vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

दहावी, बारावी विद्यार्थ्यांची हॉल तिकीटासाठी अडवणूक न करण्याचे शाळा व्यवस्थापनांना आवाहन

दहावी, बारावी विद्यार्थ्यांची हॉल तिकीटासाठी अडवणूक न करण्याचे शाळा व्यवस्थापनांना आवाहन

 

        नवी मुंबई प्रतिनिधी-  नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील काही शाळांमध्ये विद्यार्थ्याचे शैक्षणिक शुल्क भरावयाचे बाकी असेल तर त्यांना दहावी / बारावी परीक्षेचे हॉल तिकीट दिले जात नाही अशा काही तक्रारी नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाकडे प्राप्त होत आहेत. सदरची बाब अत्यंत गंभीर असून यामुळे विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते व त्याच्या भविष्यावर परिणाम होऊ शकतो.

तरी या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रातील सर्व खाजगी शाळा व्यवस्थापनांना नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने सूचित करण्यात येते की, एखाद्या विद्यार्थ्याचे शैक्षणिक शुल्क भरणा करणे पालकांच्या काही अडचणींमुळे शक्य होत नसेल तर त्यांच्याशी संवाद साधून शैक्षणिक शुल्क भरणा करणे आवश्यक असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून द्यावे व त्यांना शुल्क भरता यावे याकरिता पर्याय उपलब्ध करुन द्यावेत. तथापि दहावी / बारावी परीक्षेचे हॉल तिकीट न देता त्यांची अडवणूक करु नये. शाळा सोडताना शाळेचा दाखला देण्यापूर्वी शैक्षणिक शुल्क भरून घेण्याचा पर्याय शाळा व्यवस्थापनाकडे उपलब्ध असताना अशा प्रकारे हॉल तिकीट देताना अडवणूक करणे अयोग्य आहे याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.

 अशा प्रकारची कोणतीही तक्रार करावयाची असल्यास संबधित पालकांनी नवी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार यांस 022-27567043 अथवा उपआयुक्त शिक्षण श्रीम. संघरत्ना खिल्लारे यांस 022-27567067 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.

 

संबंधित पोस्ट

साताऱ्यात महिला शक्तीचा जागर; जागतिक महिला दिनानिमित्तमहिला अधिकारी-कर्मचाऱ्यांची भव्य बाईक रॅली

सेवाधारी ज्येष्ठ नागरिक संघटनेत सुदृढ व आनंदी जगण्याची गुरुकिल्ली व्याख्यान संपन्न* 

अभिप्राय कक्षामुळे पारदर्शक प्रशासनाची नवी दिशा जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांचा राज्यस्तरीय सन्मानमहाराष्ट्र लोकसेवा हक्क दिनानिमित्त सन्मान

लोकसभेत आज केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी ‘जी राम जी’ म्हणजेच विकसित भारत – रोजगार आणि उपजीविकेची हमी अभियान (ग्रामीण) हे महत्त्वाचं विधेयक सादर क

vishwatmaklokswamivarta

रायगड जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष संपर्क नंबर व व्हॉट्सअप हेल्पलाईन सुरु

मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजनेतील प्रकल्प प्राधान्याने कार्यान्वित करावेत- जिल्हाधिकारी अशोक काकडे