vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

प्राथमिक आरोग्य केंद्र, धसई येथे राष्ट्रीय क्षयरोग कार्यक्रमाचा आढावा व “निक्षय पोषण किट” वितरणाचा तालुका स्तरीय शुभारंभ..

प्राथमिक आरोग्य केंद्र, धसई येथे राष्ट्रीय क्षयरोग कार्यक्रमाचा आढावा व “निक्षय पोषण किट” वितरणाचा तालुका स्तरीय शुभारंभ..

ठाणे प्रतिनिधी (जिल्हा परिषद, ठाणे)- जिल्हा मुरबाड तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, धसई येथे दिनांक १५ जुलै, २०२५ रोजी राष्ट्रीय क्षयरोग कार्यक्रमाच्या आढाव्यासाठी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. अलका परगे यांनी भेट दिली. त्यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचा सविस्तर आढावा घेण्यात आला व क्षयरोग नियंत्रणासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.     यावेळी क्षयरोग रुग्णांच्या पोषणासाठी Welfare Society for Destitute Children, एकलहरे या स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने “निक्षय पोषण किट” वाटप उपक्रमाचा तालुकास्तरीय शुभारंभ देखील डॉ. परगे यांच्या हस्ते करण्यात आला. या उपक्रमांतर्गत मुरबाड तालुक्यातील सर्व सक्रिय क्षयरोग रुग्णांना नियमित पोषण किट देण्यात येणार आहेत.    या प्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बनसोडे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन करत क्षयरोगाच्या प्रतिबंधासाठी आरोग्य विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. त्यांनी या उपक्रमाचे कौतुक करत सामाजिक सहभागाच्या माध्यमातून आरोग्यविषयक जनजागृती होण्याची आवश्यकता व्यक्त केली.     कार्यक्रमास वैद्यकीय अधिकारी डॉ. नंदकिशोर गोर्डे, आरोग्य सहायक, आरोग्य कर्मचारी तसेच आशा स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.     या उपक्रमाच्या माध्यमातून केवळ औषधोपचार नव्हे तर रुग्णांच्या पोषण स्थितीकडेही लक्ष देण्यात येत आहे, जे राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाच्या उद्दिष्टांनुसार आरोग्यदायी समाज घडवण्यासाठी महत्त्वाचे आहे, असे डॉ. परगे यांनी यावेळी स्पष्ट केले.

000

संबंधित पोस्ट

कुष्ठरुग्ण शोध अभियान; जिल्हास्तरीय आढावा बैठक संपन्न-कुष्ठरुग्णांचा शोध घेऊन उपचार करा- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गीते

vishwatmaklokswamivarta

जिल्हा सामान्य रुग्णालयात ‘जागतिक हिमोफिलिया दिन’ साजरा*28 रुग्णांची मोफत ‘इन्हीबिटर’ चाचणी, तज्ज्ञांकडून मार्गदर्शन

जिल्ह्यात 1 ते 31 जानेवारी 2026 दरम्यान कर्करोग तपासणी मोहीम कॅन्सर व्हॅनद्वारे होणार मोफत तपासणी

विशेष लेख -मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष सर्वसामान्यांचा आधार..

vishwatmaklokswamivarta

ग्रामिण व उपजिल्हा रुग्णालयांमध्ये दिव्यांगांसाठीविशेष शिबिरे आयोजीत करा- जिल्हाधिकारी स्वामी

आयुष मंत्रालय केंद्रीय आयुर्वेदिक संस्था तर्फे धारावी आरोग्य शिबिर संपन्न…