vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

नक्षलवाद्यांनी नक्षलवाद सोडुन आंबेडकरवाद स्विकारावा – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे आवाहान**रिपब्लिकन पक्षाचा जनसुरक्षा कायद्याला पाठिंबा* 

*नक्षलवाद्यांनी नक्षलवाद सोडुन आंबेडकरवाद स्विकारावा – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे आवाहान**रिपब्लिकन पक्षाचा जनसुरक्षा कायद्याला पाठिंबा*

मुंबई प्रतिनिधी- नक्षलवाद्यांनी हिंसेचा मार्ग सोडुन आमच्या सोबत आले पाहिजे.त्यांच्या त्यागाचा आम्ही आदर करतो.न्यायासाठी लोकशाही मार्गाने लढा दिला पाहिजे.महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानानुसार वाटचाल करावी.नक्षलवाद्यांनी मुख्य प्रवाहात यावे.जनतेत जाऊन लोकशाही मार्गाने सत्ता मिळवावी.नक्षलवाद्यांनी नक्षलवाद सोडुन आंबेडकरवाद स्विकारावा असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केले.महाराष्ट्र सरकारने मंजुर केलेल्या जनसुरक्षा कायद्याला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा जाहिर करताना आज मुंबईत ना.रामदास आठवलेंनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे नक्षलवाद्यांनी आंबेडकरवाद स्विकारण्याचे आवाहन केले.

 

                जनसुरक्षा कायदा हा जनतेच्या हिताचा आहे.संविधानाने विधानसभा, विधी मंडळाला कायदा करण्याचा अधिकार दिला आहे.त्यानुसार जनसुरक्षा कायदा विधिमंडळात संमत झालेला आहे.विद्रोही लेखन जरुर करावे.नक्षलवाद्यांच्या हिंसक मार्गाला पाठिंबा आणि प्रोत्साहन देणारे लेखन करु नये.शहरी नक्षलवाद रोखला पाहिजे.हिंसक मार्गामुळे हजारो नक्षलवादी मारले गेले आहेत.मागुन वार करण्याची पध्दत योग्य नाही.समोर येवून वैचारिक वार केला पाहिजे.आम्ही सुध्दा दलित पँथरच्या चळवळीत संघर्ष केला आहे.आमच्या दलित पँथरला कोणीही नक्षलवादी म्हटले नाही.जनसुरक्षा कायद्यामुळे कोणाही निरपराधाला जाणिवपुर्वक नक्षलवादी ठरवू नये.जनसुरक्षा कायद्यामुळे असे चुकीचे प्रकार घडुन अन्याय होवू लागला तर या कायद्यात बदल करण्याचा अधिकार विधीमंडळाला आहे.सरकारने सर्व बाजुंचा विचार करुनच जनसुरक्षा कायदा केला आहे.असे सांगत ना.रामदास आठवले यांनी जनसुरक्षा कायद्याला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा याचे जाहीर केले

संबंधित पोस्ट

कौशल्य विकास विभागातर्फे निबंध स्पर्धा

इतर मागास वर्ग, विमुक्‍त जाती व भटक्या जमाती,विशेष मागास प्रवर्गातील उच्च विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुविधा..

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा 2024-25इ.8वी शिष्यवृत्तीसाठी पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची निवडयादी प्रसिद्ध..

विविध उपक्रमांव्दारे इतरांच्याबद्दल सेवाभाव निर्माण करा- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- महाआरोग्य शिबीर उपक्रमाबद्दल धर्मादाय अधिकाऱ्यांचे केले कौतुक

vishwatmaklokswamivarta

वंदे मातरम या राष्ट्रीय गीताच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवानिमित्त वर्षभर चालणाऱ्या स्मरणोत्सवाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 7 नोव्हेंबर 2025 रोजी करणार उद्घाटन

vishwatmaklokswamivarta