपादक विकास बागडी यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.
सकल मराठा समाजातील विविध प्रश्न, शेतकरी आणि नागरिकांच्या समस्या, सामाजिक व शैक्षणिक प्रश्न तसेच समाजाच्या भविष्यातील वाटचालीबाबत या संवाद मेळाव्यात विचारविनिमय होणार आहे. विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या मान्यवरांची उपस्थिती आणि समाजातील नागरिकांशी थेट संवाद हे या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. कार्यक्रमास सकल मराठा समाजातील नागरिकांनी सहकुटुंब, सहपरिवार व मित्रपरिवारासह मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. कार्यक्रमाचे आयोजन छत्रपती व्ही. के. फाउंडेशनचे अध्यक्ष तथा प्रेस क्लब जालना सचिव विष्णू कदम आणि छावा महाराष्ट्र सेनेचे युवक अध्यक्ष निखिल वीर यांच्या पुढाकारातून करण्यात आले आहे. सोपन एखंडे, बाबासाहेब बुटरे, राम उजेड, उद्धवराव गुळमकर आणि भागवत काळे यांच्यासह अमोल जाधव हे संयोजनाची जबाबदारी पाहत आहेत. श्रावण भुजोड, नामदेव काळे, शंकर जाधव, राजाभाऊ गुलगे, बळीराम घाटे, लक्ष्मण काटे, डॉ. सुभाष बीटले, गणपत जाधव, प्रकाश मस्के, अशोक काळे, रामजी कोरडे आणि प्रभाकर शिंदे यांच्यासह कार्यकर्ते कार्यक्रमाच्या आयोजनासाठी परिश्रम घेत आहेत.