vishwatmaklokswamivarta
Breaking News
अध्यात्मप्रदेश

जलरक्षण हेच सृष्टीसंरक्षण प्रोजेक्ट अमृत अंतर्गत देशभरात 1500 हून अधिक तरजालना जिल्ह्यात अनेक ठिकाणी जलस्रोतांची स्वच्छता.भक्ती ही केवळ शब्दांत नव्हे, तर आचरणातून प्रकट व्हावी-सतगुरू माता सुदीक्षा जी महाराज..

जलरक्षण हेच सृष्टीसंरक्षण प्रोजेक्ट अमृत अंतर्गत देशभरात 1500 हून अधिक तरजालना जिल्ह्यात अनेक ठिकाणी जलस्रोतांची स्वच्छता.भक्ती ही केवळ शब्दांत नव्हे, तर आचरणातून प्रकट व्हावी-सतगुरू माता सुदीक्षा जी महाराज…

जालना : प्रतिनिधी –

प्रोजेक्ट अमृत अंतर्गतङ्घस्वच्छ जल, स्वच्छ मनफ या अभियानाच्या चौथ्या टप्प्याचे भव्य आयोजन सतगुरू माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिता रमितजी यांच्या मार्गदर्शनाखाली देशातील 25 राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील 930 शहरांमधील 1600 हून अधिक ठिकाणी रविवारी 22 फेब्रुवारी रोजी यशस्वीरीत्या करण्यात आले. सुमारे 12 लाख स्वयंसेवकांनी यात सहभाग नोंदविला. हा उपक्रम केवळ पर्यावरणीय प्रयत्न नव्हता; तर अध्यात्म, सेवा आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम होता. या माध्यमातून जनमानसात कर्तव्यभाव आणि जागरूकतेची भावना अधिक दृढ होण्यास मदत होईल.

जालना संत निरंकारी मडंळाच्यावतिने मुक्तेश्वर तलाव परीसर ,रेल्वे गेट जवळ जुना जालना येथे प्रोजेक्ट अमृत अंर्तगत स्वच्छ जल ,स्वच्छ मन अभियान राबविण्यात आलै व या परीसरात पुर्ण स्वच्छता करण्यात आली या कार्यक्रमा साठी जालना महानगर पालिकेच्या महापौर वंदना ताई मगरे, उपमहापौर राजेशजी राऊत यांच्यासह नगरसेवक अशोक पांगारकर ,नगर सेविका सध्यांताई देठे , ड सीमा ताई खरात ,शशिकांत घुगे ,सजंय देठे. व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. मंडळाचे जालना संयोजक श्री राजकुमार पारस वाणी यांच्या देखरेखीखाली हा कार्यक्रम पार पडला. निरंकारी मिशनच्या सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन यांच्या पुढाकाराने, बाबा हरदेव सिंहजी महाराज यांच्या शिकवणुकीतून प्रेरणा घेत ङ्गप्रोजेक्ट अमृतफ हा उपक्रम राबविण्यात आला. मानवाला निसर्गाबद्दल अधिक संवेदनशील बनवत जलसंरक्षण, स्वच्छता आणि पर्यावरण संतुलनाचा सामूहिक संकल्प दृढ करण्याचा या प्रकल्पाचा उद्देश आहे.

यावेळी दिल्ली येथे आयोजित विशेष सत्संग कार्यक्रमात सतगुरू माता सुदीक्षाजी महाराज यांनी अमृतमय विचार व्यक्त करताना सांगितले की, बाबाजींची शिकवण ही केवळ स्मरण करायची नसून ती जीवनात अंगीकारण्यासाठी आहे. खरी श्रद्धांजली ही शब्दांनी नव्हे, तर कृतीतून अर्पण केली जाते. आपण त्यांच्या अनुयायी असल्याचा दावा करीत असू, तर प्रेम, सेवा, करुणा आणि समदृष्टी यांसारख्या मूल्यांचा स्वीकार आपल्या दैनंदिन जीवनात झाला आहे का, याचे आत्मपरीक्षण आवश्यक आहे. बाबा हरदेव सिंहजी महाराज यांचे संपूर्ण आयुष्य मानवकल्याणासाठी समर्पित होते. सेवा, सुमिरण आणि सत्संग हेच जीवनाचे अधिष्ठान असल्याचा त्यांनी दिलेला संदेश आजही तितकाच सुसंगत आहे. भक्ती ही केवळ बोलण्यापुरती मर्यादित न राहता ती आचरणात दिसली पाहिजे, असे त्यांनी अधोरेखित केले.

या सत्संगामध्ये निःस्वार्थ सेवेतूनच समाजात सकारात्मक परिवर्तन घडते, असा संदेश देण्यात आला. बाबाजींच्या शिकवणी प्रत्येक हृदयात तेवत राहोत आणि हेल्थ सिटीसारखे प्रकल्प मानवकल्याणाचे नवे आदर्श प्रस्थापित करो, अशी भावना व्यक्त करण्यात आली.

संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या सचिवांनी अभियानाविषयी सविस्तर माहिती देताना सांगितले की, या उपक्रमाची सुरुवात सेवादलाच्या प्रार्थनेने झाली. त्यामुळे संपूर्ण वातावरण आध्यात्मिक उर्जेने भारावून गेले. देशभर प्रसारित मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करून सुरक्षा, शिस्त आणि स्वच्छता यांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले. आयोजनाची सुसूत्र आणि संस्कारित कार्यपद्धती यामुळे अधोरेखित झाली. याच वेळी खुल्या प्रांगणात सत्संगाचे आयोजन करण्यात आले असून, श्रद्धाळूंनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

निःसंशय, ङ्गस्वच्छ जल, स्वच्छ मनफ हा संदेश केवळ एक अभियान नसून तो एक जीवनदृष्टी आहे. जलधारांना निर्मळ ठेवतानाच मनामध्येही जागरूकतेचा प्रकाश पसरविणारा हा संकल्प आहे. येणार्‍या पिढ्यांसाठी संतुलित, सुरक्षित आणि शाश्वत भविष्याची पायाभरणी करणारी हीच खरी ऊर्जा ठरेल.

संबंधित पोस्ट

बिहार निवडणूक 2025 टप्पा-1: ऐतिहासिक 64.66% मतदान निवडणूक आयोगाच्या नवीन उपक्रमांमुळे मतदारांसाठी मतदान हा सर्वात आनंददायी अनुभव बनला

vishwatmaklokswamivarta

जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक संपन्न-खरीप हंगामात कृषी विभागाने शेतकऱ्यांना खते व बियाणांचा पुरवठा सुरळीत होण्याची दक्षता घ्यावी — रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले

कोकण किनारपट्टी सह मुंबई  पश्चिम उपनगरामध्ये तुफान मुसळधार पाऊस पडत अनेक ठिकाणी वाहतुकीची समस्या पाणी तुंबण्याची घटना समोर येत आहे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख: राज ठाकरेंना वर्धापनदिनी लातूरकरांचे गिफ्ट; पंचायत समितीवर मनसे-भाजपची सत्ता, सभापती बिनविरोध

गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग मुक्त महाराष्ट्र’ अभियानात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा समावेश-प्रत्येक कुटुंबापर्यंत आरोग्यसेवा पोहोचवण्यास प्राधान्य- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

मतदारयादी अद्ययावत आणि अचूक तयार करावी – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम जिल्हाधिकारी कार्यालयात मतदार नोंदणी अधिकाऱ्यांसमवेत बैठक

vishwatmaklokswamivarta