vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यापरदेशात देश

जपानमधील ‘पंच’ नावाचा चिमुकला जपानी मकाक सध्या जागतिक स्तरावर चर्चेचा विषय ठरला..

जपानमधील ‘पंच’ नावाचा चिमुकला जपानी मकाक सध्या जागतिक स्तरावर चर्चेचा विषय ठरला..

विशेष प्रतिनिधी –

आईच्या मायेसाठी एका निर्जीव खेळण्याला आपलं मानणारा जपानमधील ‘पंच’ नावाचा चिमुकला जपानी मकाक सध्या जागतिक स्तरावर चर्चेचा विषय ठरला आहे. आईने नाकारल्यानंतर एका ‘सॉफ्ट टॉय’च्या आधाराने सुरू झालेला त्याचा प्रवास आता एका आनंदी वळणावर येऊन पोहोचला आहे

आईविना पोरका अन् खेळण्याशी नातं,आईच्या उबेसाठी व्याकुळ झालेल्या या पिल्लाला पाहून प्राणीसंग्रहालयाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला ओरंगउटानच्या आकाराचे एक मऊ खेळणे दिले. पंचने त्याला ‘ओरा-ममा’ असे नाव दिले आणि त्यालाच आपली आई मानले. अनेक महिने तो या खेळण्याला छातीशी घट्ट धरून फिरायचा आणि त्याला बिलगूनच झोपायचा.

जागतिक स्तरावर पाठिंबा,पंचच्या या संघर्षाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर नेटकऱ्यांनी त्याला भरभरून प्रेम दिले. IKEA Japan या कंपनीने त्याच्यासाठी अनेक सॉफ्ट टॉयज दान केले, जेणेकरून त्याला आईच्या अस्तित्वाची उणीव भासू नये. यापूर्वी २०२४ मध्ये मेलबर्नचा ‘पेस्टो’ आणि थायलंडची ‘मू डेंग’ प्रसिद्ध झाले होते, परंतु पंचची गोष्ट त्याच्या भावनिक संघर्षामुळे सर्वांच्या काळजाला भिडली.#punch #KeepGoingPunch #MonkeyPunch

संबंधित पोस्ट

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार 2025 15 मार्चपर्यंत प्रवेशिका सादर करण्याची अंतिम मुदत

जिल्ह्यात २८ शहीद स्मारके उभारणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील शूरवीराच्या शौर्याचा गौरव: पालकमंत्र्यांच्या हस्ते शहीद जवान सुनील पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण

विशेष भारत-रशिया व्यापार सहकार्याला चालना देणारी उद्योजकांची राऊंडटेबल चर्चा संपन्न

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील वृक्षांचे शास्त्रीय जोखीम मूल्यांकन सुरू, ५ हजार वृक्षांचा प्रायोगिक अभ्यास-राज्यमंत्री माधुरी मिसाळoj

अवयवदान मानवी संवेदनशीलतेचा सर्वोच्च आदर्श- जिल्हाधिकारी अशोक काकडेसांगली जिल्ह्यातील अवयवदात्यांचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला..

पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने सज्ज राहावे ; पाणी टंचाई निवारणार्थ उपाययोजनांचा पालकमंत्र्यांकडून आढावा