vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर कार्यक्रमाचे आयोजन-नागरिक, शेतकरी, विद्यार्थ्यांनी शिबिराचा लाभ घ्यावा

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर कार्यक्रमाचे आयोजन-नागरिक, शेतकरी, विद्यार्थ्यांनी शिबिराचा लाभ घ्यावा

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी:- दि.18 फेब्रुवारी 2026 च्या शासन निर्णयान्वये रोहा तहसिलदार कार्यालयामार्फत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान कार्यक्रमांतर्गत दि.7 मार्च 2026 रोजी कोलाड, दि.14 मार्च 2026 रोजी नागोठणे, दि.10 एप्रिल 2026 रोजी चणेरा, दि.14 एप्रिल 2026 रोजी निडी तर्फे अष्टमी, दि.17 एप्रिल 2026 रोजी घोसाळे, दि.1 मे 2026 रोजी निडी तर्फे अष्टमी तसेच दि.8 मे 2026 व दि.15 मे 2026 रोजी सकाळी 11.00 वा. नगर परिषद रोहा येथे शिबिर कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून या शिबिराचा नागरिकांनी, शेतकऱ्यांनी, विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही तहसिलदार डॉ.किशोर देशमुख यांनी केले आहे.

या शिबिरामध्ये प्रलंबित फेरफार निकाली काढणे, 7/12 मधील चुकांची दुरुस्ती करणे, भोगवटदार वर्ग 2 जमिनी भोगवटदार वर्ग 1 मध्ये रूपांतर करणे, जिवंत 7/12 अंतर्गत वारस नोंदी करणे, तुकडे बंदी कायद्यानुसार कार्यवाही करणे, आधार कार्ड, जातीचे दाखले, रहिवासी दाखले, वय अधिवास दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशनकार्ड ची सर्व कामे, जेष्ठ नागरिक दाखले, सांगयो, इगायो, फॉर्म भरून ज्यांचे वय वर्ष 18 पूर्ण झालेले आहेत अशा मतदारांचे नवीन मतदानओळखपत्र बनविण्याकामी फॉर्म भरून घेणे तसेच या शिबिरादरम्यान विविध योजनेसाठी लाभार्थीनी अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देणार आहे. तसेच सद्य परिस्थितीत नागरिकांना व विद्यार्थ्यांना लागणारे विविध दाखले या शिबिरात देण्यात येणार आहेत.

 

००००००००

संबंधित पोस्ट

जावली तालुक्यात 25 एप्रिल रोजी सरपंच पदांची सोडत*

जिल्हा पाणी व स्वच्छता समिती बैठक जलजीवन मिशन’साठी कालबद्ध कार्यक्रम राबवा-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

सामाजिक उत्तरदायित्व निधीतून टोयोटा-किर्लोस्कर करणार पाणलोट विकास16 कोटी निधीतून 6167 हेक्टरवर जलसंधारण,11 हजारांहून अधिक ग्रामस्थांना होणार फायदा

पत्रकार दिनः जिल्हा माहिती कार्यालयात बाळशास्त्री जांभेकरांना अभिवादनचौथा स्तंभ म्हणून माध्यमांचे योगदान अमूल्य- प्रशांत दैठणकर

जमिन सुधारणा उपाययोजना राबवा-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज नामांतर*