vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतरस्थानिक बातम्या

कोणत्याही खाजगी अथवा अनधिकृत / शालेय परवाना नसलेल्या वाहनातूनशालेय विद्यार्थ्यांच्या पालकांना आपल्या पाल्यास शाळेत पाठवू नये

कोणत्याही खाजगी अथवा अनधिकृत / शालेय परवाना नसलेल्या वाहनातूनशालेय विद्यार्थ्यांच्या पालकांना आपल्या पाल्यास शाळेत पाठवू नये

ठाणे प्रतिनिधी :- बदलापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद क्र. 56/2026, दि.25 फेब्रुवारी 2026, बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012, कलम 12, 8. तसेच भारतीय न्याय संहिता (बी.एन.एस.) कलम 74, 75, 79 नुसार नोंदविण्यात आला आहे. या गुन्हयातील आरोपी वाहनचालक इसम नामे जयेश काळूराम मुने हा असून गुन्ह्यात वापरण्यात आलेले वाहन मोटार बस क्र. MH-05AZ-0754 हे बस संवर्गातील वाहन आहे. या अत्याचाराची घटना नमूद वाहनांमध्ये झाल्याची नोंद एफ.आय.आर. मध्ये करण्यात आले आहे. तसेच गुन्ह्यातील जप्त वाहनास मोटार वाहन नियमाप्रमाणे रु.19 हजार 500/- दंडात्मक कारवाई करून वाहनाची नोंदणी निलंबन करण्याकरिता वाहनमालकास कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे गुन्ह्यातील आरोपी वाहनचालक यांची अनुज्ञप्ती निलंबित करण्यात आली आहे

माहे एप्रिल 2025 ते फेब्रुवारी 2026 या कालावधीत एकूण 730 वाहनांवर स्कुलबस नियमाप्रमाणे कारवाई करून रु.11 लाख 32 हजार 250/- इतका दंड वसूल करण्यात आला आहे.

तरी कोणत्याही खाजगी अथवा अनधिकृत / शालेय परवाना नसलेल्या वाहनातून सर्व शालेय विद्यार्थ्यांच्या पालकांनी त्यांच्या पाल्यास विद्यार्थ्यांना शाळेत पाठवू नये, असे आवाहन कल्याणचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांनी केले आहे.

000000000

संबंधित पोस्ट

जलपुनर्भरणासंदर्भात व्यापक जनजागृती करावी – जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवड्याचे उद्‌घाटन

मुंबई उपनगर ग्रंथोत्सवाचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते १२ फेब्रुवारीला उद्घाटन १२ व १३ फेब्रुवारीला ग्रंथदिडी, ग्रंथ प्रदर्शन, ग्रंथ विक्री, चर्चासत्र व मार्गदर्शन भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

महामार्गावरील  अनधिकृत पार्किंग, अतिक्रमणांवर कठोर कारवाई करा- विभागीय आयुक्त जी. श्रीकांत,महामार्ग सुरक्षा उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणी करून पंधरवड्याला अनुपालन अहवाल सादर करण्याचे आदेश

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी समता, न्यायाचे राज्य प्रस्थापित केले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

बालविवाहाच्या घटना रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आखाव्यात- जिल्हाधिकारी अशोक काकडे- संबंधित यंत्रणांनी जिल्ह्यात बालविवाह प्रकरणे होणार नाहीत याची दक्षता घ्यावी

vishwatmaklokswamivarta

आताच मोठी बातमी-अतिवृष्टीचा फटका, सरकारकडून तातडीची मदत 🌧️ पूरग्रस्त शेतकऱ्यांना आणि नागरिकांना दिलासा ज्यांच्या घरात पाणी शिरलं त्यांना ₹१०,००० आणि गहू-तांदूळ देण्यास सुरुवात. – मुख्यमंत्री फडणवीस सरकारकडून मदतकार्य वेगात सुरू!