vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हे

सोनसाखळी जबरी चोरीप्रकरणी दोन आरोपी अटकेत; दोन्ही गुन्ह्यांतील ८६,७९४ रुपयांचा सोन्याचा ऐवज जप्त। माटुंगा पोलीस ठाण्याची कारवाई

 सोनसाखळी जबरी चोरीप्रकरणी दोन आरोपी अटकेत; दोन्ही गुन्ह्यांतील ८६,७९४ रुपयांचा सोन्याचा ऐवज जप्त। माटुंगा पोलीस ठाण्याची कारवाई

 

गुन्हे प्रतिनिधी -सोनसाखळी जबरी चोरीप्रकरणी दोन आरोपी अटकेत; दोन्ही गुन्ह्यांतील ८६,७९४ रुपयांचा सोन्याचा ऐवज जप्त। माटुंगा पोलीस ठाण्याची यशस्वी कारवाई

 पॉलिसी सूत्रांच्या माहिती अनुसार माटुंगा पोलिस ठाण्याच्या हद्दीत १८ मे २०२५ रोजी रात्री ९.१५ वाजता टिळक ब्रिजच्या थापाथवरून दादर टीटीकडे पायी जाणाऱ्या महिलेस अज्ञात इसमाने गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळ काढला. याप्रकरणी गुन्हा क्रमांक ११८/२०२५ नोंदवण्यात आला होता.तांत्रिक तपास व गुप्त बातमीदाराच्या आधारे पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली:1. सलीम मतीन उर्फ मोजेस (वय ४४)2. अकबर अहमद  (वय ४५)तपासादरम्यान आणखी एक गुन्हा (गु.र.क्र. १३०/२०२५) आरोपी सलीम याने केल्याचे उघड झाले. या दोन्ही गुन्ह्यांतील सोन्याचे मंगळसूत्र पोलिसांनी हस्तगत केले आहे:

गुन्हा ११८/२०२५ – ७.६४० ग्रॅम सोनं (किंमत ₹५५,३५१/-)गुन्हा १३०/२०२५ – ४.३४० ग्रॅम सोनं (किंमत ₹३१,४४३/-).एकूण जप्त मुद्देमाल – ₹८६,७९४/- चा सोन्याचा ऐवज हस्तगत पोलिसांच्या या वेगवान आणि अचूक कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाची भावना व्यक्त केली जात आहेया कामगिरीचं श्रेय मा. पोलीस आयुक्त श्री. देवेन भारती, मा. पोलीस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) श्री. सत्यनारायण चौधरी, अप्पर पोलीस आयुक्त (मध्य प्रादेशिक विभाग) श्री. विक्रम देशमाने, पोलीस उपआयुक्त परिमंडळ ४ श्रीमती रागसुधा आर., सहाय्यक पोलीस आयुक्त, माटुंगा विभाग श्री. योगेश गावडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र पवार, आणि गुन्हे शाखेच्या प्रभारी श्रीमती प्रतिभा जोगळेकर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने उचललेली आहे.ही कामगिरी पूर्ण करण्यात पुढील अधिकाऱ्यांचा व कर्मचाऱ्यांचा मोलाचा वाटा आहे:पोलीस उपनिरीक्षक सुनिल पाटील पो. उ. नि. विनोद पाटील पोह. चव्हाण, तांब पोशि. जुवाटकर, देशमाने, मेटकर, तोडासे, बहादुरे, नवले, बारशी, सोनवलकर, बंजारा, नेहारे व विशेष तांत्रिक मदतीसाठी पोह. ठोकेया प्रकरणाचा पुढील तपास पो. उ.नि. सुनिल पाटील हे करीत आहेत.ही यशस्वी कारवाई माटुंगा पोलिसांची दक्षता आणि चिकाटीचे उदाहरण ठरली आहे.

 

संबंधित पोस्ट

३ वर्षाच्या अपहरण झालेल्या मुलीची मुंबई पोलिसांनी वरळी पोलिसांनी काही तासातच सुटका केली.

vishwatmaklokswamivarta

नव्या मुंबईतील धक्कादायक बातमी -नवी मुंबईतील तळोजा येथे २.५ वर्षांच्या हर्षिका शर्माची तिच्या शेजारीनेच केली हत्या…

vishwatmaklokswamivarta

ऑपरेशन रेजपिल एनसीबीने आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्करीचे मोठे जाळे केले उद्ध्वस्त; भारतामध्ये पहिल्यांदाच, पश्चिम आशियात वापरल्या जाणाऱ्या ‘कॅप्टागॉन’ या सायकोट्रॉपिक पदार्थाची जप्तीची कारवाई

यावेळी कट इतका मोठा होता धोकादायक षड्यंत्र_पर्दापाश. …..

vishwatmaklokswamivarta

भिवंडी येथील  २२ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार, सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल..

vishwatmaklokswamivarta

नियमबाह्य तेजस्वी एलईडी बल्बप्रकरणी1044 वाहनधारकांना साडेचार लाख रुपये दंडाची आकारणी वायुवेग पथकाची वर्षभरातील कारवाई