vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याराजकारणस्थानिक बातम्या

शासन आणि लोकप्रतिनिधी मिळून नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करु-उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आयोजित महा जनता दरबारास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

शासन आणि लोकप्रतिनिधी मिळून नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करु-उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आयोजित महा जनता दरबारास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

उपमुख्यमंत्र्यांचा नागरिकांशी थेट संवाद; नागरिकांनी व्यक्त केले समाधान

 

पुणे, प्रतिनिधी: शासन आणि नागरिक यांच्यामधील दुवा अधिक बळकट करण्यासोबतच नागरिकांचे विविध प्रश्न, समस्या समजून त्या सोडवण्याकरिता नेताजी सुभाष मंगल कार्यालय, मांजरी रोड, हडपसर येथे आयोजित महा जनता दरबारास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला, नागरिकांच्या समस्या थेट लोकप्रतिनिधीसमोर मांडण्याची संधी मिळल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी आमदार चेतन तुपे, पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त एम. जे. प्रदीप चंद्रन, पृथ्वीराज बी. पी. यांच्यासह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, या महा जनता दरबारात नागरिकांना भेडसवणाऱ्या समस्या, अडीअडचणीबाबत माहिती घेतली आहे. नागरिकांनी पाणी पुरवठा,रस्ते, मल:निस्सारण, विद्युत पुरवठा, वाहतूक कोंडी सोडविणे, विविध गृह निर्माण संस्थाच्याकरिता ‘सुविधा जागा’ (ॲमेनिटी स्पेस), स्मशानभूमी, दफनभूमी, रिंगरोड, भूसंपादन, रेल्वेपूल आदी समस्यांबाबत निवेदनाद्वारे मागण्या केल्या आहेत; या मागण्या गांभीर्याने दखल घेऊन कार्यवाही करण्यात येईल. शासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिक मिळून प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करू, जिल्हास्तर आणि मंत्रालय स्तरावरील प्रश्न मार्गी लावण्याकरिता पाठपुरावा करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिली.

हडपसर परिसरात ज्या ठिकाणी तातडीने प्रश्न सोडविण्याची आवश्यकता आहे, त्या ठिकाणी आयुक्त, अतिरिक्त आयुक्त प्रत्यक्ष भेटी देणार आहेत. या भागातील वाहतूक कोंडी सोडवण्याकरिता प्रयत्न करण्यात येईल, नागरिकांनी शिस्तीचे पालन करुन सहकार्य करावे, असे आवाहन श्री. पवार यांनी केले.

संबंधित पोस्ट

भाजपा जालना महानगर मंडळाच्या नवनियुक्त अध्यक्षांचा माजी केंद्रीय राज्यमंत्री श्री.रावसाहेब पाटील दानवे यांच्या हस्ते सत्कार

पाण्याचा प्रत्येक थेंब महत्वाचा असून त्यासाठी जलजागृती होणे आवश्यक- पोलीस अधीक्षक संदीप घुगे- जलव्यवस्थापन कृती पंधरवड्याचा शुभारंभ…

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ साहित्यिक ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांचे अभिनंदन 

vishwatmaklokswamivarta

अंमली पदार्थ प्रतिबंधासाठी जनजागृती व प्रत्यक्ष कारवाईवर भर द्या- जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.

अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी आवश्यक निधी मिळवण्यासाठी प्रयत्नशील- सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

गडचिरोलीत रानहत्तींचा वावर: रील आणि फोटोंच्या नादात जीव धोक्यात घालू नका; वनविभागाचे नागरिकांना आवाहन*