vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शासन निर्णयाची प्रशासकीय अधिकार्‍यांकडून पायमल्ली- अ‍ॅड. मगरेप्रशासनाने दलीत आदिवासी गायरान कास्तपट्टे सौरऊर्जा प्रकल्पाच्या नावाने हिसकावून घेतल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट जनआंदोलन -अ‍ॅड.भास्कर मगरे यांचा प्रशासनाला इशारा

शासन निर्णयाची प्रशासकीय अधिकार्‍यांकडून पायमल्ली- अ‍ॅड. मगरेप्रशासनाने दलीत आदिवासी गायरान कास्तपट्टे सौरऊर्जा प्रकल्पाच्या नावाने हिसकावून घेतल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट जनआंदोलन -अ‍ॅड.भास्कर मगरे यांचा प्रशासनाला इशारा

भोकरदन, (प्रतिनिधी)-प्रशासनाने दलीत आदिवासी गायरान कास्तपट्टेसौरऊर्जा प्रकल्पाच्या नावाने हिसकावून घेतल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट जनआंदोलन करण्याचा इशारा शिवसेना दलित आघाडीचेजिल्हाप्रमुख अ‍ॅड.भास्कर मगरे यांनी प्रशासनाला दिला आहे.भोकरदन येथील शासकीय विश्रामगृह परिसरात माजीमंत्री तथा आमदार अर्जुनखोतकर यांच्या आदेशाने शिवसेनेच्या वतीने भोकरदन- जाफराबाद दलित आदिवासीतालूकास्तरीय भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यातशिवसेना दलित आघाडीचे जिल्हाप्रमुख अ‍ॅड. भास्कर मगरे यांनी प्रमुखउपस्थित राहून मार्गदर्शन केले. यावेळी दलित आघाडीचे जिल्हाप्रमुख अ‍ॅड.भास्कर मगरे म्हणाले की, विधी मंडळामध्ये लोकहिताचे बहुमताने विधायक पासकरुन त्याचे रुपांतर कायद्यात होते ते शासकीय जीआर म्हणून प्रशासनाकडेअंमलबजावणीसाठी पाठविले जातात. मात्र प्रशासकीय अधिकारी शासन निर्णयाचीअंमलबजावणी न करता केराची टोपली दाखवतात. अशा प्रशासकीय अधिकार्‍यांवरफौजदारी गुन्हे दाखल करण्याची तरतुद करणे आवश्यक आहे. कारण शासन निर्णय२८ नोव्हेंबर १९९१ अधिनियम पारित करुन ३५ वर्षे झाली मात्र प्रशासकीयअधिकारी शासन निर्णय गांभीर्याने घेत नाहीत. शासन निर्णय २८ नोव्हेंबर१९९१ अधिनियम राज्यातील दलित आदिवासी भुमिहिन कास्तपट्टे नियमानुकूलितकरुन सातबारा उतार्‍याला नोंद घेण्याचे आदेश आहेत.तसेच १ एप्रिल १९७८ ते १४ एप्रिल १९९०च्या दरम्यान महाराष्ट्रातील दलितआदिवासी कास्तपट्टे नावे करुन सातबारा देण्यात यावा मात्र प्रशासकीयअधिकारी लाच घेतल्याशिवाय शासन निर्णयावर विचार करीत नाहीत. पर्यायानेदलित आदिवासी कास्तपट्टे सातबारा मिळत नाही. उलट दलित आदिवासी कास्तपट्टेधारकांना नोटीसा देवून कायदेशिर शेतीसाठी झालेले अतिक्रमण निष्कशीत करण्याची धमकी दिली जाते. त्याला आम्ही भिक घालीत नाही.सौर ऊर्जा प्रकल्प प्रशासकीय अधिकारी दलित आदिवासी वहिती मशागत केलेल्यापिकांत उभारणी करण्याचा घाट घालीत आहेत. पोलीस बळाआधारे स्थानिक दलितआदिवासी कास्तकरांना पोलीस बळाचा वापर करुन दहशत निर्माण करुन जबरी ताबाकरीत आहेत. जैनपुर कोठार येथील प्रकरण जालना येथील वरिष्ठ न्यायालयातन्याय प्रविष्ठ असतांना तसेच मौजे वाकडी येथील प्रकरण न्याय प्रविष्ठ असतांना भोकरदन तहसिलदाराने पोलीस बळ वापरुन दलित आदिवासींना मारहाण करुनघरे पाडून अत्याचार केला तसेच महाराष्ट्र शासनाचा सौरऊर्जा प्रकल्पप्रशासन चुकीच्या पद्धतीने राबवत दलीत आदिवासी भूमिहीन कास्त पट्टेपोलिस बळ वापरून ताबा करत आहे,ही प्रशासनाची कृती लोकशाहीला धरून नक्कीचनाही. या पुढे प्रशासनाने दलीत आदिवासी भूमिहीन कास्तपत्ट्टे बेकायदेशीररित्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्यास जिल्हाधिकारी कचेरीवर आक्रमक जनआंदोलन करण्यात येईल.राजूर येथील ग्रामसेवक गावातील कचरा दलीत आदिवासींच्या वाहिती मशागत केलेल्या पेरलेल्या पिकात टाकण्याचे आदेश देवून दलीत आदिवासी वर अत्याचार करीत आहे. अनेक वर्षापासून हा ग्रामसेवक या गावात असून याच गावचा रहिवासीआहे, बदली झाली तरी गाव सोडत नाही, सीईओकडून चौकशी व्हावी. आदीमागण्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी नानासाहेब वानखेडे,अण्णासाहेबबलराज,जयकुमार खरात, प्रल्हाद साळवे,संदीप काकडे, कैलाश सुरडकर,संजयघोरपडेसह भोकरदन – जाफराबाद तालुक्यातील दलीत आदिवासी कार्यकर्ते आणिलाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

संबंधित पोस्ट

रविवारचा आठवडी बाजार रद्द; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

vishwatmaklokswamivarta

सनातन संस्थेचे प्रसिद्धीपत्रक !*सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाची तयारी पूर्ण : उत्कंठा शिगेला !**गोमंतकात प्रथमच भरणार हजारो भक्तांचा कुंभमेळा !२३ देशांतील प्रतिनिधी २५ हजार भाविक  १५ पावन संतपादुका  सोमनाथ ज्योतिर्लिंग  ऐतिहासिक शस्त्रप्रदर्शन • देव, देश व धर्म जागृतीचा संदेश!

शंकरपटाच्या लोकप्रियतेवर माळेगावच्या गर्दीचे शिक्कामोर्तब; हजारो शेतकऱ्यांनी अनुभवला ५८ बैल जोड्यांचा सहा तास थरार

दहावी, बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त अभियानासाठी शिक्षण मंडळ सज्ज

vishwatmaklokswamivarta

औरंगाबाद विभाग पदवीधर विधानपरिषद मतदार संघांच्या नव्याने तयार करण्यात येत असलेल्या मतदार यादीच्या संदर्भात महत्वाचा खुलासा…

vishwatmaklokswamivarta

आरोग्य सेवा शेवटच्या घटकापर्यंत पोचविण्यासाठी केंद्र व राज्य शासन कटिबद्ध*- प्रतापराव जाधव*राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त सिंदखेडराजा व सवणा येथील मोफत आरोग्य रोगनिदान शिबिराचा गरजूंनी घेतला लाभ !*

vishwatmaklokswamivarta