vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ११ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राजर्षि शाहू सहकारी बँकेचा पुढाकार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ११ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द,पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राजर्षि शाहू सहकारी बँकेचा पुढाकार

पुणे प्रतिनिधी-उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ११ लाख रुपयांचा धनादेश राजर्षि शाहू सहकारी बँकेच्यावतीने सुपूर्द करण्यात आला. पुरग्रस्तांना मदतीसाठी पुढाकार घेतल्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी बँकेच्या संचालक मंडळाचे आभार मानले.यावेळी राजर्षि शाहू सहकारी बँकेचे अध्यक्ष शांताराम धनकवडे, उपाध्यक्षा कमल व्यवहारे, संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब डोईफोडे आदी उपस्थित होते.

राज्यात अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून राज्यशासनाच्यावतीने नागरिकांचे जीवनमान पूर्वपदावर आणण्याचे काम सुरु आहे. पूरग्रस्तांना मदत करण्याकरिता विविध क्षेत्रातील व्यक्ती, सामाजिक संस्था पुढे येऊन सढळ हाताने मदत करीत आहे. पूरग्रस्तांना अधिकाधिक मदत करावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी केले

0000

संबंधित पोस्ट

अमृतपेठ-थेट स्वदेशी बाजारपेठ अभिनव संकल्पनेच्या शुभारंभ कार्यक्रमाचे खोपोली येथे आयोजन

नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी राष्ट्रीय डॉक्टर्स दिनानिमित्त डॉक्टरांना दिल्या शुभेच्छा

आंतरराष्ट्रीय योग दिन २०२६ गडचिरोली पोलीस दलाचा सामूहिक योगाभ्यास

आपला परिसर प्लास्टिकमुक्त करण्याचा युवकांनी संकल्प करावा – राज्यपाल सी पी राधाकृष्णन एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमांतर्गत राजभवन येथे सिक्कीम राज्य स्थापना दिवस

पनवेल येथे उद्योग सुसंवाद कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर गणेशोत्सवादरम्यान जड वाहनांना वाहतूक बंदी..