vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

धर्मवीर संभाजी हायस्कूल ठरले ‘माजी विद्यार्थी संघ’ स्थापन करणारे पहिले विद्यालय.विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्यात – २५ वर्ष जुन्या आठवणींनी शिक्षक -विद्यार्थ्याचे पाणावले डोळे

धर्मवीर संभाजी हायस्कूल ठरले ‘माजी विद्यार्थी संघ’ स्थापन करणारे पहिले विद्यालय.विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्यात – २५ वर्ष जुन्या आठवणींनी शिक्षक -विद्यार्थ्याचे पाणावले डोळे

अंबड प्रतिनिधी: तालुक्यातील डोमेगाव येथील धर्मवीर संभाजी हायस्कूलने आपले विद्यालय शैक्षणिक आणि भौतिकदृष्ट्या ‘समृद्ध’ करण्यासाठी, शासनाच्या आदेशानुसार सन १९९७ पासून शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांचा मेळावा घेऊन ‘माजी विद्यार्थी संघ’ स्थापन केला. जालना जिल्ह्यात पहिला ‘माजी विद्यार्थी संघ’ स्थापन करणारे धर्मवीर संभाजी हायस्कूल हे जिल्ह्यातील पहिले विद्यालय ठरले. विशेष म्हणजे या संघामध्ये उच्चशिक्षित माजी विद्यार्थ्यांची अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांवर निवड करण्यात आली आहे. शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी हा मेळावा जुन्या आठवणींना उजाळा देणारा अविस्मरणीय क्षण ठरला असून शाळेला नवी शैक्षणिक दिशा देणारा ठरला .

या मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे माजी मुखाध्यापक सी. एस. मेटकर, संस्थेचे सचिव विनायक चोथे, अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक जगन दुर्गे, केंद्रप्रमुख पांगारकर, सरपंच डॉ. अशोक काळबांडे, श्रीमती मिठे मॅडम, ढवळे सर, नाटकर सर, माळोदे सर, कल्याण जायभाये सर यांच्यासह १९९७ ते २०२४ पर्यंतच्या बॅचचे शेकडो विद्यार्थी आवर्जून उपस्थित होते. या मेळाव्यातून २५ वर्ष जुनी शाळा, कडू–गोड आठवणी, संघर्षातून व हलाखीच्या परिस्थितीत घेतलेले शिक्षण—या साऱ्या आठवणींना विद्यार्थ्यांनी उजाळा दिला. शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करताना अनेकांचे डोळे पाणावले.

शाळेच्या पहिल्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी श्रीमती मिठे मॅडम यांच्यासोबत पुन्हा एकदा वर्गात बसून जुने क्षण जणू पुन्हा जगले; हा भावनिक क्षण पाहून सर्वांचे डोळे पाणावले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मुख्याध्यापक जगन दुर्गे यांनी ‘माजी विद्यार्थी संघ’ स्थापन करण्यामागील शासनाची भूमिका स्पष्ट करून विद्यार्थ्यांना आपापल्या परीने योगदान देण्याचे आवाहन केले. या आवाहनाला सर्व विद्यार्थ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक मदतीची तयारी दर्शवली. शाळेच्या १९९७ च्या पहिल्या बॅचच्या विद्यार्थ्यांकडून यावेळी सर्व शिक्षकांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

संतोष शेळके यांच्याकडून शिष्यवृत्तीचा पुढाकार,शाळेचे माजी विद्यार्थी व ग्रंथपाल श्री. संतोष शेळके यांनी शाळेप्रती असलेले प्रेम आणि सामाजिक बांधिलकी म्हणून हायस्कूलच्या ग्रंथालयासाठी पुस्तके भेट दिली. तसेच आठवी, नववी आणि दहावीच्या वर्गातून प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्या आईच्या नावाने स्व. मुक्ताबाई गुणवंत शिष्यवृत्ती देण्याची घोषणा केली. शिष्यवृत्ती म्हणून अनुक्रमे ३ हजार, ५ हजार आणि १० हजार रुपये शिष्यवृत्ती देण्याचे त्यांनी जाहीर केले. याशिवाय इतर अनेक विद्यार्थ्यांनीही शाळेला आवश्यक असलेल्या सोयीसुविधांसाठी सर्वतोपरी मदत करण्याचा शब्द दिला.प्रदीप लेकरवाळे यांची विद्यार्थी संघाच्या अध्यक्षपदी निवड,शासनाच्या आदेशानुसार सर्वानुमते स्थापन करण्यात आलेल्या समितीत विधीज्ञ प्रा. प्रदीप लेकरवाळे यांची अध्यक्षपदी, राम चोथे यांची उपाध्यक्षपदी तर गजानन गोधे यांची कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली. या सर्वांचं शिक्षक व माजी विद्यार्थ्यांनी सत्कार करून अभिनंदन केले.

————————————

संबंधित पोस्ट

परवानाधारकाकडील शस्त्रे पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्याचे जिल्हादंडाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे निर्देश • शस्त्रे जमा करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना

vishwatmaklokswamivarta

वैद्यकीय देयकांचा निपटारा आता होणार ‘महाकर्मी’ पोर्टलद्वारे

डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी स्वीकारला बुलढाणा जिल्हाधिकारी पदाचा पदभार

एस.टी. प्रवासाचा नवा डिजिटल युगारंभ;सवलतधारकांसाठी ‘NCMC’ स्मार्ट कार्ड अनिवार्य-परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

vishwatmaklokswamivarta

भेसळयुक्त खाद्यतेलाचा ४२ हजार २९४ किलो साठा जप्त;अन्न व औषध प्रशासन विभागाची ऑगस्टपासूनची कारवाई

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय एकता दिनानिमित्त शुक्रवारी सांगलीत,उरूण ईश्वरपूरमध्ये शनिवारी पदयात्रा…

vishwatmaklokswamivarta