vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

खरोळा सर्कलच्या विकासाचे शिल्पकार आदरणीय श्री. रमेशअप्पा कराड साहेबांचा सत्कार समारंभ…

खरोळा सर्कलच्या विकासाचे शिल्पकार आदरणीय श्री. रमेशअप्पा कराड साहेबांचा सत्कार समारंभ…

लातूर प्रतिनिधी-कित्येक वर्षे विकासापासून मुकलेल्या आपल्या खरोळा सर्कलला विकासाच्या दृष्टीकोनातून सर्वोच्च स्थानी बसविण्यात नेहमीच अग्रगण्य असलेले विकासाभिमुख आमदार श्री. रमेशअप्पा कराड साहेबांनी यांचा खरोळा जिल्हा परिषदेच्या अत्यंत अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचा मोठ्या मताधिक्याने विजय झाल्याने खरोळा जिल्हा परिषद भारतीय जनता पार्टीच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला.👏🏻

निवडणुकीत मागील काळात भाजपच्या माध्यमातून झालेल्या विकास कामांना मतदारांनी मोठे समर्थन दिल्याने आदरणीय श्री. रमेशअप्पा कराड साहेबांच्या नेतृत्वातील भाजपाच्या उमेदवार सौ. शिवकन्या महेंद्र गोडभरले या मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या त्याचबरोबर खरोळा पं.स गणातील सौ. शितल प्रताप राऊतराव आणि कारेपूर पं.स गणातील सौ. अंजली राजेश काळे दोन्ही पंचायत समितीचे उमेदवार विजयी झाले. 👏🏻

निवडणुकीच्या काळात ज्या ज्या गावात मतदारांना विकास कामाबाबत जे शब्द दिले आहेत, ती सर्व विकासकामे येत्या काळात पूर्ण करू, असे वचन यावेळी बोलताना आदरणीय श्री. रमेशअप्पा कराड साहेबांनी दिले.😍

या सत्कार समारंभाप्रसंगी, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष श्री. ओमप्रकाशजी गोडभरले, श्री. हणमंत (काका) राऊतराव, श्री. सुधाकर काळे, श्री. वसंत करमुडे, श्री. रमाकांत फुलारी, श्री. सुरेंद्र गोडभरले, श्री. ओंकारअप्पा शिरसागर, श्री. दगडू महाराज पुरी, श्री. बाबुरावअण्णा माने, श्री. अंगद कापसे, श्री. उत्तम जगताप, श्री. बालाजी फड, श्री. उद्धव घोडके, श्री. राम ठोंबरे, श्री. ऋषिकेश गायकवाड, श्री. चांद शेख, श्री. रानबा काळे, श्री. भागवत होळकर, श्री. शंकर माने, श्री. चंद्रकांत कापसे, श्री. ओंकार पल्ले, श्री. प्रल्हाद फुलारी, श्री. सोमनाथ फुलारी, श्री. बालाजी मानमोडे, श्री. शिवाजी राऊतराव, श्री. नितीन राऊतराव, श्री. श्रीराम राऊतराव, श्री. बालकीशन आइडे, श्री. मुस्तफा ताशेवाले, श्री. दिलीप गौड, श्री. सचिन पल्ले यांच्यासह खरोळा जिल्हा परिषद मतदार संघातील भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000

संबंधित पोस्ट

राष्ट्रीय एकता दिनानिमित्त पदयात्रादेशाच्या एकात्मतेसाठी कटीबद्ध राहू या- इमाव कल्याण मंत्री अतुल सावे

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय पोषण माह’च्या माध्यमातून महिला व बालकांच्याआरोग्यासंदर्भात जनजागृती- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे‘आठव्या राष्ट्रीय पोषण माह’चे १७ सप्टेंबर रोजी उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात मुसळधार, ६८ मंडळांमध्ये अतिवृष्टी,३५४ नागरिकांची पुराच्या वेढ्यातून सुटका; प्रशासन सतर्क मुख्यमंत्री फडणवीस जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात..

vishwatmaklokswamivarta

हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंतीनिमित्त अभिवादन

नवीन पाच पोलीस चौकींमुळे नागपुरच्या सुरक्षिततेला मिळणार बळ – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे पाच पोलीस चौकींचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजनेची व्याप्ती वाढवणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे