vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी वारकऱ्यांना महत्त्वाचे आवाहन 

संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी वारकऱ्यांना महत्त्वाचे आवाहन

पुणे प्रतिनिधी-संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी वारकऱ्यांना महत्त्वाचे आवाहन केले आहे.🌧️ पुणे जिल्ह्यात अतिवृष्टी – जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांची माहिती,पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी पत्रकार परिषदेत परिस्थितीबाबत सविस्तर माहिती दिली.

सध्याच्या अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे देहू आणि आळंदी परिसरात मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे वारकऱ्यांनी देहू व आळंदी येथे न येता थेट पुण्यात येण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.वारकऱ्यांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

तसेच  जिल्ह्यात रेड व ऑरेंज अलर्ट जारी असून सर्व यंत्रणा सतर्क ठेवण्यात आल्या आहेत.🏠 पूरग्रस्त भागात बचाव व मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.🚧 धोकादायक भागातील नागरिकांचे स्थलांतर करण्यात येत असून नदीपात्र व पुलांवर सतत देखरेख ठेवली जात आहे.📢 नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.🤝 एनडीआरएफ, पोलीस, अग्निशमन दल व महसूल यंत्रणा समन्वयाने कार्यरत आहेत.

000000

 

संबंधित पोस्ट

आयडिएशन कॉम्पिटिशन ३.०’ विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना चालना देणारी ठरेल – कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

नवीकरणीय ऊर्जाधारित शहरी प्रशासनातील उत्कृष्टता पुरस्कारा’ने नवी मुंबईचा राज्यस्तरीय गौरव

रोहा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचे आयोजन नागरीक, शेतकरी व विद्यार्थ्यांनी शिबिराचा लाभ घ्यावा

मराठी भाषेची ख्याती विश्वस्तरावर पोहोचवण्यासाठी विश्व मराठी संमेलनात सर्वांचा सहभाग महत्त्वाचा-मराठी भाषा मंत्री उदय सामंत

vishwatmaklokswamivarta

वाहन तपासणी मोहीम पारदर्शक व कायद्यानुसार;उप प्रादेशिक परिवहन विभागाची माहिती अपघातांमध्ये 15.99 टक्क्यांनी घट

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेंतर्गत ई-केवायसी करण्याची दि.३० एप्रिल पर्यंत संधी उपलब्ध