vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

पुणे विमानतळावरून पहाटेच्या वेळी दिल्लीकडे जाणारे इंडिगो विमानात तांत्रिक बिघाड- प्रवाशांचा गोंधळ

पुणे विमानतळावरून पहाटेच्या वेळी दिल्लीकडे जाणारे इंडिगो विमानात तांत्रिक बिघाड- प्रवाशांचा गोंधळ

पुणे प्रतिनिधी-पुणे विमानतळावरून पहाटेच्या वेळी दिल्लीकडे जाणारे इंडिगो एअरलाईन्सचे विमान सुमारे तीन तास दहा मिनिटे उशिराने सुटल्यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड गोंधळ आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. विमानाला झालेल्या या मोठ्या विलंबामागे तांत्रिक बिघाड कारणीभूत असल्याचे एअरलाईनकडून सांगण्यात आले असले, तरी वेळेवर कोणतीही माहिती न मिळाल्याने संतप्त प्रवाशांनी एअरलाईन कर्मचाऱ्यांना घेराव घातला.

पुणे विमानतळावरून पहाटेच्या वेळी सुटणाऱ्या विमानांमध्ये व्यावसायिक आणि नोकरीसाठी दिल्ली तसेच अन्य शहरांमध्ये जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. अनेक प्रवासी दिल्लीतून पुढील विमाने पकडणार असल्याने त्यांच्यासाठी हा विलंब अत्यंत महत्त्वाचा होता. इंडिगोचे विमान पहाटे चार वाजून वीस मिनिटांनी पुणे विमानतळावरून दिल्लीसाठी उड्डाण करणार होते. मात्र, तांत्रिक कारणांमुळे हे विमान पहाटेच्या निर्धारित वेळेवर उड्डाण करू शकले नाही. अखेरीस, हे विमान सकाळी सात वाजून तीस मिनिटांनी दिल्लीकडे रवाना झाले. यामुळे प्रवाशांना तब्बल तीन तास दहा मिनिटे विमानतळावर ताटकळत बसावे लागले

विमान उड्डाणासाठी वेळेवर सज्ज नसल्यामुळे हा मोठा विलंब झाला. एअरलाईनच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानाच्या तपासणीदरम्यान काही तांत्रिक बिघाड आढळून आला. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक दुरुस्ती पूर्ण करण्यास वेळ लागला, त्यामुळे उड्डाणाला विलंब झाला. मात्र, हा तांत्रिक बिघाड कधी लक्षात आला आणि दुरुस्तीसाठी नेमका किती वेळ लागणार आहे, याची स्पष्ट आणि त्वरित माहिती एअरलाईन कर्मचाऱ्यांनी दिली नाही. यामुळेच गोंधळ अधिक वाढला. पहाटेच्या वेळी विमानतळावर पुरेसे कर्मचारी उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहीत. प्रत्येक वेळी वेगवेगळी माहिती मिळत असल्यामुळे प्रवाशांचा संताप वाढला

संबंधित पोस्ट

हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार पालघर जिल्ह्याला अतिवृष्टीचा रेड अलर्ट इशारा जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळा व महाविद्यालयांना आज दिनांक ०७ जुलै २०२५ रोजी सुट्टी जाहीर

vishwatmaklokswamivarta

आयुष्मान भारत आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेमुळे वारकऱ्याचे वाचले प्राण..

जादूटोणा व अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी -अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ,विज्ञान युगातही अंधश्रद्धेचा विळखा जनतेला फसवल्यास सात वर्षापर्यंत शिक्षा…

बँकांनी ग्राहकांच्या तक्रारीची गंभीरतेने दखल घ्यावी अन्यथा रिझर्व बँक कारवाईचा बडगा उगारणार, जनजागृती कार्यक्रम आणि बँकिंग तक्रार निवारण कार्यशाळेचे आयोजन

मुंबईतील लालबाग येथून लालबागचा राजा राजा गणेश उत्सव सोहळ्याचे गणपती बाप्पाचे दर्शन घ्या थेट पहा लाईव्ह प्रक्षेपण-: https://vishwatmaklokswamivarta.com/ आपल्या या विश्वात्मक लोक स्वामी वार्ता वेब पोर्टलवर 24 तास आपण गणपती बाप्पाचे दर्शन घेऊ शकता चला तर भेट द्या

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिका लोककल्याण मेळावा अंतर्गत फेरीवाल्यांसाठी अन्न सुरक्षा प्रशिक्षण संपन्न..