vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अमली पदार्थविरोधी मोहिमेंतर्गत  जबाबदारीने, गांभीर्याने कार्यवाही करावी            – जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष – सांगली जिल्हा एनकॉर्ड समितीच्या बैठकीत घेतला आढावा 

अमली पदार्थविरोधी मोहिमेंतर्गत जबाबदारीने, गांभीर्याने कार्यवाही करावी     – जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष- सांगली जिल्हा एनकॉर्ड समितीच्या बैठकीत घेतला आढावा

 सांगली, प्रतिनिधी “अमली पदार्थमुक्त सांगली जिल्हा” अभियानांतर्गत जिल्ह्यात अमली पदार्थ, गांजा व तत्सम पदार्थांची निर्मिती, साठवणूक, विक्री व वापर होणार नाही व भावी पिढीचे यापासून संरक्षण होईल, यासाठी अमली पदार्थ विरोधी समितीच्या सर्व शासकीय सदस्यांनी जबाबदारीने व गांभीर्याने कार्यवाही करावी. केलेल्या कार्यवाहीचा सचित्र अहवाल सादर करावा. तसेच, हे अभियान अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी संबंधित सर्व शासकीय यंत्रणांनी तपासणी मोहीम व व्यापक जनजागृती मोहीम प्रभावीपणे राबवावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी आज येथे दिल्या.

 जिल्हास्तरीय अमली पदार्थ विरोधी समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक कक्षात झालेल्या या बैठकीस अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीत अमली पदार्थ प्रतिबंधक कार्यवाही, उपाययोजना व जनजागृती याबाबत आढावा घेण्यात आला.

 जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष म्हणाले, अमली पदार्थ विरोधी अभियानामध्ये पोलीस पाटील यांच्यासह तलाठी, ग्रामसेवक यांनाही सहभागी करून घ्यावे. ग्रामसभेमध्ये याबाबत अधिकाधिक जनजागृती करावी. कृषि विभागाने क्षेत्र तपासणी, एमआयडीसी व जिल्हा उद्योग केंद्राने चालू व बंद कारखाने तपासणी मोहीम, रेल्वेचे डबे व वाहनांवर अमली पदार्थ विरोधी जनजागृती स्टिकर्स लावणे, शाळा-महाविद्यालयांची तपासणी करणे आदिंच्या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीचा सचित्र व सविस्तर माहितीचा अहवाल सादर करावा. कामगारांमध्ये जनजागृती करावी. कोणत्याही ठिकाणी असे पदार्थ आढळले तर त्याबाबतही व्यापक प्रसिद्धी करावी. जूनमध्ये शाळा सुरू झाल्यानंतर शाळांची तपासणी मोहीम हाती घ्यावी, असे त्यांनी यावेळी सूचित केले

.यावेळी अमली पदार्थ अनुषंगाने कृषि, उपप्रादेशिक परिवहन, जिल्हा उद्योग केंद्र, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आदि विभागांनी केलेल्या कार्यवाहीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

 जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक सभागृहात झालेल्या या बैठकीस स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरजचे डॉ. राजकिरण साळुंखे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे, एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी वसुंधरा बिरजे, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते. पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी बैठकीच्या अनुषंगाने आवश्यक माहिती सादर केली.

00000

संबंधित पोस्ट

राज्यातील अपुऱ्या पर्जन्यमानाच्या पार्श्वभूमीवर ३१ ऑगस्ट पर्यंत पिण्याचा पाणी पुरवठा निश्चित करावा – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

जम्मू काश्मीर सीमेवरील जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट जाहीर

नवी मुंबई महानगरपालिका ईटीसी केंद्रामध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांचीही भक्ती प्रबोधनात्मक स्वच्छता दिंडी

सर्व नगरपरिषदा व नगरपंचायत निवडणुकांची मतमोजणी २१ डिसेंबरला मतदानोत्तर चाचण्यांच्या निष्कर्षांना २० डिसेंबरपर्यंत बंदी

vishwatmaklokswamivarta

आरोग्य, विद्यूत, पाणी पुरवठा, जलसंधारणसह पायाभूत सुविधांसाठीवाढीव 346 कोटींची मागणी करणार-पालकमंत्री शंभूराज देसाई

vishwatmaklokswamivarta

छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये वर्किंग वुमेन्स होस्टेल वओल्ड एज होम उभारण्याबाबतचा प्रस्ताव सादर करा- गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्याकडून म्हाडाच्या कामकाजाचा आढावा…

vishwatmaklokswamivarta