vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

उन्हाळी हंगाम 2026 साठी ‘ई-पीक पाहणी’ सुरू; 24 मेपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन

उन्हाळी हंगाम 2026 साठी ‘ई-पीक पाहणी’ सुरू; 24 मेपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन

बुलढाणा, प्रतिनिधी: महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी डिजिटल क्रॉप सर्वे (DCS) प्रकल्पांतर्गत उन्हाळी हंगाम 2026 साठी ‘ई-पीक पाहणी’ मोहिमेची सुरुवात आजपासून करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकांची नोंदणी स्वतः अॅन्ड्रॉईड मोबाईलद्वारे करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या मोहिमेची अंतिम मुदत 24 मे 2026 पर्यंत निश्चित करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांनी आपल्या 7/12 उताऱ्यावर पीक पेरा नोंदविण्यासाठी ‘ई-पीक पाहणी व्हर्जन 4.0.5’ या मोबाईल अॅपचा वापर करणे आवश्यक आहे. हे अॅप मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून शेतात जाऊन पिकांची माहिती नोंदवून अपलोड करावी लागणार आहे. अॅप सुरळीत चालण्यासाठी गुगल क्रोम अपडेट असणे आवश्यक असल्याचेही सांगण्यात आले आहे.

ज्या शेतकऱ्यांकडे अॅन्ड्रॉईड मोबाईल उपलब्ध नाही किंवा अॅप वापरणे शक्य नाही, त्यांनी संबंधित गावाचे तलाठी, कोतवाल किंवा नियुक्त सहाय्यक यांची मदत घ्यावी. तसेच कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) मार्फतही ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

प्रशासनाच्या माहितीनुसार, डिजिटल क्रॉप सर्वे अंतर्गत 100 टक्के ई-पीक पाहणी नोंद करणे बंधनकारक आहे. उन्हाळी हंगामात शेतात उभ्या असलेल्या पिकांसह कायम पड किंवा चालू पड जमिनींचीही नोंद करणे आवश्यक आहे. शेतकरी स्तरावर नोंदणी न झाल्यास, संबंधित जमिनींची नोंद सहाय्यक स्तरावरून पूर्ण करण्यात येणार आहे.

महत्त्वाचे म्हणजे, वेळेत ई-पीक पाहणी न केल्यास 7/12 उताऱ्यावर पीक पेरा नोंद कोरी राहू शकते. यामुळे पीक विमा, शासकीय अनुदाने व इतर लाभ मिळविण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसान भरपाईसाठी अचूक पीक नोंद आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर, सर्व शेतकरी बांधवांनी अंतिम मुदतीपूर्वी आपल्या पिकांची नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

23 नोव्हेंबर रोजी, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा राज्यभरातील 4 लाख 75 हजार 669 विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ठ

vishwatmaklokswamivarta

तलाव मासेमारी ठेक्यासाठी निविदा आमंत्रित

बँकेत दावा न केलेली रक्कम खातेदारांना देण्यासाठी शुक्रवारी महामेळावा- अग्रणी प्रबंधक विश्वास वेताळ”माझा पैसा माझा अधिकार”- खातेदारांनी आवश्यक कागदपत्रासह उपस्थित राहण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

शासनाच्या १०२७ सेवा १५ ऑगस्टपासूनएकाच पोर्टलवरून- संजय काटकर

करदाता सेवा महासंचालनालयाची, मुंबई विभागीय शाखा, पुणे-I आणि पुणे-II केंद्रीय वस्तू आणि सेवा कर आयुक्तालये तसेच भारतीय सनदी लेखापाल संस्थेच्या पश्चिम विभागीय सनदी लेखापाल विद्यार्थी संघटनेच्या वतीने वस्तू आणि सेवा कर 2.0 – भारतातील अप्रत्यक्ष कर प्रणालीतील मोठ्या सुधारणा या विषयावर परिसंवादाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

कृत्रिम वाळू निर्मिती व वापराबाबत शासनाचे संपूर्ण सहकार्य तथापि, गुणवत्तेशी तडजोड नाही – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे कृत्रिम वाळू निर्मितीवर कार्यशाळेचे आयोजन

vishwatmaklokswamivarta