vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या नवीन डब्ब्यांचे पंधरा ऑक्टोबरला अनावरण.

वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या नवीन डब्ब्यांचे पंधरा ऑक्टोबरला अनावरण…

राज्य प्रतिनिधी –

भारतीय रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या नवीन डब्ब्यांचे पंधरा ऑक्टोबरला अनावरण केले जाईल. दिल्लीतील भारत मंडपममध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय रेल्वे उपकरण प्रदर्शनात पहिल्या एसी ट्रेनच्या डब्ब्याला सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे आता लवकरच रेल्वे प्रवाशांना वंदे भारत स्लीपरचा आरामदायी आणि सर्व सुविधांयुक्त प्रवास करायला मिळेल.

 भारतीय रेल्वे मंत्रालयाने काइनेट रेल्वे सोल्यूशन्ससोबत वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या एक हजार नऊशे वीस कोचेसच्या निर्मितीसाठी करार केला आहे. या उपक्रमामुळे भारतीय रेल्वेच्या स्लीपर कोचेसच्या गुणवत्तेत सुधारणा होईल. या ट्रेनमध्ये सोळा डब्बे असतील. यामध्ये एसी फर्स्ट क्लास, एसी टू टियर आणि एसी ३ टियर या श्रेण्या समाविष्ट असतील. प्रत्येक डब्ब्यात आधुनिक सुविधांचा समावेश असेल, यामुळे प्रवास अधिक आरामदायक आणि सुरक्षित होईल.

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सप्टेंबर २०२५ मध्ये वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या लाँचची घोषणा केली होती. पहिली ट्रेन ही पंधरा ऑक्टोबरला सुरू होईल.

संबंधित पोस्ट

पानसरे हत्याप्रकरणी निष्पाप हिंदुत्वनिष्ठ डॉ. तावडे, अमोल काळे व शरद कळसकर यांना जामीन! निरपराध हिंदुत्वनिष्ठांची साडे नऊ वर्षांची भरपाई कोण करणार?– सनातन संस्थेचा सवाल…   

vishwatmaklokswamivarta

म्हसळा ग्रामीण रुग्णालयातील डायलिसिस सेंटरचे महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे यांच्या हस्ते लोकार्पण

vishwatmaklokswamivarta

बुधवारी हदगाव येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

वृक्षतोड परवानगी प्रक्रियेत गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही- वनमंत्री गणेश नाईक

म्हैसाळ उपसा सिंचन लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी पाणी मागणी अर्ज..त्वरित भरून द्यावेत…

vishwatmaklokswamivarta

भारत निवडणूक आयोगाने देशातील १६ राज्ये आणि ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ (एसआयआर) मोहिमेचा तिसरा टप्पा जाहीर