vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हे

पुरुषांच्या शरीराबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी-सेजल पवार विरोधात एफआयआर दाखल

पुरुषांच्या शरीराबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी-सेजल पवार विरोधात एफआयआर दाखल

मुंबई प्रतिनिधी’

प्रसिद्ध स्टँण्ड अप कॉमेडियन प्रणित मोरे यांच्या शोमध्ये मुंबईच्या केईएम रुग्णालयात शिकणाऱ्या डॉक्टर विद्यार्थिनी सेजल पवारने मृतदेहांच्या प्रायव्हेट पार्ट्सवर अश्लील वक्तव्य करणं चांगलचं महागात पडलं. या संदर्भात व्हायरल झालेल्या विनोदी व्हिडिओवरून महाराष्ट्र सायबर सेलने एफआयआर दाखल केला आहे. यानंतर केईएम रूग्णालयाने डॉ. सेजल पवार हिला 15 दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. या 15 दिवसांच्या दरम्यान सेजल पवारला कॉलेजमध्ये येण्यापासून बंदी घालण्यात आली आहे.

प्रणित मोरे यांच्या कॉमेडी शोमध्ये केईएम रुग्णालयातील डॉक्टर विद्यार्थिनीं सेजल पवार हिने मृतदेहा संदर्भात हैराण करणारे आक्षेपार्ह विधान केले होते. तिने केलेल्या विधानाने सर्वांनाच मोठा धक्का बसला. यासंदर्भातील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर केईएम रुग्णालय प्रशासनाकडूनही याची दखल घेण्यात आली. सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया नोंदवल्या जात होत्या. मृतदेहा संदर्भात आक्षेपार्ह विधान केल्या प्रकरणह प्राथमिक अहवालात आक्षेपार्ह, असंवेदनशील वक्तव्य केल्याचा ठपका तिच्याविरोधात ठेवण्यात आला आहे.

या प्रकरणी के.ई.एम. प्रशासनाकडून सेजल पवार प्रकरणात सखोल चौकशीची गरज असून त्यासाठी पाच सदस्य समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती आहे. सात दिवसात समिती आपला अहवाल सोपवणार त्यानंतर पुढील कारवाईची दिशा निश्चित केली जाईल. विद्यार्थिनी ही अद्याप वैद्यकीय शिक्षण घेत असलेली विद्यार्थिनी असल्याने तिच्याबाबतच्या सर्व बाबी नियम आणि मार्गदर्शक सूचनांनुसार हाताळल्या जातील, असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

डॉ. सेजल पवार हिच्या व्हिडिओतील विधानांमुळे संस्थेच्या प्रतिमेवर झालेल्या परिणाम यासाठीची तपासणी केली जाणार आहे. पाच सदस्यांच्या समितीत वरिष्ठ प्राध्यापकांसह बाह्य सदस्यांचाही समावेश असणार आहे. या समितीच्या कार्यकक्षेत कोणत्या मुद्द्यांचा समावेश करायचा याबाबत अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर चौकशीला सुरुवात होईल. प्राथमिक अहवालात काही आरोपांबाबत तथ्ये समोर आली असली, तरी सर्व बाबींची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक असल्याने विस्तृत समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

प्रणित मोरे यांच्या कॉमेडी शोमध्ये सहभागी झालेल्या डॉ. सेजल पवार यांनी वैद्यकीय शिक्षणादरम्यान शवविच्छेदन विभागात येणाऱ्या मृतदेहांबाबत आणि पुरुष मृतदेहांच्या प्रायव्हेट पार्टबाबत टिप्पणी केली होती. या वक्तव्याचा एक भाग सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेकांनी या वक्तव्यावर आक्षेप घेतला.

वैद्यकीय व्यवसायाशी संबंधित संवेदनशील विषयांवर अशा प्रकारे सार्वजनिक मंचावर बोलणे योग्य आहे का?, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. काही सोशल मीडिया यूजर्संनी या वक्तव्याला असंवेदनशील म्हटले, तर काहींनी ते वैद्यकीय शिक्षणातील अनुभवाच्या संदर्भात पाहण्याची भूमिका घेतली. वाद वाढत असताना केईएम रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय घेतला. याशिवाय महाराष्ट्र सायबर सेलनेही व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या संदर्भात एफआयआर दाखल केला आहे. या प्रकरणात कॉमेडियन प्रणित मोरे, हिमांशू जांगरा, सेजल पवार आणि इतरांचा समावेश आहे.

संबंधित पोस्ट

ठाण्याचे उपायुक्त शंकर पाटोळे (अनधिकृत बांधकाम विभाग) यांना लाच घेताना भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले आहे. ३५ लाखांची लाच घेताना रंगेहाथ …

पतीने पत्नीला धावत्या लोकलसमोर ढकलले; मुंबईतील मुलुंड रेल्वे स्टेशनवर गंभीर प्रकार

मुंबई सीमाशुल्क विभाग झोन-III कडून सीएसएमआय विमानतळावर ₹5.11 कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त..

vishwatmaklokswamivarta

एका परदेशी दूतावासाच्या बनावट नंबर प्लेट लावलेल्या गाडीतून दिल्लीत फिरत असलेल्या एका महिलेला अटक 

vishwatmaklokswamivarta

१९९३ च्या दंगलीतील ३२ वर्षांपासून फरार आरोपीला अखेर अटक

vishwatmaklokswamivarta

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात धक्कादायक खुलासा, उद्योजक आणि संस्था चालकाकडून  महिलांचे लैंगिक शोषण…