vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

सर्व भारतीयांचं स्वप्नं पूर्ण करणारा अर्थसंकल्प- माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री अँड आशिष शेलार

सर्व भारतीयांचं स्वप्नं पूर्ण करणारा अर्थसंकल्प- माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री अँड आशिष शेलार

मुंबई, प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश “विरासत के साथ विकास” अशी घोडदौड करीत असताना आज अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी जाहीर केलेला अर्थसंकल्प हा सर्व भारतीयांचे स्वप्न पुर्ण करणारा आहे.

हा जनता जनार्दनासाठीचा अर्थसंकल्प असून विकसित भारताचे मिशन पूर्णत्वास नेणारा अर्थसंकल्प आहे. देशातील मध्यमवर्गीयांच्या हिताला महत्त्व देत निर्माण केलेली नवी कर रचना पाहता देशाच्या नागरिकांना विकासाचे भागिदार बनवणारा अर्थसंकल्प आहे.

ग्रामिण व्यवस्थेतील नवी क्रांती निर्माण करणारा अर्थसंकल्प तसेच नागरिकांना आरोग्यविषयक सुविधा देण्यासाठी मोदी सरकार कटीबद्ध असून अर्थसंकल्पातून हे परावर्तित होत आहे. देशातील महिलांना सक्षम करणारा अर्थसंकल्प आहे. तसेच तो शेतकऱ्यांना भरघोस निधी उपलब्ध करून देणारा आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराला चालना देणारा अर्थसंकल्प आहे.

अशा प्रकारे सर्व भारतीयांना दिलासा देणारा हा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री निर्मला सितारामन यांचे आभार मानले आहेत.0000

संबंधित पोस्ट

एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक स्कूल प्रवेश स्पर्धापरीक्षा १ मार्च रोजी

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय खतविक्री आराखडा; खत खरेदीचे मोबाईल ॲपः पथदर्शी प्रकल्पात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा समावेश

दिव्यांगांची क्षमता पाहून त्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत   – जिल्हाधिकारी अशोक काकडे- जागतिक दिव्यांग दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात…

vishwatmaklokswamivarta

समाजकारण- राजकारणातील निस्पृहतेचा आदर्श काळाच्या पडद्याआड  – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस· ज्येष्ठ विचारवंत, समाजसेवक पन्नालाल सुराणा यांना श्रद्धांजली

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकाऱ्यांकडून मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या गृहनिर्माण प्रश्नाची दखल;कास्ट्राईब महासंघातर्फे संविधान प्रत देऊन आभार.

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील 11 नगरपरिषद निवडणुकांचे निकाल जाहीर

vishwatmaklokswamivarta