vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

नेपाळमध्ये अडकलेल्या रायगड जिल्ह्यातील पर्यटकांनी जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्राशी संपर्क साधावा – जिल्हा प्रशासन तर्फे आवाहन*

*नेपाळमध्ये अडकलेल्या रायगड जिल्ह्यातील पर्यटकांनी जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्राशी संपर्क साधावा – जिल्हा प्रशासन तर्फे आवाहन*

रायगड प्रतिनिधी : नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर विविध देशांतील पर्यटक व नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे.

या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील जे पर्यटक सध्या नेपाळमध्ये असून पूरस्थितीमुळे अडकले आहेत किंवा ज्यांचा त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क होत नाही, त्यांनी अथवा त्यांच्या नातेवाईकांनी तात्काळ जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

यासाठी खालील क्रमांकांवर संपर्क साधता येईल :जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्र, रायगड

8275152363-

02141- 222118 / 02141-222097

नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांची माहिती प्रशासनाला देताना संबंधित व्यक्तीचे नाव, मोबाईल क्रमांक, नेपाळमधील सध्याचे ठिकाण/हॉटेल, प्रवासाचा तपशील आणि कुटुंबीयांचा संपर्क क्रमांक उपलब्ध असल्यास तो द्यावा.

रायगड जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरून न जाता अधिकृत माहितीसाठी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा. आपत्तीग्रस्त भागातील नागरिक व पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती माहिती व समन्वय साधण्याचे प्रयत्न प्रशासनामार्फत करण्यात येत आहेत.

000

संबंधित पोस्ट

हर घर तिरंगा’ मोहीमेंतर्गत लोकसहभागातून होणार विविध उपक्रमांचे आयोजन

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने आज आपल्या एअरसाइड कामकाजाची सुरुवात पहिल्या व्यावसायिक विमानाचे आगमन,पारंपरिक वॉटर कॅनन सॅल्यूट देऊन सन्मानित

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्राची तनु भान देशातील ‘सर्वोत्कृष्ट कॅडेट’ पंतप्रधान मोदींच्या हस्ते सुवर्ण पदकाने सन्मानित

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील मृद व जलसंधारणाची सर्व कामे वेळेत पूर्ण करावीत – मंत्री संजय राठोड• राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी घेतला मृद व जलसंधारण विभागाच्या विविध विषयांचा आढावा

कोयना व वारणा धरणातील वाढता विसर्ग पाहता सांगलीत कृष्णा नदीती पाणी पातळीत सातत्याने वाढ,पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला संभाव्य पूरस्थितीचा आढावा- यंत्रणांनी सज्ज राहण्याचे दिले आदेश

मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष)-राज्यातील ५६० गोशाळांच्या बँक खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन वितरण…