vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

दिवाळीत आकाशकंदील उडविण्यावर बंदी 

दिवाळीत आकाशकंदील उडविण्यावर बंदी

 

रायगड– अलिबाग -दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत आकाशकंदील (Flying Lantern) हवेत सोडणे, विक्री करणे आणि साठा ठेवणे यावर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. हा आदेश दि. १७ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत प्रभावी राहणार आहे.

पोलीस उपआयुक्त (विशेष शाखा) रश्मी नांदेडकर यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, दिवाळीच्या काळात नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर प्रज्वलित आकाशकंदील हवेत सोडले जातात. हे कंदील जमिनीवर येताना आग लागणे, मालमत्तेचे नुकसान किंवा इतर गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने ही बंदी आवश्यक असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

या आदेशानुसार नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत प्रज्वलित आकाशकंदील उडविणे, विक्री करणे आणि साठा करणे पूर्णपणे प्रतिबंधित असेल.

या मनाई आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२३ अन्वये दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

नवी मुंबई पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, सण साजरा करताना सुरक्षिततेची काळजी घ्यावी आणि कायद्याचे पालन करून इतरांच्या जीवितास धोका निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी.

संबंधित पोस्ट

वॉर रूम’आणि पॉलिसी-आधारित विकास मॉडेलमुळे महाराष्ट्राच्या विकासाला गती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विशेष लेख :गुणवत्तापूर्ण शिक्षणव्यवस्था लोकाभिमुख करण्यावर भर!

मुंबईचे महापौर रितू तावडे यांना बॉम्बने उडवण्याची धमकीचा इमेल- पालिका मुख्यालयात सुरक्षेत मोठी वाढ …

शिव तांडव स्तोत्र पठण कार्यक्रमातून आध्यात्मिक वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवतांडव स्तोत्र पठण कार्यक्रमाला उपस्थिती

vishwatmaklokswamivarta

१३ तासात ३०० किमी सायकलिंग पूर्ण :कैलास झोळगे ठरले पोडियम फिनिशर्स

जिल्ह्यातील २५ टन फळे, भाजीपाला विशेष वॅगनने दिल्लीला रवाना जिल्हाधिकाऱ्यांनी कृषि व रेल्वे विभागाचे केले अभिनंदन! – सांगली पॅटर्न – एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण !!

vishwatmaklokswamivarta