vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार’ योजनेच्या नूतनीकरणासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार’ योजनेच्या नूतनीकरणासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई, प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी पात्र असूनही वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार’ योजना राबविण्यात येत आहे. २०२६-२७ या वर्षासाठी या योजनेच्या लाभार्थ्यांनी नूतनीकरणासाठी विहित मुदतीत ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाने केले आहे

शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळाल्यामुळे शिक्षण घेणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना भोजन, निवास तसेच इतर शैक्षणिक सुविधा स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट वितरित करण्यात येत आहे. २०२६-२७ या वर्षासाठी योजनेच्या नूतनीकरणाचे ऑनलाइन अर्ज https://hmasnew.mahait.org/ या संकेतस्थळावर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नूतनीकरणासाठी ऑनलाइन सादर करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर २०२६ आहे.

पात्र विद्यार्थ्यांनी नूतनीकरणाचे ऑनलाइन अर्ज विहित मुदतीपूर्वी सादर करावेत. तसेच ऑनलाइन अर्ज केल्यानंतर त्याची मुद्रित प्रत आवश्यक कागदपत्रांसह सहायक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई उपनगर यांच्या कार्यालयात जमा करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

000

संबंधित पोस्ट

नवी मुंबईत आणीबाणीच्या कालखंडाविषयी विविध उपक्रमांतून लोकशाहीचा जागर*

अमृत संस्थेचे रायगड जिल्हा मध्यवर्ती कार्यालय रायगड-अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीत लवकरच सुरू होणार..

एआय’ च्या युगात जबाबदार पत्रकारितेचा नवा दृष्टिकोन घडवा- अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा

vishwatmaklokswamivarta

विना नंबर टिप्पर आणि अवैध गौणखनिज वाहतुकीवर कडक कारवाई! 5 महिन्यांत 339 विना नंबर टिप्परवर कारवाई, 35 लाखांचा दंड वसूल…

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे मराठी भाषेसाठी चालवले जाणारे आंदोलन थांबवण्याचे केले आवाहन..

ठाणे जिल्ह्यात दिव्यांग बांधवांसाठी सक्षमीकरण कार्यालय सुरू

vishwatmaklokswamivarta