vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

करवंड येथे ‘ऐतिहासिक करवंड महोत्सव 2026’चे भव्य आयोजन

करवंड येथे ‘ऐतिहासिक करवंड महोत्सव 2026’चे भव्य आयोजन

बुलढाणा, प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज आणि गुणवंताबाई इंगळे यांच्या ऐतिहासिक विवाह स्मृतींना यंदा तब्बल 370 वर्षे पूर्ण होत असून, या ऐतिहासिक घटनेचे औचित्य साधत बुलढाणा जिल्ह्यातील करवंड येथे बुधवार, 15 एप्रिल 2026 रोजी ‘ऐतिहासिक करवंड महोत्सव 2026’चे भव्य आयोजन करण्यात आले आहे.

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि करवंड महोत्सव कृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव आयोजित करण्यात येत आहे. महोत्सवाची सुरुवात सकाळी 8 वाजता भव्य ऐतिहासिक शोभायात्रेने होणार असून, यात शिवराय आणि गुणवंताबाईंच्या वेशभूषेत कलाकार, लेझिम पथके, बँड, अश्वदल आणि पालखी यांचा आकर्षक सहभाग असणार आहे. यानंतर सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत उद्घाटन सोहळा पार पडणार असून, केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होईल.

दुपारी 1 ते 2 या वेळेत पोवाडा व विविध लोककला सादरीकरण होणार आहे. त्यानंतर सुप्रसिद्ध शाहिर रामानंद उगले यांच्या शौर्यगाथांवर आधारित विशेष कार्यक्रम होईल. दुपारी 3 ते 5 या वेळेत नामवंत इतिहासकार रामचंद्र पाटील यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. रात्री 8 ते 10 या वेळेत कोल्हापूर व सातारा येथील 50 पेक्षा अधिक कलाकारांच्या सहभागातून ‘तीर्थ शिवराय’ हे भव्य महानाट्य सादर करण्यात येणार आहे. यासोबतच युद्धकला प्रात्यक्षिके तसेच कथ्थक आणि भरतनाट्यम नृत्य सादरीकरण देखील होईल. महोत्सवाचा समारोप रात्री 10 वाजता भव्य ऐतिहासिक बारूद आतषबाजीने होणार आहे.

या महोत्सवात प्राचीन नाणे प्रदर्शन, पुस्तक प्रदर्शन आणि महिला बचत गटांचे विविध स्टॉल्स हे देखील विशेष आकर्षण ठरणार आहेत. यावेळी शिवरायांच्या सर्व महाराणींच्या घराण्यातील वंशजांची उपस्थिती लाभणार असून, आमदार श्वेताताई महाले पाटील आणि करवंड महोत्सव कृती समितीच्या वतीने नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

000000

 

संबंधित पोस्ट

महाराष्ट्रात गुटखाबंदीसाठी स्वतंत्र कायदा आणणार-अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ

vishwatmaklokswamivarta

नांदेड जिल्‍हा परिषदेच्‍या 23 कोटी 26 लक्ष रुपयांच्‍या अर्थसंकल्‍पास मंजूरी;सक्षम महिला, आधुनिक शेती, शिक्षण व आरोग्यातून गावांचा सर्वांगीण विकास..

महिला सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या वन स्टॉप क्रायसिस सेंटर (सखी केंद्र) तसेच शासकीय महिला आधारगृहांमधील सेवांचा, सखी केंद्रे आणि महिला आधारगृहांमधील निवारा, कायदेशीर मदत, आढावा घेण्यासाठी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

चॅप्टर केसेस तरतुदी, कार्यपद्धतीच्या माहितीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दोन दिवसीय प्रशिक्षण..

विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची आज बिनविरोध निवड झाली.    

अनुसुचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा, बदनापूर येथेशैक्षणिक वर्ष सन 2026-27 प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन