vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

उद्योजकता विकास प्रशिक्षणातून महिलांचे सक्षमीकरण- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- उद्योजकता विकास प्रशिक्षणात 900 महिला सहभागी – जिल्हा वार्षिक योजनेतून 1 कोटी 62 लाखांची तरतूद

उद्योजकता विकास प्रशिक्षणातून महिलांचे सक्षमीकरण- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- उद्योजकता विकास प्रशिक्षणात 900 महिला सहभागी – जिल्हा वार्षिक योजनेतून 1 कोटी 62 लाखांची तरतूद

सांगली, प्रतिनिधी: महिला शिकली तर सक्षम होईल. महिला सक्षम असेल तर सर्व कुटुंब सक्षम होईल आणि कुटुंब सक्षम असेल तर देशाची अर्थव्यवस्था मजबूत होईल. त्यामुळे महिला उद्योजकता विकास प्रशिक्षणातून महिलांना सक्षम करण्यास प्रोत्साहन देण्यात येत आहे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केले.

महिला उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. खरे मंगल कार्यालय येथे आयोजित या कार्यक्रमास जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी वर्षा पाटील, उद्योग अधिकारी टी. एन खांडेकर, महिला उद्योजकता विकास केंद्राचे आलोक मिश्रा, प्रकल्प अधिकारी किरण बनसोडे आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

महिला आरक्षणाच्या अनुषंगाने माहिती देऊन पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, समाजात महिलांची मोठी ताकद आहे. त्यामुळे महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊन कुटुंब व इतरांना मदत करण्यासाठी सक्षम होणे आवश्यक आहे. महिलांनी स्वावलंबी होण्यासाठी उद्योजकतेकडे वळावे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन महिलांनी स्वतःचे उद्योग उभारावेत. त्यासाठी महिलांनी विविध शासकीय योजनांची माहिती घ्यावी. तसेच, प्रशिक्षण कार्यक्रमातून महिलांना व्यवसाय उभारणी, विविध उद्योगांची माहिती, कर्ज योजना, व्याजपरतावा, आर्थिक व्यवस्थापन, विपणन कौशल्ये याबाबत माहिती द्यावी, असे त्यांनी सूचित केले.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्ह्यातील 900 महिलांना उद्योजकता प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेंतर्गत ग्रामीण भागातील बचत गटातील 500 महिलांच्या प्रशिक्षणासाठी 90 लाख रूपये, महिला आर्थिक विकास महामंडळांतर्गत ग्रामीण भागातील बचत गटातील 250 महिलांच्या प्रशिक्षणासाठी यांना 45 लाख रूपये आणि महिला व बालविकास विभाग यांच्याकडील ग्रामीण भागातील 15 महिलांच्या प्रशिक्षणासाठी 27 लाख रूपये असे एकूण 1 कोटी 62 लाख रूपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. तांत्रिक उद्योजकता विकास कार्यक्रमांतर्गत होम डेकोर व भेट वस्तू, साडी ड्रेपिंग, मेक अप, इव्हेंट डेकोर, फॅशन ज्वेलरी डिझाईन व बुटिक व्यवसाय, दुग्धजन्य उत्पादने, मसाला व मुखवास, कॅटरिंग व लघु हॉटेल व्यवस्थापन, हस्तकला, रेझिन आर्ट, अगरबत्ती धूप इत्यादि पूजा साहित्य उत्पादन आदिंचे प्रशिक्षण या महिलांना देण्यात येत आहे.

जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय सांगली, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, महिला व बालविकास विभाग, महिला आर्थिक विकास महामंडळ आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED) यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला.

 प्रास्ताविकात आलोक मिश्रा यांनी कार्यक्रमाचा हेतू विषद केला. या कार्यक्रमास जिल्हाभरातून प्रशिक्षणात सहभागी झालेल्या महिला उपस्थित होत्या.

00000

संबंधित पोस्ट

 मुंबईसह रायगड जिल्ह्यात 2 ते 4 जुलैदरम्यान अतिमुसळधार पावसाची शक्यता नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

शासन निर्णयाची प्रशासकीय अधिकार्‍यांकडून पायमल्ली- अ‍ॅड. मगरेप्रशासनाने दलीत आदिवासी गायरान कास्तपट्टे सौरऊर्जा प्रकल्पाच्या नावाने हिसकावून घेतल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट जनआंदोलन -अ‍ॅड.भास्कर मगरे यांचा प्रशासनाला इशारा

जनगणना २०२७: स्वगणनेच्या टप्प्यास प्रारंभ प्रगणकांना योग्य व अचूक माहिती द्या- पालकमंत्री संजय शिरसाट

महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करूनदेण्यासाठी ‘शक्ती ऑन व्हील्स’ उपक्रम महत्त्वपूर्ण- मंत्री आदिती तटकरे• सचिवालय जिमखाना येथे ‘शक्ती ऑन व्हील्स’ प्रदर्शनी व विक्री व्हॅनचे उद्घाटन• नोकरदार महिलांना दर्जेदार खाद्यपदार्थ व घरगुती वस्तू सहज उपलब्ध होणार

योग्य नियोजनासह सकारात्मकतेने परीक्षांना सामोरे जा – पंतप्रधान नरेंद्र मोदी १० वी, १२ वी परीक्षांच्या पार्श्वभूमीवर ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात पंतप्रधानांचा विद्यार्थ्यांशी संवाद

vishwatmaklokswamivarta

अमृतपेठ-थेट स्वदेशी बाजारपेठ अभिनव संकल्पनेच्या शुभारंभ कार्यक्रमाचे खोपोली येथे आयोजन