vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

स्वच्छ सर्वेक्षण 2024’मध्ये आता स्वच्छ शहरांच्या नियमित क्रमवारीपेक्षा उच्च स्थानावर ‘सुपर स्वच्छ नवी मुंबई’**10 लाखापेक्षा अधिक लोकसंख्येच्या शहरात ‘सुपर स्वच्छ लीग’ मध्ये समाविष्ट महाराष्ट्रातील एकमेव शहर**महामहिम राष्ट्रपती श्रीम.द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते स्विकारला सन्मान**यशाचे श्रेय सातत्य राखणा-या स्वच्छतामित्र, स्वच्छतासखी आणि सर्व नागरिकांचे*

*‘स्वच्छ सर्वेक्षण 2024’मध्ये आता स्वच्छ शहरांच्या नियमित क्रमवारीपेक्षा उच्च स्थानावर ‘सुपर स्वच्छ नवी मुंबई’**10 लाखापेक्षा अधिक लोकसंख्येच्या शहरात ‘सुपर स्वच्छ लीग’ मध्ये समाविष्ट महाराष्ट्रातील एकमेव शहर**महामहिम राष्ट्रपती श्रीम.द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते स्विकारला सन्मान**यशाचे श्रेय सातत्य राखणा-या स्वच्छतामित्र, स्वच्छतासखी आणि सर्व नागरिकांचे*

    नवी मुंबई प्रतिनिधी-  शहरी गृहनिर्माण व विकास मंत्रालयाने यावर्षी ‘स्वच्छ सर्वेक्षण 2024’ करिता गुणांकन पध्दती बदललेली असून ‘सुपर स्वच्छ लीग’ही नवीन विशेष कॅटेगरी निर्माण केली आहे. स्वच्छतेत नेहमीच अग्रभागी असणा-या शहरांऐवजी इतरही शहरांना क्रमवारीत पुढे येण्याची संधी मिळावी यादृष्टीने ‘स्वच्छ सर्वेक्षण 2023’ पर्यंत जी शहरे लागोपाठ 3 वर्षे किमान 2 वेळा टॉप थ्री मध्ये आहेत अशा शहरांसाठी ‘सुपर स्वच्छ लीग’ ही क्रमवारीपेक्षा उच्च अशी विशेष कॅटेगरी निर्माण करण्यात आली आहे. यामध्ये 10 लाखापेक्षा अधिक लोकसंख्येच्या मोठ्या शहरांमध्ये नवी मुंबईला सुपर स्वच्छ मानांकन झालेले आहे. त्यामुळे नवी मुंबईने आता स्वच्छ शहरांच्या क्रमवारीपेक्षा उच्च स्थानावर ‘सुपर स्वच्छ लीग’ मध्ये मानांकन प्राप्त करीत आपली विजयपताका अक्षय फडकत ठेवली आहे. विशेष म्हणजे ‘सुपर स्वच्छ लीग’मध्ये समाविष्ट झालेल्या देशातील मोठ्या शहरांमध्ये नवी मुंबई हे महाराष्ट्रातील एकमेव शहर आहे. यासोबतच कचरामुक्त शहराचे सर्वोच्च ‘सेव्हन स्टार मानांकन’ तसेच ओडीएक कॅटेगरीमध्ये सर्वोच्च ‘वॉटरप्लस’ मानांकन नवी मुंबईने कायम राखले आहे,नवी मुंबईच्या या सातत्यपूर्ण स्वच्छता कार्याचा सन्मान नवी दिल्ली येथे विज्ञान भवनात संपन्न झालेल्या ‘स्वच्छ सर्वेक्षण 2024’ पारितोषिक वितरण सोहळ्यात महामहिम राष्ट्रपती श्रीम.द्रौपदी मुर्मू यांच्या शुभहस्ते, केंद्रीय गृहनिर्माण न शहरी व्यवहार मंत्री ना.श्री.मनोहरलाल खट्टर, राज्यमंत्री ना.श्री.तोखन साहू व सचिव श्री. श्रीनिवास करिकीथाला यांच्या प्रमुख उपस्थितीत, महाराष्ट्र राज्याच्या नगरविकास राज्यमंत्री ना.श्रीम.माधुरी मिसाळ व नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी स्विकारला. याप्रसंगी त्यांच्यासमवेत व्यासपीठावर शहर अभियंता श्री.शिरीष आरदवाड उपस्थित होते.

नवी मुंबईचा समावेश स्वच्छतेत सातत्य राखणा-या देशातील सर्वोत्तम स्वच्छ शहरांच्या ‘सुपर स्वच्छ लीग’ मध्ये होणे ही प्रत्येक नवी मुंबईकर नागरिकासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट असल्याचे सांगत महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी या माध्यमातून आपल्या महाराष्ट्र राज्याचीही शान उंचाविली असल्याचा आनंद व्यक्त केला.*4 स्वच्छताकर्मींचीही पारितोषिक वितरण सोहळ्याप्रसंगी विशेष उपस्थिती  या कार्यक्रमाप्रसंगी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ.अजय गडदे व श्रीम.स्मिता काळे, अतिरिक्त शहर अभियंता श्री.अरविंद शिंदे, परिवहन व्यवस्थापक श्री.योगेश कडुस्कर तसेच विशेषत्वाने प्रातिनिधिक स्वरूपात 2 स्वच्छतामित्र व 2 स्वच्छतासखी यादेखील उपस्थित होत्या.*सुपर स्वच्छ लीग मधील ऐतिहासिक मानांकनाचे श्रेय सर्वांचे – आयुक्तांचे प्रतिपादन*  नवी मुंबई शहराच्या या स्वच्छ सर्वेक्षणातील ‘सुपर स्वच्छ लीग’ मधील समावेशाचे व त्यामधील उच्च मानांकनाचे श्रेय आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री ना.श्री.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना.श्री.अजित पवार, वन मंत्री ना.श्री.गणेश नाईक, खा.श्री.नरेश म्हस्के, आ.श्रीम.मंदाताई म्हात्रे यांचे वेळोवेळी मिळणारे मार्गदर्शन, स्वच्छ नवी मुंबईचे ब्रँड ॲम्बेसेडर पद्मश्री शंकर महादेवन, पद्मश्री अच्युत पालव, श्री.शुभम वनमाळी यांचा पाठींबा, लोकप्रतिनिधींचे सहकार्य, शहर स्वच्छ ठेवण्यासाठी अहोरात्र झटणारे स्वच्छतामित्र व स्वच्छतासखी आणि सफाईमित्र तसेच महापालिका अधिकारी – कर्मचारीवृंद, स्वच्छताप्रेमी नागरिक, विविध क्षेत्रातील स्वयंसेवी संस्था व मंडळे, महिला संस्था व मंडळे, ज्येष्ठ नागरिक संघटना, तृतीयपंथी नागरिक, पत्रकार, शिक्षक व प्रामुख्याने एनएसएस, एनसीसी व सर्व उत्साही विद्यार्थी, उद्योजक, व्यापारी, व्यावसायिक अशा सर्व घटकांचा सक्रिय सहभाग यांना दिलेले आहे.*घनकचरा व्यवस्थापनात अत्याधुनिक स्मार्ट कार्यपध्दतींचा वापर* नवी मुंबई महानगरपालिकेने नेहमीच नाविन्यपूर्ण आणि सर्वसमावेशक असे स्वच्छता उपक्रम राबवित भारतातील इतर शहरांसाठी एक मापदंड प्रस्थापित करून दिलेला आहे.

‘स्वच्छ सर्वेक्षण 2024’ ला सामोरे जाताना ‘सुपर स्वच्छ लीग’ मध्ये समावेशासाठी 85 टक्केपेक्षा अधिक गुणांकन राखणे अनिवार्य होते. त्यातही नवी मुंबई महानगरपालिकेने महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसहभागावर भर देत अनेक उल्लेखनीय प्रकल्प राबविले, उपक्रमांचे यशस्वी आयोजन केले आणि ‘सुपर स्वच्छ लीग’ या सर्वोच्च कॅटेगरीमध्ये आपला समावेश निश्चित केला. * कचरा वर्गीकरण, संकलन व वाहतुक प्रणालीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर :      निर्मितीच्या ठिकाणीच ओला, सुका व घरगुती घातक अशा तीन प्रकारे कचरा वर्गीकरणावर भर देण्यासोबतच या वर्षीपासून सॅनिटरी कचरा स्वतंत्ररित्या संकलित करण्यास सुरूवात करण्यात आलेली आहे.      कचरा संकलन आणि वाहतूक (सी अँड टी) प्रणाली लागू करण्यात आलेली आहे. त्याकरिता मिनी टिपर्स, इलेक्ट्रिक ट्रक आणि कचरा कॉम्पॅक्टर्ससह 206 वाहनांचा ताफा कार्यरत आहे. त्यावर रिअल-टाइम ट्रॅकिंग आणि मार्ग निरीक्षण व नियंत्रणासाठी आरएफआयडी-सक्षम जीपीएस वापरण्यात येत आहे.तसेच मुख्य मार्गांच्या स्वच्छतेसाठी 7 यांत्रिक वाहने कार्यान्वित असून त्यामधील 5 वाहने पर्यावरणपूरक आहेत. त्याचप्रमाणे संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम अंतर्गत प्राप्त 10 पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहने परिसर सखीच्या कचरा वेचक महिलांव्दारे कार्यान्वित आहेत.* आयसीसीसी: माहिती तंत्रज्ञान आधारित अत्याधुनिक कार्यप्रणालीद्वारे स्मार्ट स्वच्छता,  नमुंमपा मुख्यालयातील इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर (आयसीसीसी) व्दारे जीपीएस-सक्षम वाहने, सीसीटीव्ही फीड्स आणि नागरिकांचे अभिप्राय अशा विविध माध्यमांचा प्रभावी वापर करून नवी मुंबईतील स्वच्छताविषयक कामांवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येते. रिअल-टाइम डेटा अॅनालिटिक्समुळे वाहनांची उपलब्धता, कचरा संकलन ट्रॅकींग आणि सेवांचे अनुपालन यांचे निरीक्षण व नियंत्रण करणे अधिक सोयीचे झाले आहे..* वस्त्र कचऱ्याचे संधीमध्ये रूपांतरण करणारा देशातील लँडमार्क प्रकल्प :    नवी मुंबई महानगरपालिकेने घनकचरा प्रकल्प स्थळावरील कच-याचा भार कमी करण्यासाठी आणि कचऱ्याचे पुनर्वापरयोग्य संसाधनांमध्ये रूपांतर करण्यासाठी ‘टेक्सटाइल रिकव्हरी फॅसिलिटी (TRF)’ हा अभिनव प्रकल्प केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालय अंतर्गत वस्त्रोद्योग समितीच्या सहयोगाने राबविण्यास सुरूवात केली असून वस्त्र कचरा उपयोगात आणणारा हा देशातील पहिलाच प्रायोगिक स्तरावर राबविला जाणारा अभिनव प्रकल्प आहे.* सी अँड डी वेस्ट प्रकल्प :    नवी मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी 150 टन प्रतिदिन क्षमतेचा बांधकाम व पाडकाम कचरा (C & D) प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित असून त्यापासून बनविले जाणारे पेव्हर ब्लॉक बांधकामाकरिता वापरले जातात. त्यातही महत्वाचे म्हणजे या पेव्हर ब्लॉक निर्मितीत 85 टक्के सी अँड डी कचरा वापरला जातो.* ओल्या कच-यापासून खतनिर्मिती तसेच सुक्या कच-याचा पुनर्वापर (MRF & RDF) :   प्रकल्पस्थळी येणा-या साधारणत: 750 टन प्रतिदिन कच-यापैकी 350 टन ओल्या कच-यावर प्रक्रिया करून खतनिर्मिती करण्यात येते तसेच 400 टन सुक्या कच-यातून प्लास्टिक, काच, कपडा, कागद अशाप्रकारे कचरा वेगवेगळा करण्यात येऊन तो पुनर्वापरात आणण्याची प्रक्रिया करण्यात येते. यामधील प्लास्टिक आरडीएफ सिमेंट उद्योगांमध्ये बॉयलर्स करिता वापरात आणले जाते तसेच प्लास्टिकचे ग्रॅन्युल्स हे डांबरी रस्ते निर्मितीच्या वेळी कोटींगसाठी वापरले जातात.   * नारळाच्या कच-यावरील प्रक्रिया प्रकल्प :   घनकचरा प्रकल्पस्थळी 10 टन प्रतिदिन क्षमतेचा नारळाच्या कच-यावर प्रक्रिया करून त्यापासून तंतू वेगळे करण्याचा अभिनव प्रकल्प राबविला जात असून त्याचा उपयोग कॉयर करण्यासाठी तसेच विविध मूर्ती तसेच शोभेच्या वस्तू बनविण्यासाठी केला जातो.* एकात्मिक प्रक्रिया केंद्र (ISWM) :     घनकच-यावरील प्रक्रियेत निघणारे पाणी अर्थात लिचेटवर प्रक्रिया करणारा प्रकल्पही याठिकाणी कार्यान्वित असून लिचेटवर शुध्दीकरणाची प्रक्रिया करून ते प्रक्रियाकृत पाणी तेथील वृक्षराजी फुलविण्यासाठी उपयोगात आणले जाते. अशाप्रकारे कच-याच्या सर्व गोष्टी जास्तीत जास्त उपयोगात आणल्या जातील असा प्रयत्न घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी करण्यात येतो. * निर्मितीच्या ठिकाणीच कच-याच्या विल्हेवाटीवर भर (BWG) : प्रतिदिन 100 किलोपेक्षा जास्त ओला कचरा निर्मिती होते अशा सोसायट्या, हॉटेल्स, संस्था यांनी त्यांच्याकडील ओल्या कच-याची विल्हेवाट त्यांच्या जागेतच करावी अशाप्रकारे 38 ठिकाणी ओल्या कच-यापासून बायोगॅस निर्मिती / खतनिर्मिती प्रकल्प राबविले जात असून त्यामुळे तो कचरा प्रकल्पस्थळापर्यंत वाहून नेणे व त्याठिकाणी त्यावर प्रक्रिया करणे याकरिता लागणा-या महानगरपालिकेच्या श्रम, मूल्य आणि वेळेत लक्षणीय बचत झालेली आहे.  * शून्य कचरा झोपडपट्टी मॉडेल : कच-यापासून स्थानिक पातळीवर खतनिर्मिती, सामुदायिक सक्षमीकरण, स्वच्छ परि नवी मुंबई महानगरपालिकेने पुढाकार घेत शून्य कचरा झोपडपट्टी मॉडेलची अभिनव संकल्पना राबविलेली आहेआ6  यामध्ये परिसर सखी या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून कचरावेचक महिलांना एकत्र आणून त्यांची परिसरनिहाय पथके नियुक्त केली असून त्या प्रत्येकी २५० घरांपर्यंत जाऊन कचरा वेगवेगळा गोळा करतात.     या कामाव्दारे त्यांच्यासाठी शाश्वत रोजगार निर्माण झाला आहे. यामुळे त्यांचे राहणीमान उंचावले असून त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी पर्यायाने प्रगतीसाठी हातभार लागला आहे.   * प्रगत सांडपाणी व्यवस्थापन

   नवी मुंबई शहरात ९९.९% सांडपाणी व्यवस्थापनाचे जाळे पसरलेले आहे. उर्वरित केवळ ४२ सेप्टिक टाक्या असून त्यादेखील यांत्रिक उपकरणांद्वारे नियमितपणे स्वच्छ केल्या जातात.मलनि:स्सारण प्रक्रिया आधुनिक पायाभूत सुविधा –     दररोज २३५ द.ल.लि. इतके 100 %सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. सर्व केंद्रांची एकूण क्षमता कितीतरी अधिक 454 द.ल.लि.इतकी आहेएसबीआर, सी-टेक या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर 7 मलप्रक्रिया केंद्रे कार्यान्वित असून स्काडा ऑटोमेशनची सुविधा आहे.  प्रक्रिया केलेल्या ३०% पेक्षा जास्त सांडपाण्याचा वापर हा पिण्याव्यतिरिक्त उद्याने व वृक्षरोपांचे सिंचन, बांधकाम आणि सार्वजनिक ठिकाणे व सुविधांची स्वच्छता अशा बाबींसाठी केला जातो. सद्यस्थितीत 45 द.ल.लि. क्षमतेचे ३ टर्शिअरी ट्रिटमेंट प्लान्ट (टीटीपी) असून आता बेलापूरमध्ये 7.5 द.ल.लि. क्षमतेचा टीटीपी उभारण्यात आलेला आहे.औद्योगिकीकरणात पाण्याच्या पुनर्वापराला प्रोत्साहन देण्यासाठी एमआयडीसी सोबत जानेवारी 2024 मध्ये सामंजस्य करार करण्यात आला असून त्या माध्यमातून सध्या 54 उद्योगसमुहांना पुनर्प्रक्रियाकृत पाणी पिण्याव्यतिरिक्त उपयोगासाठी दिले जात आहे. तसेच हे पाणी बांधकाम, उद्याने यासाठीही वापरले जात आहे.

 

स्मार्ट निरीक्षण आणि नियंत्रण -कार्यक्षमता, अनुपालन आणि तक्रार निवारणासाठी केपीआय-आधारित देखभाल आणि दुरूस्ती (O & M) ट्रॅकिंग प्रणाली.     पारदर्शकता सुनिश्चित करणारी आणि सतत सुधारणा घडवून आणणारी डेटा-चालित प्रणाली कार्यान्वित.स्वच्छताविषयक सातत्यपूर्ण उपक्रम आयोजनातून शहरात स्वच्छतेची चळवळ उभी राहिल्याचे चित्र* विविध उपक्रमांमध्ये लोकसहभागावर भर :वी मुंबई शहरातील मुख्य रस्ते, चौकांप्रमाणेच दुर्लक्षित जागा, पडीक ठिकाणे, खाडीकिनारे यांच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष देत नागरिकांच्या उत्स्फुर्त सहभागातून व्यापक प्रमाणात स्वच्छता मोहीमा हाती घेण्यात आल्या. सर्वसाधारपणे सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी अनेक स्वयंसेवी संस्था-संघटनांनी व स्वच्छताप्रेमी नागरिकांनी या स्वच्छता उपक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभाग घेऊन या मोहीमा यशस्वी केल्या. विशेष म्हणजे अनेक मोहीमांमध्ये महिला, ज्येष्ठ नागरिक अगदी तृतीयपंथी नागरिकही उत्साहाने सहभागी झाल , सायन पनवेल महामार्ग, ठाणे बेलापूर मार्ग या 2 मोठ्या मार्गांवर तसेच आशियातील सर्वात मोठे एपीएमसी मार्केट, रेल्वे स्टेशन्स, मार्केट, डेपो अशा वर्दळीच्या ठिकाणी विशेष स्वच्छता मोहीमांचे नियमित आयोजन करण्यात आले. यामध्ये विविध स्वयंसेवी संस्थांसोबत श्रीनानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या हजारो श्रीसदस्यांनीही उत्स्फुर्त सहभाग घेतला. मॅनग्रुव्हज् क्लीन मार्शल या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून प्रत्येक रविवारी सातत्याने खारफुटी स्वच्छता मोहीम राबविली          ‘स्वच्छता ही सेवा’ व प्रत्येक मोहीमांमध्ये नागरिकांसह शहराचे उद्याचे नागरिक असणा-या एनएसएस व एनसीसी विद्यार्थी – युवकांचा मोठ्या संख्येने उत्साही सहभाग राहिला. या सर्वांच्या एकत्रित सहभागातून शहरात स्वच्छतेची चळवळ उभी राहिल्याचे चित्र अनुभवायला मिळाले.* ‘सफाई अपनाओ – बिमारी भागो (एसएबीबी)’ अभियान :  ‘डॉक्टर्स डे’ चे औचित्य साधून महानगरपालिकेच्या वाशी सार्वजनिक रूग्णालयात या अभियानाची उत्साही सुरूवात करण्यात आली. सर्व आठही विभागांत महिनाभर विविध उपक्रम राबविण्यात आले. त्यामध्ये स्थानिक नागरिकांच्या व्यापक सहभागावर भर देण्यात आला.   १४,०००+ विद्यार्थ्यांनी सहभागी घेतलेला आरोग्यविषयक जागरूकतेचा सुप्रसिद्ध बालरोगतज्ञांसह फेसबुक लाईव्ह उपक्रम उत्साहाने साजरा झाला.     “रन विथ डॉक्टर्स” हाफ मॅरेथॉन यासारख्या विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून स्वच्छता आणि तंदुरूस्ती याविषयी जनजागृती करण्यात आली.* गुठली रिटर्न्स मोहीम :      जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिकेने राबविलेल्या ‘गुठली रिटर्न्स’ अर्थात खाऊन झालेल्या आंब्याच्या कोयी संकलित करून त्यापासून आंब्याची रोपे तयार करण्याची मोहीम यशस्वीपणे राबवित तब्बल ५३,००० हून अधिक आंब्याच्या कोयी संकलित केल्या. रेड एफएम व आरजे मलिष्का यांच्या सहभागाने, ही मोहीम यशस्वीरित्या राबविण्यात आली* स्वच्छ मॅरेथॉन :    स्वच्छता आणि आरोग्य यांची सांगड घालत पाम बीच मार्गावर स्वच्छ मॅरेथॉन 2024 आयोजित करण्यात आली होती. यामध्ये विविध वयोगटातील 6 हजारहून अधिक नागरिकांनी उत्साहाने सहभागी होत स्वच्छता संदेश प्रसारित केला.* स्वच्छता सायक्लोथॉन :   पर्यावरण जागरूकता वाढविण्यासाठी आणि प्लास्टिकला नाकारण्यासाठी केंद्र सरकारच्या स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत आयोजित स्वच्छता सायक्लोथॉनमध्ये ५०० हून अधिक नागरिक उत्साहाने सहभागी झाले. * स्वच्छता महोत्सव २०२४ :  शहर स्वच्छतेसाठी दररोज मौलिक योगदान देणा-या स्वच्छतामित्रांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा एक भव्यतम उत्साही उपक्रम स्वच्छता महोत्सवाच्या स्वरूपात सांस्कृतिक सादरीकरणातून आयोजित करण्यात आला. यामध्ये स्वच्छताकर्मींप्रमाणेच विद्यार्थ्यांनीही 5 हजारहून अधिक संख्येने उपस्थित राहून हा स्वच्छ महोत्सव यशस्वी केला.* शहराचे उद्याचे नागरिक असणा-या विद्यार्थी सहभागातून स्वच्छ मतदान उपक्रम :     विद्यार्थ्यांना लोकशाही व्यवस्थेतील मतदानाचे महत्व कळावे यादृष्टीने स्वच्छताविषयक मतदान हा अभिनव उपक्रम शाळांमध्ये राबविण्यात आला. ज्यामध्ये महानगरपालिका शाळांतील 21 हजाराहून विद्यार्थ्यांनी सहभागी होत शहर स्वच्छतेविषयी आपले मत नोंदविले व मतदान केले. या माध्यमातून त्यांच्यामार्फत स्वच्छतेविषयी नवनवीन संकल्पना मांडण्यात आल्या.* स्वच्छता दिंडी उपक्रम :     महाराष्ट्राला वारी आणि दिंडीची परंपरा लाभली असल्याचे लक्षात घेऊन पारंपारिक दिंडीला स्वच्छतेची जोड देत स्वच्छता दिंडी उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये तब्बल ९१ शाळांनी सहभागी होत उपक्रम यशस्वी केला. या अंतर्गत विद्यार्थ्यांनी कचरा वर्गीकरण, प्लास्टिक बंदी आणि शहराचे सौंदर्यीकरण यासारख्या विषयांवर सादरीकरण केले.  * स्वच्छता बुद्धिबळ मॉडेल:   बुध्दीबळाच्या पटावरून कचरा वर्गीकरण शिकविणारा व या माध्यमातून शालेय मुलांमध्ये स्वच्छतेच्या जबाबदार सवयी वृध्दींगत करणारा बुद्धिबळावर आधारित स्वच्छता बुध्दीबळ मॉडेल हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. ज्यामध्ये हजारो मुलांनी उत्साही सहभाग घेतला.* स्वच्छतामित्रांना कल्याणकारी योजनांचा लाभ व आरोग्याची काळजी : स्वच्छतामित्रांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) आणि प्रधानमंत्री विमा सुरक्षा योजना (PMBSY) त्याचप्रमाणे महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना यांचा लाभ उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.    स्वच्छताकर्मींच्या आरोग्याची काळजी घेत त्यांची आरोग्य तपासणी करण्यात येते तसेच त्यांना नवी मुंबई महानगरपालिकेच्या रूग्णालयात विनामूल्य उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. * स्वच्छताकर्मींसाठी नाट्यप्रयोग आयोजन :स्वच्छताकर्मींच्या जीवनानुभवावर आधारित ‘अंधे जहां के अंधे रास्ते’ हा विशेष नाटयप्रयोग विष्णुदास भावे नाट्यगृहात खास स्वच्छताकर्मींसाठी आयोजित करण्यात आला होता. स्वच्छताकर्मींच्या जीवनानुभवावर आधारित हे नाटक बघताना उपस्थित स्वच्छताकर्मीं भारावून गेले.* स्वच्छता ई-बुलेटिन :

          स्वच्छ भारत अभियानांतर्गत राबविण्यात येणा-या उपक्रमांची माहिती देणारे आणि जागरूकता व वर्तन बदल तसेच भागधारकांच्या सहभागाला चालना देण्यासाठी सर्वोत्तम पद्धतींवर प्रकाश टाकणारे ‘ई बुलेटिन’ ऑनलाईन प्रकाशित करण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यास सुरूवात करण्यात आली.      अशाप्रकारे घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनामध्ये विविध प्रकारच्या अत्याधुनिक कार्यप्रणालींचा वापर करून तसेच स्वच्छताविषयक नानाविध उपक्रम राबवून नवी मुंबई महानगरपालिका नेहमीच देशव्यापी स्वच्छ सर्वेक्षणात अव्वल स्थान मिळविण्यासाठी आघाडीवर राहिली आहे. त्यामुळेच यावर्षी ‘स्वच्छ सर्वेक्षण 2024’ मध्ये सातत्याने अग्रक्रम मिळविणा-या शहरांच्या ‘सुपर स्वच्छ लीग’ या स्पेशल कॅटेगरीत नवी मुंबईचा समावेश करण्यात आला असून स्वच्छ शहरांतील नंबरच्या स्पर्धेपेक्षा उच्चतम स्थान नवी मुंबईला प्राप्त झाले आहे. ही संपूर्ण नवी मुंबईकरांसाठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट असल्याचे सांगत महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी समस्त नागरिकांचे अभिनंदन केले आहे.00000p

संबंधित पोस्ट

पुणे येथील ससून रुग्णालयातील बनावट दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरण दडपण्याची शक्यता ! – सुराज्य अभियान,२ वर्षांनंतरही चौकशी समितीचा अहवाल नाही; अपात्र व्यक्तींनी शासकीय लाभ लाटल्याची मोठी शक्यता !

कोयना प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसनाचे प्रश्न प्राधान्याने सोडवावे- मदत व पूनर्वसन मंत्री अनिल पाटील

vishwatmaklokswamivarta

क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी केले अभिवादन

धारावीतील प्रेम नगर येथे नवीन शौचालय बांधून मिळावे या मागणीसाठी भाजपाचे स्वाक्षरी अभियान….

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील अग्निशमन दलातील 5 जवानांना राष्‍ट्रपती अग्निशमन सेवा पुरस्कार जाहीर

vishwatmaklokswamivarta

मुंबई महानगरपालिकेच्या एम पश्चिम विभागात पर्यावरण संव्हर्धनासाठी संगम प्रतिष्ठाण चा अनोखा उपक्रम गुढीपाडवा चा