vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

नशामुक्त छत्रपती संभाजीनगरःमानवी साखळीद्वारे जनजागृतीनशामुक्त जीवनासाठी संकल्प करु या – जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.

नशामुक्त छत्रपती संभाजीनगरःमानवी साखळीद्वारे जनजागृतीनशामुक्त जीवनासाठी संकल्प करु या – जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.

छत्रपती संभाजीनगर, – जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग व सारा नवजीवन बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने शहागंज परिसरात आज सकाळी विद्यार्थ्यांनी मानवी साखळी तयार करुन त्याद्वारे नशामुक्तीबाबत जनजागृती केली.जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी विद्यार्थ्यांना नशामुक्त जिवनाचा संकल्प करण्याचे आवाहन केले.

    जिल्हा परिषद, माध्यमिक, प्राथमिक शिक्षण विभाग,सारा नवजीवन बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला.समाज कल्याण विभाग, जिल्हा आरोग्य विभाग, राज्य उत्पादन शुल्क विभाग, पोलीस प्रशासन, महानगरपालिका तसेच विविध शासकीय विभाग ह्या उपक्रमात सहभागी झाले. तब्बल २ हजार शालेय विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला. “नशा छोडो, परिवार जोडो – नशा छोडो, भारत जोडो” या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला ‘नशामुक्त छत्रपती संभाजीनगर’ ही मानवी रांगोळी ५०० विद्यार्थ्यांनी साकारली. त्याचे ड्रोनद्वारे चित्रण करण्यात आले.

जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती पी. एम. मिन्नू हस्ते रॅलीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. शिक्षणाधिकारी श्रीमती अश्विनी लाठकर, उपशिक्षणाधिकारी श्रीमती दिपाली थावरे,निता श्रीश्रीमाळ,गिता तांदळे, विस्तार अधिकारी दिलीप सिरसाठ,जालम चौरे, सुनिता वाघ, ज्ञानेश्वर रोडगे उपस्थित होते. नशामुक्त भारत अभियानाचे मास्टर ट्रेनर डॉ. कृष्णा रामचंद्र भावले यांनी उपस्थित विद्यार्थी व नागरिकांना नशामुक्तीची शपथ दिली. राष्ट्रीय हिंदी महाविद्यालय, डॉ. झाकीर हुसेन कनिष्ठ महाविद्यालय,सर सय्यद महाविद्यालय,डॉ. झाकीर हुसेन हायस्कूल, रोशनगेट,मलिकंबर उर्दू हायस्कूल, रजा रोड, अनिसा उर्दू हायस्कूल, रविंद्रनगर,विनर्स इंग्लिश हायस्कूल, रविंद्रनगर,खैरुल मोमिनीन उर्दू हायस्कूल, राडपुरा,इकरा बॉईज हायस्कूल, एस.टी. कॉलनी, भारतीय विद्या मंदिर, रोशनगेट,अल्मीर उर्दू हायस्कूल, पी. यू. जैन माध्यमिक विद्यालय, अल्लमा शिब्ली उर्दू हायस्कूल इ. शाळांनी यात सहभाग घेतला. सूत्रसंचालन शेख रशीद रहीमान यांनी तर भाऊ पठाडे यांनी आभार मानले.

0000

संबंधित पोस्ट

जालना जिल्ह्यासाठी 8 हजार 515 कोटींच्या वार्षिक पत आराखड्याचे प्रकाशन• पीक कर्ज, कृषी व एमएसएमई क्षेत्राला प्राधान्य• वार्षिक पत आराखड्यात बँकांची 101 टक्के उद्दिष्टपूर्ती

३ ते १५ ऑगस्टदरम्यान जनजागृतीचे विविध उपक्रम; “अवयवदान-जीवनदानाचा सर्वोत्तम संकल्प” अभियानाला सुरुवात

स्वच्छता ही सेवा’ अभियानामध्ये नवी मुंबईतील शिल्पाकृती झाल्या चकाचक

vishwatmaklokswamivarta

रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत भव्य मॅरेथॉन व वॊकेथॉन रॅलीचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

बार्टी व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रातर्फे मोफत तांत्रिक उद्योजकता प्रशिक्षण

पामबीच मार्गावरुन सायन पनवेल महामार्गावर जाण्याकरीता उपयोगी आर्म उड्डाणपूलाचे लोकार्पण