vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हे

राज्य उत्पादन शुल्क कार्यालयामार्फत छाप्यातून १३ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त..

राज्य उत्पादन शुल्क कार्यालयामार्फत छाप्यातून १३ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त..

बुलढाणा प्रतिनिधी-जिल्ह्याच्या राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत जिल्ह्यात अवैध मद्य निर्मिती, वाहतूक व विक्रीवर प्रतिबंध घालण्यासाठी कारवाईचे सत्र सुरु आहे. याअंतर्गत २ ते ८ ऑक्टोबर या महात्मा गांधी सप्ताहाच्या कालावधीत जिल्ह्यातील हातभट्टी, अवैध मद्यविक्री केंद्रावर एकूण ९४ ठिकाणी छापे घालून गुन्हे नोंदविण्यात आले असून ९७ आरोपींना अटक केली आहे. या गुन्ह्यात एकूण ७ वाहने आणि १३ लाख ६५ हजार ४२८ रुपये इतका मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती प्र. विभागीय उप-आयुक्त डॉ. पराग नवलकर यांनी दिली आहे.

त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात ही कारवाईचे सत्र सुरु आहे. ही कारवाई बुलढाणा जिल्ह्यातील मौजे पांगरी उबरहंडे, उंबरखेड, भादोला, आंबेडकर नगर, बुलढाणा, देऊळगाव धनगर, तुळजापूर, लोणी गवळी, अंजणी बु. अंबाशी, धोडप, खिरोडा, शेगाव, बेलखेड, कवठळ, मचिंदरखेड, पातुर्डा फाटा, मेहकर, लोणार, सुलतानपूर, देऊळगाव माळी इत्यादी ठिकाणी छापे टाकून करण्यात आली आहे. या कारवाईत जिल्ह्यातील सर्व निरीक्षक, दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क व त्यांचे अधिनस्त कर्मचारी यांचा सहभाग होता

अवैध मद्य विक्री व निर्मिती विरोधी विशेष मोहीम ,बुलढाणा जिल्ह्यात अवैध दारु विक्री केंद्र, गावठी हातभटटी विक्री केंद्रांविरोधात व अवैध मद्य निर्मिती, वाहतूक व विक्री वर प्रतिबंध घालण्यासाठी कार्यक्षेत्रीय निरीक्षक राज्य शुल्क, बुलढाणा, खामगाव, देऊळगाव राजा व निरीक्षक भरारी पथक बुलढाणा यांच्या नियंत्रणाखालील विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील अवैध मद्य विक्री व निर्मिती विरोधी विशेष मोहिमेत २५ ठिकाणी छापे टाकून जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. अवैध मद्यविक्रीच्या माहिती देण्यासाठी टोल फ्री क्रमांकावर संपर्क करा,अवैध मद्यविक्री करणाऱ्या हॉटेल्स, धाब्यांबाबत अवैध मद्य निर्मिती व वाहतुकीबाबत माहिती देण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून टोल फ्री नंबर १८००२३३९९९९ वर किंवा व्हॉटसअॅप क्रमांक ८४२२००११३३ यावर किंवा excisesuvidha.mahaonline.gov.in या पोर्टलवर तत्काळ कळविण्याचे आवाहन विभागामार्फत करण्यात आले आहे.

संबंधित पोस्ट

सोनसाखळी जबरी चोरीप्रकरणी दोन आरोपी अटकेत; दोन्ही गुन्ह्यांतील ८६,७९४ रुपयांचा सोन्याचा ऐवज जप्त। माटुंगा पोलीस ठाण्याची कारवाई

मुंबईत १० कोटींचा गांजा जप्त – गुजरातमधील टोळीचा पर्दाफाश, दोन आरोपींना अटक: चुनाभट्टी पोलिस….

सायबर फसवणूक करणाऱ्या संघटीत टोळीविरुद्ध सीबीआयची कारवाई ; तिघांना अटक

मुंबई सीमाशुल्क विभाग झोन-III कडून सीएसएमआय विमानतळावर ₹5.11 कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त..

vishwatmaklokswamivarta

गडचिरोली पोलीसांची मोठी कारवाई “बनावट चलनी नोटा रॅकेटचा पर्दाफाश”

पुरुषांच्या शरीराबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी-सेजल पवार विरोधात एफआयआर दाखल