vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय-मराठा समाजाला ओबीसीप्रमाणे सर्व शैक्षणिक सवलती मिळतील  .

 मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय-मराठा समाजाला ओबीसीप्रमाणे सर्व शैक्षणिक सवलती मिळतील  .

राज्य प्रतिनिधी-

महाराष्ट्र शासनाने दिनांक ५ जून २०२६ रोजी घेतलेल्या निर्णयानुसार मराठा समाजातील विद्यार्थ्यांना इतर मागासवर्गीय (OBC) विद्यार्थ्यांप्रमाणे विविध शैक्षणिक सवलती, शिष्यवृत्ती योजना आणि प्रशिक्षण सुविधांचा लाभ उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

या निर्णयांतर्गत शालांत परीक्षापूर्व व परीक्षोत्तर शिष्यवृत्ती, व्यावसायिक शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती, आयटीआय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती, सारथी संस्थेमार्फत मोटार वाहन चालक प्रशिक्षण योजना तसेच इतर विविध शैक्षणिक योजनांचा समावेश करण्यात आला आहे.

कॅप (CAP) प्रक्रियेनंतर संस्थास्तरावर प्रवेश घेणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांनाही या योजनांचा लाभ मिळणार असून, भविष्यात ओबीसी प्रवर्गासाठी लागू होणाऱ्या नवीन शैक्षणिक सवलतीदेखील मराठा समाजातील विद्यार्थ्यांना लागू राहतील.

हा निर्णय शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून अंमलात येणार असून, लाभार्थ्यांसाठी महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलवर आवश्यक तांत्रिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.🎓 विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या या निर्णयाची माहिती अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवूया.

0000

संबंधित पोस्ट

विशेष वृत्त-मुरघास संयंत्र वाटप योजना: पशुपालकांना उद्योजक होण्याची संधीपशुपालक व शेतकरी समुहगटांना लाभ घेण्याचे आवाहन 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वेमार्ग आणि जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे पूलाचं लोकार्पण

गहिनीनाथ गडाच्या विकासासाठी कटिबद्ध- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस· लाखो भाविकांच्या उपस्थितीत नारळी सप्ताह भक्तिमय वातावरणात संपन्न

भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाची मानवंदनामहाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमध्ये भारतीय संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन पी.एन.पी. नाट्यगृह, अलिबाग या ठिकाणी दिनांक १६ व १७ आक्टोबर २०२५ रोजी दोन दिवस होणार संविधानाचा जागर

vishwatmaklokswamivarta

निश्चित कालमर्यादेत महामार्गालगतची अतिक्रमणे हटविण्यासाठी यंत्रणांनी समन्वयाने कार्यवाही करावी,जिल्ह्यातील राष्ट्रीय व राज्य महामार्ग अतिक्रमणमुक्त करण्याचे जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांचे निर्देश,मिशन मोडवर कार्यवाही; अतिक्रमणधारकांना पूर्वसूचना देण्याचे आदेश..

राज्यात ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२५ दरम्यान झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानीपोटी १ लाख ८० हजार ५७४ शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाख रुपयांची #मदत देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-