vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

जिल्हा परिषद, ठाणे येथे भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

जिल्हा परिषद, ठाणे येथे भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

 

ठाणे प्रतिनिधी (जिल्हा परिषद, ठाणे) – भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७७ व्या वर्धापन दिनानिमित्त आज, दि. २६ जानेवारी २०२६ रोजी जिल्हा परिषद ठाणेच्या प्रांगणात मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या शुभहस्ते ध्वजवंदन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत राष्ट्रगीत सादर करण्यात आले तसेच प्रजासत्ताक दिनाचा जयघोष करण्यात आला.

कार्यक्रमादरम्यान राज्यगीत व ध्वजगीताचे सादरीकरण करण्यात आले, ज्यामुळे संपूर्ण वातावरण राष्ट्रभक्तीने भारावून गेले. त्यानंतर उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भारताच्या संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन केले.

यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचारी वर्गास प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत, संविधानिक मूल्ये, लोकशाही व्यवस्था व राष्ट्रसेवेचे महत्त्व अधोरेखित केले.

या प्रसंगी प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. वल्लभ जोशी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) अविनाश फडतरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत विभाग) प्रमोद काळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरडकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग प्रमुख) पंडित राठोड, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) देविदास महाजन, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे, महिला व बाल विकास विभाग प्रमुख संजय बागुल, बांधकाम विभाग प्रमुख पद्माकर लहाने, जिल्हा कृषी अधिकारी एम. एम. बाचोटीकर, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी अंजली आंबेकर, सहाय्यक आयुक्त (पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय) कीर्ती डोईजोडे, लेखाधिकारी रविंद्र सकपाळ, जनसंपर्क अधिकारी रेश्मा आरोटे तसेच सर्व विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0000

संबंधित पोस्ट

भिवंडी येथील मुलांमुलींचे शासकीय वसतिगृह येथे रिक्त जागेवर मोफत प्रवेश देणे सुरु

गृहराज्यमंत्र्यांचे आदेश – नवाजुद्दीन सिद्दीकी व ‘बिग कॅश’वर कारवाई होणार! पोलिसांच्या गणवेशाचा अवमान करणारी दिशाभूल करणारी जाहिरात हटवली; पण दोषींवर कारवाई कधी? – सुराज्य अभियान

भाजप आमदार तमिळ सेल्वन यांच्या नेतृत्वाखाली राहुल गांधींविरोधात सायन-कोळीवाडा येथे हजारो कार्यकर्ते सहभागी …

छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्लेवैभव युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट**दुर्गराज रायगडावर जल्लोषात अभिवादन*

vishwatmaklokswamivarta

शासकीय अधिकाऱ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्यामदतीने सामाजिक उत्तरदायित्त्व पार पाडावे – विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार   

नवी मुंबई महानगरपालिकेच्या सुयोग्य विसर्जन व्यवस्थेत अनंत चतुर्दशीदिनी 10678 श्रीगणेशमूर्तींना भावपूर्ण निरोप

vishwatmaklokswamivarta