vishwatmaklokswamivarta
Breaking News
परदेशात देश

इस्त्रायल-हमासच्या युद्धबंदीनंतर आता हमासने शांततेच्या मार्गाने पहिले पाऊल. हमासने सर्व वीस इस्रायली ओलिसांची सुटका केली

इस्त्रायल-हमासच्या युद्धबंदीनंतर आता हमासने शांततेच्या मार्गाने पहिले पाऊल. हमासने सर्व वीस इस्रायली ओलिसांची सुटका केली

विदेश प्रतिनिधी-इस्त्रायल-हमासच्या युद्धबंदीनंतर आता हमासने शांततेच्या मार्गाने पहिले पाऊल उचलले आहे. हमासने सर्व वीस इस्रायली ओलिसांची सुटका केली आहे. इस्त्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि सेनादलाने या बातमीला दुजोरा दिला आहे. ओलिसांच्या सुटकेमुळे दोन्ही देशांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीखाली इस्रायल आणि हमास यांनी गाझा युद्धविराम कराराच्या पहिल्या टप्प्याला मान्यता दिली होती.

या करारामुळे आता गाझामध्ये शांततेची आशा निर्माण झाली आहे. या कराराच्या पहिल्या टप्प्यात, इस्रायलने आपले सैन्य गाझामधून मागे घेणे, एक हजार सातशेपेक्षा जास्त फिलिस्तिनी कैद्यांची सुटका करण्याचे मान्य केले. तर हमास सर्व वीस इस्रायली ओलिसांची सुटका करेल, हे मान्य केले होते.

त्यादृष्टीने हमास पहिले पाऊल टाकले आहे. याआधी इस्त्रायलने गाझामधून आपले सैन्य मागे घेण्यास सुरुवात केली होती.

यादरम्यान गाझा पट्ट्यातील नागरिकांसाठी आंतरराष्ट्रीय मदत आणि पुनर्वसन कार्यक्रम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

संबंधित पोस्ट

भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी २०२६ साठी इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर डेमोक्रसी अँड इलेक्टोरल असिस्टन्स (इंटरनॅशनल आयडिया) चे अध्यक्षपद …

vishwatmaklokswamivarta

जपानमधील ‘पंच’ नावाचा चिमुकला जपानी मकाक सध्या जागतिक स्तरावर चर्चेचा विषय ठरला..

उझबेकिस्तानच्या दौऱ्यात पंतप्रधानांची उझबेकिस्तानच्या अध्यक्षांशी औपचारिक चर्चा

तेहरानमधल्या भारतीय दुतावसानं भारतीय नागरिकांसाठी सुधारित सल्ला जारी-कुठल्याही कारणासाठी इराणचा प्रवास करु इच्छिणाऱ्या भारतीय नागरिकांनी सुरक्षा परिस्थितीत सुधारणा होईस्तोवर सध्या आपला प्रवास पुढे ढकलावा..

३ जून २०२६ पासून जर्मनीमार्गे हवाई प्रवास करणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी ट्रान्झिट व्हिसाची अट रद्द .

जर्मनीत बर्लिन इथं भारतीय समुदायाच्या कार्यक्रमात बोलताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारत–जर्मनी संबंधांवर महत्त्वपूर्ण भाषण केलं. 🇮🇳🤝🇩🇪