vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना उमेदवार निवड मेळाव्याचे आयोजन

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना उमेदवार निवड मेळाव्याचे आयोजन

रायगड प्रतिनिधी :रायगड जिल्ह्यातील सर्व बेरोजागार उमेदवारांसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड अलिबाग व पातळगंगा आणि रसायनी इंडस्ट्रीज असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दि.27 मार्च, 2025 रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 02.00 या वेळेत पातळगंगा आणि रसायनी इंडस्ट्रीज शाळा, पी 13 एम.आय.डी.सी. निवासी परिसर, मोहपाडा ता. खालापूर जि. रायगड येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना (Internship) उमेदवार निवड मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील नामांकीत आस्थापनांकडील रिक्तपदांच्या अॅप्रेंटिसशिपची भरतीसाठी रोजगार मेळावा आयोजित केला आहे. सदर मेळाव्यात एस.एस.सी./एच.एस.सी, आय.टी.आय., डिप्लोमा इंजिनियर, पदवी इंजिनियर, व इतर पदवी धारक नोकरी इच्छुक उमेदवाराची प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे. या विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेल्या उमेदवारांना ऑनलाईन पध्दीतीने अर्ज करता येईल. प्रथम https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावरील Employment – Job Seeker (Find A Job) – Job Seeker Login या क्रमाने जाऊन आपल्याकडील युजर आयडी व पासवर्ड वापरुन आपली शैक्षणिक माहीती अद्ययावत करून त्यातील Pandit Dindayal Upadhyay Job Fair या ऑप्शन मधून आपला जिल्हा निवडून जिल्ह्याच्या नावावरील Vacancy Listing-1 Agree व दिसणाऱ्या विविध पदाना आपल्या शैक्षणिक अर्हतेप्रमाणे ऑनलाईन अप्लाय करावे. व तसेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनामध्ये इंटर्शिषला अप्लाय करणेसाठी https://cmykpy.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावरील Intern Login ला क्लिक करुन आपल्याकडील युजर आयडी व पासवर्ड वापरुन आपली प्रोफाईल व शैक्षणिक माहीती अद्ययावत करुन Apply for Jobs ला क्लिक करुन आपला जिल्हा निवडून दिसणाऱ्या आस्थापनेच्या रिक्तपदांना Apply करावा.

रोजगार मेळाव्यातील रिक्तपदांची माहिती https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. संकेतस्थळावर ऑनलाईन अप्लाय करताना काही समस्या असल्यास या कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक ०२१४१-२२२०२९ किंवा श्री. महेश भा. वखरे, लिपिक-टंकलेखक यांचे ९४२१६१३७५७ या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

तरी जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी या रोजगार मेळाव्याचा फायदा घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मागदर्शन केंद्र, रायगड अलिबागच्या सहायक आयुक्त श्रीम.अ.मु.पवार यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सन २०२६-२०२७ या वर्षासाठी १७ प्रभाग समित्यांपैकी ‘पी दक्षिण’, ‘के पश्चिम’, ‘के उत्तर आणि के दक्षिण’, ‘एच पूर्व व एच पश्चिम’, ‘जी उत्तर’ आणि ‘जी दक्षिण’ या ६ प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदांची निवडणूक आज पार पडली. या सर्व सहा ठिकाणची निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार पडली. 

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लिलावती रुग्णालयात अभिनेते सैफ अली खान यांची घेतली भेट*

vishwatmaklokswamivarta

प्रवासी व एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना उत्तम सोयीसुविधा देण्यासाठी कटिबद्ध – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक ‘राष्ट्रीय रस्ता सुरक्षित महिना- २०२५’ चे उद्घाटन व नवीन इलेक्ट्रिक बस लोकार्पण परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते संपन्न

vishwatmaklokswamivarta

शनिशिंगणापूर मंदिरातील ११४ मुसलमान कर्मचाऱ्यांना हटवण्याचा निर्णय स्वागतार्ह-अन्य मंदिरांमधूनही मुसलमान कर्मचाऱ्यांना हटवा ! – हिंदु जनजागृती समिती

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांची कार्यवाही सुरळीत सुरु;अफवांवर विश्वास न ठेवण्याचे विजयसिंह देशमुख यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

पुर परिस्थितीबाबत ठाणे जिल्ह्यात अंमलबजावणीसाठी व्यापक उपाययोजना राबविण्यात येत आहेत,मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनानुसार प्रशासन सतर्क