vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

आंतरराष्ट्रीय योग दिन २०२६ गडचिरोली पोलीस दलाचा सामूहिक योगाभ्यास

आंतरराष्ट्रीय योग दिन २०२६ गडचिरोली पोलीस दलाचा सामूहिक योगाभ्यास

गडचिरोली प्रतिनिधी-

आंतरराष्ट्रीय योग दिन २०२६ गडचिरोली पोलीस दलाचा सामूहिक योगाभ्यासशारीरिक तंदुरुस्ती, मानसिक सुदृढता आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश देत आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त गडचिरोली पोलीस दलातर्फे जिल्हाभर सामूहिक योग शिबिरांचे आयोजन करण्यात आले.

गडचिरोली पोलीस मुख्यालयासह सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालये, पोलीस ठाणे व उपपोस्ट येथे आयोजित योग शिबिरांमध्ये पोलीस अधिकारी व अंमलदारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

पोलीस मुख्यालय, गडचिरोली येथे आयोजित मुख्य योग शिबिरात ७०० हून अधिक अधिकारी व अंमलदार सहभागी झाले. योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यानसाधनेचे प्रात्यक्षिक करण्यात आले.यावेळी पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांनी सर्वांना नियमित योगाचा अंगीकार करून निरोगी, तणावरहित आणि सक्षम जीवन जगण्याचे आवाहन केले.

“दररोज किमान २० मिनिटे योगासाठी द्या – निरोगी शरीर, शांत मन आणि सक्षम जीवनासाठी.”#InternationalYogaDay2026 #YogaDay #GadchiroliPolice #YogaForWellness #FitIndia महाराष्ट्र पोलीस

संबंधित पोस्ट

नागोठणे – वरवठणे मोघलकालीन पूल वाहतुकीसाठी बंद

मुसळधार पावसाचा इशारा!-पुढील ३ दिवस ईशान्येकडील राज्ये व मुंबई उपनगरासह महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज – हवामान विभाग

vishwatmaklokswamivarta

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उपक्रमांचे उद्दिष्ट पूर्ण करा_ जिल्हाधिकारी दिलीप स्वामी.

vishwatmaklokswamivarta

आत्मनिर्भर भारताच्या ताकदीची ऑपरेशन सिंदूरच्या यशातून प्रचीती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खापरखेड्यात तिरंगा यात्रेचे आयोजन

कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी क्षमता वृद्धी महत्त्वाची’क्षमता वृद्धी व जनजागृती कार्यशाळेमध्ये तज्ज्ञांचे मत..

vishwatmaklokswamivarta

सिंहस्थ कुंभमेळा २०२७ प्रशासकीय यंत्रणांनी अतिरिक्त मनुष्यबळासाठी आवश्यक सेवा-सुविधाचा आराखडा 15 जानेवारीपर्यंत सादर करावा – आयुक्त शेखर सिंह