vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल होण्यासाठी माहे ही पाणबुडीविरोधी युद्धनौका सज्ज

भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल होण्यासाठी माहे ही पाणबुडीविरोधी युद्धनौका सज्ज..

आज भारतीय नौदल मुंबईतील नौदलाच्या गोदीत माहे श्रेणीमधील माहे ही उथळ पाण्यात संचार करू शकणारी पाणबुडीविरोधी युद्धनौका (एएसडब्ल्यू-एसडब्ल्यूसी) आपल्या ताफ्यात दाखल करणार आहे

भारतीय नौदल 24 नोव्हेंबर 2025 रोजी मुंबईतील नौदलाच्या गोदीत माहे श्रेणीमधील माहे ही उथळ पाण्यात संचार करू शकणारी पाणबुडीविरोधी युद्धनौका (एएसडब्ल्यू-एसडब्ल्यूसी) आपल्या ताफ्यात दाखल होणार आहे

पश्चिम नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिस कमांडिंग – इन- चीफ व्हाईस अॅडमिरल स्वामीनाथन यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडणार असून, या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी भूषवणार आहेत.

माहेचा नौदलाच्या ताफ्यातील समावेश हे उथळ पाण्यात संचार करू शकणाऱ्या स्वदेशी बनावटीच्या युद्धनौकांच्या नव्या आवृत्तीच्या आगमनाचे प्रतीक ठरेल. आकर्षक, वेगवान आणि पूर्णपणे भारतीय अशी ही युद्धनौका आहे. यात 80 टक्क्यांहून अधिक स्वदेशी घटकांसह माहे श्रेणीची ही युद्धनौका रचना, बांधणी आणि एकत्रीकरणातील भारताच्या वाढत्या प्रावीण्याचे दर्शन घडवते.

देशाच्या पश्चिम सागरकिनाऱ्यावर ती ‘सायलेंट हंटर’ म्हणून काम करेल. स्वावलंबनाच्या बळावर आणि भारताच्या सागरी सीमांचे संरक्षण करण्यासाठी ती पूर्णपणे समर्पित आहे.

संबंधित पोस्ट

संपूर्ण नवी मुंबईत विविध विभागांत विठ्ठलनामाची शाळा भरवित विद्यार्थ्यांनी दिंड्यांतून जागविले स्वच्छता व आरोग्याचे महत्व…

दहावी, बारावी विद्यार्थ्यांची हॉल तिकीटासाठी अडवणूक न करण्याचे शाळा व्यवस्थापनांना आवाहन

vishwatmaklokswamivarta

ठाणे रेल्वे स्थानकातील विकासकामांना गती  खासदार नरेश म्हस्के आणि डीआरएम हिरेश मीना यांचा संयुक्त पाहणी दौरा…

सत्यमेव जयते फार्मर कप २०२६’ ही शेती परिवर्तनाची व्यापक जनचळवळ५० लाख शेतकऱ्यांना गटशेतीत आणण्याचा संकल्प- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नमुंमपामार्फत 27 मार्च रोजी प्रसिध्द पदभरती जाहिरातीतील पदांसाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्याची मुदत आता 19 मे 2025 पर्यंत..

पुणे व छत्रपती संभाजीनगर विभागातील मत्स्यव्यावसायिकांचा शनिवारी सन्मान सोहळा