vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या मुंबई इथल्या प्रादेशिक केंद्राने पंढरीची वारी पदयात्रेच्या माध्यमातून शारिरीक तंदुरुस्ती आणि सांस्कृतिक सलोख्याचा केला प्रसार घोषणा आणि प्रत्यक्ष संवादाच्या माध्यमातून फिट इंडिया चळवळीला दिले प्रोत्साहन

भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या मुंबई इथल्या प्रादेशिक केंद्राने पंढरीची वारी पदयात्रेच्या माध्यमातून शारिरीक तंदुरुस्ती आणि सांस्कृतिक सलोख्याचा केला प्रसार,घोषणा आणि प्रत्यक्ष संवादाच्या माध्यमातून फिट इंडिया चळवळीला दिले प्रोत्साहन

मुंबई प्रतिनिधी -भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या मुंबई इथल्या प्रादेशिक केंद्राने (SAI RC) सध्या सुरु असलेल्या पंढरपूर वारी 2025 अंतर्गत, विटाणी ते बराडपर्यंत ‘पंढरीची वारी’ या पदयात्रेचे आयोजन केले. ही वारी म्हणजे प्राधिकरणाचा फिट इंडिया चळवळीअंतर्गतचाच एक उपक्रम आहे. शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक आरोग्य आणि सांस्कृतिक सलोख्याला प्रोत्साहन देणे हा या पदयात्रेचा उद्देश आहे. पंढरपूरची वारी ही दरवर्षी निघणारी भक्तिमय यात्रा आहे, या वारीत सुमारे आठ लाखांहून अधिक वारकरी सहभागी होतात, ते विठुरायाच्या भक्तीत लीन होत, पायी चालत ही वारी पूर्ण करतात. या पदयात्रे अंतर्गत भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या मुंबई इथल्या प्रादेशिक केंद्राचे अधिकारी, प्रशिक्षक आणि कर्मचारी वारकऱ्यांसोबत चालले आणि त्यांनी सर्व सहभागिंना ‘फिटनेस का डोस, आधा घंटा रोज’ हा संदेश दिला.

उपक्रमाची मुख्य वैशिष्ट्ये:वारकरी समुदायासोबत एकजुटीने 11 किलोमीटरची पदयात्रा.घोषणा आणि प्रत्यक्ष संवादाच्या माध्यमातून फिट इंडिया चळवळीला प्रोत्साहन.दैनंदिन शारिरीक तंतदुरुस्ती, मानसिक आरोग्य, आरोग्यविषयक स्वच्छता आणि प्रतिबंधात्मक काळजी याबाबत जनजागृती.ऐतिहासिक आध्यात्मिक परंपरेतला सक्रिय सांस्कृतिक सहभाग.

पदयात्रेत सहभागी झालेल्यांनी वारकऱ्यांशी संवाद साधला, शारिरीक तंदुरुस्तीच्या घोषणा दिल्या आणि आपल्या दिनचर्येत किमान 30 मिनिटे शारीरिक व्यायामाचा अंतर्भाव करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. या उपक्रमातून क्रीडा प्राधिकरणाच्या मुंबई इथल्या प्रादेशिक केंद्राची शारिरीक तंदुरुस्ती विषयक राष्ट्रीय उद्दिष्टांप्रति वचनबद्धताही अधोरेखित झाली. यासोबतच या उपक्रमाच्या माध्यमातून एकता, भक्तीभाव आणि महाराष्ट्राचा समृद्ध सांस्कृतिक वारशाचा सोहळाही साजरा केला गेला.

संबंधित पोस्ट

डाक विभागाच्या” ज्ञान पोस्ट” सेवेला 1 मे पासुन सुरुवात..

जिल्ह्यातील शासकीय निवासी शाळेत सन २०२६-२७ साठी मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू

पाणीपुरवठा विषयक जाहीर आवाहन*

एमएमआरडीएच्या  चेंबूर ते ठाणे दरम्यान तयार करण्यात येत असलेल्या फ्री वे एक्स्टेंशनच्या कामात बाधीत होत असलेल्या १६९४ झोपडपट्टीधारकांपैकी चार झोपडपट्टी धारकांना प्रातिनिधिक स्वरूपात धनादेशांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वाटप

मिरज तालुक्यातील सरपंचपद आरक्षण कार्यक्रम बालगंधर्व नाट्यगृह मिरज येथे 15 जुलैला

कडधान्य आत्मनिर्भरता अभियानांतर्गत प्रक्रिया युनिट करीता अर्ज सादर करावेत