vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबई महानगरपालिकेच्या घन कचरा व्यवस्थापन खात्याच्या प्रमुख अभियंता पदी श्री विनायक कृष्णा भट व सहाय्यक कामगार अधिकारी पदी श्रीमती इंगळे  यांची नियुक्ती

मुंबई महानगरपालिकेच्या घन कचरा व्यवस्थापन खात्याच्या प्रमुख अभियंता पदी श्री विनायक कृष्णा भट व सहाय्यक कामगार अधिकारी पदी श्रीमती इंगळे  यांची नियुक्ती

मुंबई प्रतिनिधी*मुंबई महानगरपालिकेच्या घन कचरा व्यवस्थापन खात्याच्या प्रमुख अभियंता पदी श्री. विनायक कृष्णा भट व सहाय्यक कामगार अधिकारी पदी श्रीमती इंगळे मॅडम यांची नियुक्ती प्रित्यर्थ म्युन्सिपल कर्मचारी युनियन चे सरचिटणीस श्री नवनाथ महारनवर यांच्या सह मुख्य पर्यवेक्षक श्री सांगळे साहेब व घन कचरा व्यवस्थापन खात्यातील सहाय्यक मुख्य पर्यवेक्षक, पर्यवेक्षक तसेच युनियन पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पुष्पगुच्छ देऊन दोहोंचा सन्मान करण्यात आला**.
याप्रसंगी युनियन नवनाथ महारनवर यांनी घन कचरा व्यवस्थापन खात्यातील कनिष्ठ पर्यवेक्षक, पर्यवेक्षक तसेच सहाय्यक मुख्य पर्यवेक्षक यांच्या जबाबदाऱ्या कर्तव्य आणि यावर होणारे प्रशासकीय अतिक्रमण व त्यासमुळे संपूर्ण घन कचरा व्यवस्थापन खात्यातील संबंधित कामगार,मुकादम सह संपूर्ण कॅडर मध्ये आलेली मरगळ झटकण्यासाठी प्रशासनास काही सूचना केल्या असून श्री. भट साहेबांनी सर्वच सूचनांचा गांभीर्याने विचार करून सर्व मागण्या वरिष्ठांच्या माध्यमातून अमलात आणण्यासाठी पुढाकार घेण्याची ग्वाही दिली.
या प्रसंगी सहायक मुख्य पर्यावेक यांच्या सोबत युनियन चे उपाध्यक्ष श्री. तानाजी घाग हेही उपस्थित होते, त्यांनी सर्व मिनिट्स ची युनियन मार्फत नोंद घेतली असून प्रशासनाचे मिनिट्स आणि त्यावरील पुढील पाठपुराव्यासाठी श्री. विजय तळेकर यांनी हमी दिली.

संबंधित पोस्ट

महाकवी कालिदास नाट्यगृह येथे रक्षाबंधन उत्सवास मुख्यमंत्री यांची उपस्थिती;बचत गटांच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्यासाठी 10 जिल्ह्यांमध्ये ‘बचत गट मॉल्स’-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ब्राईट फ्युचर व प्राऊड संस्थेकडून बेरोजगारांना पालकांनी सह मार्गदर्शन!

शिक्षणाचे महत्व समजले तर भविष्य उज्वल होईल-जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ* महिला सक्षमीकरणासाठी उज्वल सेवाभावी संस्थेचा पुढाकार; हिरकणी पुरस्काराने कर्तबगार महिलांचा गौरव

नशामुक्त छत्रपती संभाजीनगरःमानवी साखळीद्वारे जनजागृतीनशामुक्त जीवनासाठी संकल्प करु या – जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना-सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ देण्यासाठी विशेष मोहीम

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेसाठी अर्ज सादर करण्यास ११ सप्टेंबरपर्यंत मुदत

vishwatmaklokswamivarta